Wednesday, 26 February 2020

‘टिप्स’ मारणार मराठी गाण्यांचे शतक’ ‘टिप्स’च्या नव्या इनिंगसाठी ‘रिव्हाईब फिल्मस् चे सहकार्य

संगीत क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या 'टिप्स’ या निर्मिती संस्थेने आपल्या दर्जेदार कलाकृतींनी रसिकांची मने जिंकली आहेत. भारतीय संगीत सर्वदूर पोहोचवत असताना सिनेनिर्मितीतही सक्रीय रहाण्याचा वसा 'टिप्स' ने आजवर जोपासला आहे.  आता 'टिप्स मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या नव्या इनिंगचा ‘श्रीगणेशा’ करत 'टिप्स' ने मराठी संगीत क्षेत्रात आपलं दमदार पाऊल टाकलं आहे. मराठमोळ्या गाण्यांचे शतक करण्याचं लक्ष्य नजरेसमोर ठेवून मराठीकडे वळलेल्या 'टिप्स'ने विनोदवीर अभिनेता भाऊ कदमवर चित्रीत झालेलं 'गोल्डीची हळद' हे नवं कोरं धमाकेदार मराठी गाणं रसिकांसाठी आणलं आहे. प्रवीण कोळीकेवल वाळंज आणि स्नेहा महाडीक यांनी गायलेल्या या हळदीच्या गीतात महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम आपल्या अनोख्या डान्सिंग स्टाईलमध्ये लक्ष वेधून घेताना दिसणार आहे.  
या गाण्यासोबतच अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत टिप्सची गाणी येणार आहेत. युटयूबवर धुमाकूळ घालणारं १५० मिलियन्स व्ह्यूज मिळालेलं गोव्याच्या किनाऱ्यावर’ या गाण्याचा गायक रजनीश पटेल नव्या अंदाजातील लव्ह फिव्हर’ गाणं घेऊन येत आहे. टिप्सच्या आगामी गाण्यांमध्ये सावनी रवींद्रधृवन मूर्तीनिलेश पाटीलरुपाली मोघेअभिषेक तेलंग संगीत विश्वातील या आघाडीच्या तरुण गायकांचा स्वरसाज लाभला असून तर ओमप्रकाश शिंदेनम्रता प्रधानसिद्धी पाटणेनितीश चव्हाणशिवानी बावकर आदि तरुण कलाकार या गाण्यांमध्ये दिसणार आहेत. तसेच बालकपालक’,‘टाईमपास’ चे सुप्रसिद्ध संगीतकार चिनारमहेशसुद्धा नव्या गाण्यांसाठी 'टिप्ससोबत काम करणार आहेत. 
एका छोट्याशा दुकानापासून सुरू झालेला तौरानी ब्रदर्स यांचा आजवरचा प्रवास भारतीय संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची साक्ष देण्यास पुरेसा आहे. म्युझीक डिस्ककॅसेट्ससीडी असे तंत्रज्ञानात घडणारे बदल आत्मसात करत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 'टिप्स'चा प्रवास डिजीटलपर्यंत येऊन पोहोचला आहे. 'टिप्स'च्या या नव्या मराठी इनिंगसाठी व नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या निर्मितीसाठी क्रिएटिव्ह हेड म्हणून रिव्हाईब फिल्मस् चे संस्थापक नेहा शिंदे आणि अविनाश चाटे 'टिप्स'सोबत एकत्रित आले आहेत.
'गोल्डीची हळद हे अस्सल मराठमोळं कोळीगीत या वाटेवरील पहिलं पाऊल आहे. अशी अनेक गाणी बनवत रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याचं 'टिप्स' आणि रिव्हाईब फिल्मस्’ चं स्वप्न आहे. 

No comments:

Post a Comment