Tuesday, 28 January 2020

Zee Marathi | Maharashtracha Superstar


'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मध्ये अभिजीतची हटके स्टाईल स्टेटमेंट
महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या पहिल्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आणि माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर हा त्याच्या अभिनय कौशल्याने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करतोय. अभिजीतने गेली अनेक वर्ष माझ्या नवऱ्याची बायको या कार्यक्रमातील त्याच्या गुरुनाथ या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभिजीत मालिकेसोबत महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या नव्या पर्वाच सूत्रसंचालन करताना दिसतोय. या कार्यक्रमातील त्याच्या हटके स्टाईल स्टेटमेंटमुळे अभिजीत सध्या चर्चेत आहे. त्याचा या कार्यक्रमातील फॅशन सेन्स कमालीचा असून त्याच्या स्टाईलने तो अनेक तरुणींना आणि चाहत्यांना इम्प्रेस करतोय असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.
त्याच्या या कार्यक्रमातील स्टायलिंग बद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, "या कार्यक्रमातील माझे सर्वच लुक इंटरेस्टिंग असणार आहेत. माझ्या स्टाईल स्टेटमेंटमधून ट्रेडिशनल फॅशन म्हणजेच फुलकारी, इखत कलमकारी हे इंडोवेस्टर्न आऊटफिटमध्ये मिक्स अँड मॅच करून स्टायलिंग करण्यात येत आहे. त्यामुळे स्क्रीनवर देखील माझे वेगळे आणि इंटरेस्टिंग लुक प्रेक्षकांना पाहायला मिळतील. अतरंगी, स्टायलिश आणि स्मार्ट लुक या संपूर्ण पर्वात मी कॅरी करणार आहे आणि प्रेक्षकांना देखील ते नक्कीच आवडतील."

No comments:

Post a Comment