Wednesday 26 February 2020

Zee Cinema - World television premiere of 'Panipat'


29 फेब्रुवारी रोजी मराठ्यांना अब्दालीच्या सैन्याशी घनघोर युध्द करताना पाहा ‘पानिपत’च्या जागतिक टीव्ही प्रीमिअरमध्ये फक्त ‘झी सिनेमा’वर!
आपला धर्म आणि कर्म याबद्दलच्या कटिबध्दतेमुळे असलेल्या मराठ्यांकडे योध्दे म्हणून नव्हे, तर रक्षक म्हणून पाहिले जात असे. आपल्या मातृभूमीचे रक्षण करणारे ते केवळ झुंजार योध्देच होते असे नव्हे, तर युध्दातही नीतीमूल्ये पाळणारे स्वाभिमानी लढवय्ये होते. आशुतोष गोवरीकर यांच्या पानिपत या भव्यदिव्य चित्रपटात पानिपतवरील तिसर्‍्या युध्दात मराठ्यांकडून दाखविल्या गेलेल्या असामान्य शौर्य आणि वीरतेवरच झोत टाकण्यात आला नसून देशाच्या इतिहासाला कलाटणी देणार्‍्या या युधदत मराठ्यांनी दाखविलेल्या तत्त्वांचेही दर्शन घडते. अफगाणी आक्रमकांपासून आपल्या मातृभूमीला स्वतंत्र ठेवण्यासाठी मराठ्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कडवी झुंज दिली. मारठ्यांच्या या असीम त्याग आणि शौर्याचे दर्शन ‘पानिपत’ या भव्य चित्रपटात घडणर असून त्याचा जागतिक टीव्ही प्रीमिअर शनिवार, 29 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता फक्त ‘झी सिनेमा’वर पाहायला मिळेल.
या युध्दात मराठ्यांच्या फौजेचे नेतृत्त्व करणार्‍्या सदाशिवराव भाऊ यांच्या मध्यवर्ती भूमिकेत नामवंत अभिनेता अर्जुन कपूर असून अफगाणी आक्रमक अहमदशहा अब्दालीची भूमिका संजय दत्तने साकार केली आहे. कृती सनोन हिने यात पार्वतीबाईची भूमिका रंगविली असून तिला मोहनीश बहेल, पद्मिनी कोल्हापुरे आणि सलील सलाथिया या कलाकारांची सहाय्यक भूमिकांमध्ये साथ लाभली आहे. सकिना बेगमच्या पाहुण्या कलकराची भूमिक जुन्या काळातील नामवंत अभिनेत्री झीनत अमान हिने रंगविली आहे.
आशुतोष गोवारीकर म्हणाला, “एक चित्रपटनिर्माता म्हणून भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना मी साध्या पध्दतीने प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे सामान्य प्रेक्षकलाही त्या समजू शकतील. ज्यात मराठ्यांना प्रचंड पराभव स्वीकारावा लागला अशा दुर्मिळ लढायांमध्ये पानिपतच्या लढाईचा समावेश होतो आणि ती क्वचितच चित्रपटात सादर करण्यात आली आहे. या लढाईत समाजाच्या विविध स्तरातील लोक सैनिक म्हणून लढले आणि परक्या आक्रमकाला थोपविण्यासाठी त्यांना एक हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला. कथेच्या पलिकडे जाऊन तिचा व्यापक परिणाम काय झाला, ते दर्शविण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यामुळेच मी आता पानिपतच्या झी टीव्ही वाहिनीवरील जागतिक टीव्ही प्रीमिअरच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करीत आहे. या चित्रपटामुळे भारताच्या इतिहासातील एका फारशा ज्ञात नसलेल्या घटनेचे महत्त्व सामान्य प्रेक्षकंना समजेल.”
पार्वतीबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृती सनोन म्हणाली, “आशुतोषसरांच्या सर्वच चित्रपटांतील भूमिकांप्रमाणे या चित्रपटातील पार्वतीबाईची व्यक्तिरेखाही सशक्त, बहुपैलू आणि एका स्वतंत्र स्त्रीची आहे. पार्वतीबाई या वैद्य (डॉक्टर) असतात. ती भावनिक आणि शारीरिकदृष्ट्याही एक शक्तिशाली महिला आहे. पानिपतच्या तिसर्‍्या लढाईतील ती एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीला मला जेव्हा या व्यक्तिरेखेचं वर्णन करून सांगण्यात आलं, तेव्हा ही व्यक्तिरेखा किती धाडसी आणि निडर आहे, त्याची मला तितकी कल्पना आली नव्हती. पार्वतीबाईला तलवरबाजी येत होती आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी मैदानात लढाई करण्याचीही तिची तयारी असे. त्या काळातील अन्य महिला आपल्या नवर्‍्यावरील प्रेमाची उघड कबुली देण्याबाबत धीट नव्हत्या. पण पर्वतीबाई निर्भिडपणे बोलत असत. एकंदरीतच ही भूमिका रंगविणं हा एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव होता.”
मोहनीश बहेल म्हणाला, “मी प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात भूमिका रंगवीत असून यात मी सदाशिवराव भाऊंचा चुलत बंधू व पेशवा नानासाहेबांची व्यक्तिरेखा साकारीत आहे. त्यांची व्यक्तिरेखा ही चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा असून त्यांच्या व्यक्तित्त्वाला अनेक पैलू होते. त्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा ही तशी गुंतागुंतीची आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटात मला भूमिका रंगविण्याची संधी मिळाली, याचा  मला फार आनंद होत आहे कारण बारीकसारीक तपशिलांकडे विशेष लक्ष पुरविणारे ते दिग्दर्शक आहेत. या भूमिकेला मी न्याय दिला आहे, अशी मी आशा करतो आणि प्रेक्षक पानिपताचा झी टीव्हीवरील जागतिक टीव्ही प्रीमिअर पाहतील, अशी अपेक्षा करतो.”
चित्रपटाची कथा 1758 मध्ये घडते जेव्हा मराठा राज्याचे नेतृत्त्व बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांच्याकडे होते. रघुनाथराव, समशेर बहादुर आणि सदाशिवराव भाऊ यांच्यासारखे खंदे योध्दे असल्याने मराठ्यांनी हैदराबादच्या निजामावर मोठा विजय प्राप्त केलेला असतो. पण अंतर्गत राजकारणामुळे सदाशिवराव भाऊंना पेशवाईच्या आर्थिक उलाढाली पाहण्याची कामगिरी देण्यात येते. सर्व सुरळीत चालले असताना अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दालीच्या संभाव्य आक्रमणामुळे भारतवर नवे संकट घोंघावू लागते. त्याने नजीब-उद-दौला याच्याशी संधान बांधून भारतावर आक्रमण करण्याचा बेत आखल्याचे कळताच सदशिवराव भाऊंच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची फौज तयार केली जाते आणि त्यांना दिल्लीच्या मोहिमेवर रवाना केले जाते. अब्दालीच्या तुलनेत कमी सैन्य असतानाही मराठ्यांनी आपल्या शौर्यात कुठेही उणीव जाणवू दिली नाही आणि त्याला कडवी झुंज दिली.
एका देदिप्यमान आणि महत्त्वपूर्ण लढाईचा अनुभव घेण्यासाठी पाहा ‘पानिपत’चा जागतिक टीव्ही प्रीमिअर शनिवार, 29 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!

No comments:

Post a Comment