Friday, 3 July 2020

Zee Talkies - Gurupornima special movies

झी टॉकीजवर गुरुपौर्णिमा स्पेशल फिल्म फेस्टिवल

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे यंदा ५ जुलैला 'गुरुपौर्णिमा' साजरी केली जाईल. या दिवशी सर्वजण आपल्या गुरूंना वंदन करतात. पण यावर्षी हा सण सर्वांना घरी राहूनच साजरा करावा लागेल आणि म्हणूनच प्रेक्षकांची लाडकी वाहिनी झी टॉकीज प्रेक्षकांसाठी या खास दिवशी काही खास चित्रपट सादर करणार आहे. गुरुपोर्णिमेचं औचित्य साधून झी टॉकीज रविवार ५ जुलै रोजी तानी, देऊळ बंद, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, दे धक्का आणि नशीबवान हे चित्रपट सादर करणार आहे. 
करोनाच्या वाढत्या संकटामुळे सर्वजण सोशल डिस्टन्सिंग पाळत गेले ३ महिने घरी आहेत. या कठीण काळात झी टॉकीज प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या रविवारी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झी टॉकीज प्रेक्षकांना एक चांगला संदेश आणि शिकवण देणारे चित्रपट सादर करत आहेत. त्यामुळे यंदाची गुरुपौर्णिमा प्रेक्षकांनी झी टॉकिजसोबत साजरी करत या चित्रपटांचा कुटुंबियांसोबत मनमुराद आनंद लुटावा. 

No comments:

Post a Comment