Wednesday, 27 May 2020

Zee Yuva | लॉकडाऊन मध्ये अनुभवा 'सा रे ग म प'च्या विजेत्यांचा एक आगळावेगळा सुराविष्कार फक्त झी युवावर !

आपल्या सगळ्यांच्या लाडक्या 'सा रे ग म प' या स्पर्धेला यंदा २५ वर्षं पूर्ण झाली. लॉकडाऊनच्या काळात 'एक देश एक राग' हा खास आणि दिमाखदार सोहळा नुकताच पार झाला अर्थात, ही संधी जर तुम्ही गमावली असेल, तर 'झी युवा' पुन्हा एकदा हा उत्कृष्ट सोहळा तुमच्यासाठी घेऊन येत आहे. संगीत क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि गायक मंडळींच्या गप्पांची आणि गाण्यांची उत्तम मैफिल तुम्हाला अनुभवता येईल. 'झी युवा' वाहिनीवर ३१ मे  या दिवशी संध्याकाळी ७ वाजता  हा सोहळा बघता येणार आहे.

या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजित खांडकेकर याने केले. त्याच्याबरोबर एका सत्रात 'सा रे ग म प'च्या काही पर्वांमधील विजेते सहभागी झाले होते. महाराष्ट्राचा आजचा आवाज या पर्वाचा विजेता पार्श्वगायक ऋषिकेश रानडे, लिटिल चॅम्पची विजेती कार्तिकी गायकवाड, अभिजित कोसंबी, विश्वजित बोरवणकर, अनिरुद्ध जोशी आणि जुईली जोगळेकर या विजेत्यांचा यामध्ये समावेश होता. त्यांनी 'सा रे ग म प'चे शीर्षक गीत एका अनोख्या पद्धतीने सादर केले. यात आणखी एक उत्तम गोष्ट घडली ती म्हणजे acepella ,कुठल्याही वाद्यवृंदाची साथ नसताना, मुखावाटे वाद्यांचा ताल धरून या गायकांनी एकमेकांना साथ दिली. या स्पर्धेचा २५ वर्षांचा प्रवास आणि अर्थातच शीर्षक गीत यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे. तेच गीत, स्पर्धेच्या विजेत्यांकडून एका निराळ्या ढंगात ऐकायला मिळणार आहे. 'एक देश एक राग' हा दिमाखदार सोहळा रविवार ३१ मे रोजी संध्याकाळी ७  वाजता पाहायला विसरू नका, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा'वर!!!!

2 comments:

  1. Do you need Finance? Are you looking for Finance? Are you looking for finance to enlarge your business? We help individuals and companies to obtain finance for business expanding and to setup a new business ranging any amount. Get finance at affordable interest rate of 3%, Do you need this finance for business and to clear your bills? Then send us an email now for more information contact us now via financialserviceoffer876@gmail.com whats-App +918929509036 Thank

    ReplyDelete
  2. KYC stands for "Know Your Customer". It's the process of identity verification of the customer. It is conducted to verify the identity of clients and examine their course of any illicit activities For Online KYC Management Tool and Services. The reason because of which almost all major companies and organizations are carrying out KYC is to make sure that their distributors, consultants, and agents are bribery-free and are not involved in any unlawful activities.

    ReplyDelete