Wednesday, 1 April 2020

Zee Talkies | Talkies Premier League | Tumbbad

'टॉकीज प्रीमियर लीग'मध्ये उलगडणार 'तुंबाड'चे रहस्य!!!
/
'टॉकीज प्रीमियर लीग'वर, 'तुंबाडसिनेमात पाहायला मिळणार सोहमचा उत्तम अभिनय!!!
एका शापित घराण्याचीअसामान्य कथा असलेला, 'तुंबाडहा चित्रपट लवकरच 'झी टॉकीज'वर पाहायला मिळणार आहेवाहिनीवरील 'टॉकीज प्रीमियर लीग'ची सुरुवात या रहस्यमय चित्रपटाने होणार आहेम्हणजेच एप्रिललादुपारी १२ आणि संध्याकाळी  वाजता हा चित्रपट 'झी टॉकीज'वर पाहायला मिळणार आहेयानिमित्तानेचित्रपटाचे निर्माते आणि प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते सोहम शाह यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद;
. 'तुंबाड'ची निर्मिती करण्यासाठी बराच कालावधी लागलाप्रेक्षकांना अतिप्रचंड आवडेलअशी एक स्पेशल कलाकृती आपण तयार करत आहोतयाची त्यावेळी कधी जाणीव झाली होती का?
नक्कीचखरंतरतुंबाडच्या निर्मितीला वेळ लागण्याचं मुख्य कारण तेच होतंएक आगळीवेगळी संकल्पना घेऊनएक उत्तम चित्रपट बनवण्याचा माझा प्रयत्न होताया सिनेमाची निर्मितीप्रक्रिया २०१२मध्ये सुरु झालीआणि तरीही चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी २०१८चे वर्ष उजाडावे लागलेअर्थातएवढी मेहनत घेऊनएक हटके आणि जबरदस्त चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो याचा मला आनंद आहे.
तुंबाड सिनेमाचे सर्वच स्तरावर खूप कौतुक झालेयाचं श्रेय तू कुणाला देशीलया चित्रपटाविषयीची कोणती प्रतिक्रिया तुझ्याकरिता सर्वाधिक महत्त्वाची आहे?
राजू हिरानी सरांना हा चित्रपट खूप आवडलात्यांनी स्वतः या चित्रपटाचं खूप कौतुक केलंही कौतुकाची थाप माझ्यासाठीएखाद्या पुरस्कारापेक्षाही अधिक मोठी आहेप्रेक्षकांना चित्रपट पसंत पडलाही एक हिट फिल्म ठरली याचं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देईनचित्रपटाचे छायांकन असोकलाकारांचा अभिनय असो किंवा व्हीएफएक्सचा करण्यात आलेला उत्कृष्ट वापरसर्वच क्षेत्रात टीमने प्रचंड मेहनत घेतलीचित्रपटाचे कथानक सुद्धा अत्यंत दर्जेदार होतेएक रहस्यकथाभयपट आणि इतर अनेक पैलूंनी परिपूर्ण असा हा चित्रपट असल्यानेप्रेक्षकांना पसंत पडला.
दंतकथाइतिहासफँटसी याबरोबरीनेचभारतीय समाजात स्त्रियांचे असलेले स्थानअशा अनेक गोष्टींवर हा सिनेमा भाष्य करतोहे सगळे विषय हाताळणे कसे शक्य झाले?
प्रेक्षकांचे मनोरंजन करेलत्यांना मनापासून आवडेल असा एक सिनेमा मला तयार करायचा होतामूळ संकल्पनेला कुठेही धक्का लागणार नाहीती कथा उत्तमप्रकारे हाताळली जाईल याची काळजी घेतली गेलीकाहीवेळाचित्रपटाची निर्मिती होत असतानाइतर अनेक गोष्टी आपोआप त्यात मिसळत जाताततसंच काहीसं 'तुंबाड'च्या बाबतीत झालंचित्रपट निर्मितीच्या प्रवाहात इतर काही पैलू आपोआप हाताळले गेले.
. 'तुंबाडसिनेमासाठी निर्माता आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिका तू पार पाडल्या आहेसया कलाकृतीकडे तू कोणत्या नजरेने सर्वप्रथम पाहिले होतेस
खरंतरया दोन्हीपैकी कुठल्याच नजरेने नाहीकारणकुठलीही स्क्रिप्ट हातात आल्यावरमी प्रेक्षकांच्या नजरेतून आधी ती वाचतोत्यानंतर अभिनयाबद्दल विचार करतोआणि मगच माझ्यातील निर्माता त्या स्क्रिप्टचा गांभीर्याने विचार करतो. 'तुंबाड'च्या वेळी सुद्धा वेगळं काहीच घडलं नाहीत्यामुळेच प्रेक्षकांना हवा तसादर्जेदार सिनेमा मी त्यांना देऊ शकलो.
हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा असं तुला वाटतं?
रविवार एप्रिल रोजीदुपारी १२ आणि संध्याकाळी  वाजता, 'झी टॉकीज'वर 'तुंबाडहा सिनेमा पाहायला मिळणार आहेमी म्हणालो त्याप्रमाणेप्रेक्षकांना आवडेल अशी कलाकृती आम्ही तयार केलेली आहेएक रहस्यमय भयपट आणि वेगळ्या धाटणीचा सिनेमा अनुभवायचा असेलतर हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहायलाच हवाप्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे 

No comments:

Post a Comment