मुंबई २७ ऑगस्ट, २०२० : आधी वंदू तुझ मोरया ! चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या आपल्या गणपती बाप्पाचे आगमन यावर्षी देखील घरोघरी उत्साहात करण्यात आले ... पण, परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं जाणवलं... विघ्नहर्त्याच्या आगमनाने बर्याच काळापासून असलेले कोरोनाचे सावट आणि नकारात्मक वातावरण काहीसं दूर राहून सर्वत्र आनंददायी माहोल पाहायला मिळत आहे... या काळात प्रत्येक व्यक्ति हेच साकड घालत आहे की, सगळ्या चिंता दूर होवो आणि आपल्यावर ओढवलेले हे संकट बाप्पा दूर करो... याच पार्श्वभूमीवर कलर्स मराठी घेऊन येत आहे ‘बाप्पा मोरया रे’ हा विशेष सोहळा... या विशेष कार्यक्रमामधून विविध कलाकार गणरायाच्या या विश्वरूपी प्रतिमेला अभिवादन करणार आहेत. आणि याचाच श्री गणेशा कलर्स मराठी परिवारातील आपल्या लाडक्या कलाकारांनी अष्टविनायकाला साकडं घालून केला आहे... हा विशेष परफॉर्मन्स मृणाल दुसानीस, शशांक केतकर, अशोक फळदेसाई, विदुला चौघुले, मनिराज पवार, शिवानी सोनार, सुमित पुसावळे, ऐश्वर्या नारकर, रेवती लेले, अमोल बावडेकर सादर करणार आहेत. असेच भक्तीचे विविध रंग घेऊन तुमच्या भेटीला ‘बाप्पा मोरया रे’ हा विशेष सोहळा घेऊन आलो आहे... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्पृहा जोशीने केले आहे...तेंव्हा नक्की बघा ‘बाप्पा मोरया रे’ ३० ऑगस्ट संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर...
गणरायाचे संगीतमय रूप अनेक गाण्यातून प्रकट होते. बाप्पावर अनेक गाणी रचली गेली जसे गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया... कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली, त्यातील काही सूरवीरांची सुरेल गाणी या सोहळ्यात सादर होणार आहेत. गणेशावरील आपल्या सगळ्यांचे आवडते आणि अजरामर गाण तुझ मागतो मी आता मधुरा कुंभार हिने तिच्या सुरेल आवाजात सादर केले आहे. याचसोबत रविंद्र खोमणे यांनी सनईचा सुर हे गाणे तर अमोल घोडके याने दगडी चाळ सिनेमातील हे गणराया सादर केले... तर अक्षया अय्यर, श्रावणी वागळे, अक्षता सावंत यांची देखील एकसे बडकर एक गाणी ऐकायला मिळणार आहेत... सोहळ्याची शान अजूनच वाढली जेंव्हा शाहीर विठ्ठल उमप यांच्या घराण्यातील आघाडीचा गायक नंदेश उमप यांनी तुझा जयजयकार हे गाणे सादर केले...आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत गुप्ते यांनी गणाधीशाय भालचंद्राय हे गाणे सादर करून कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली... तेंव्हा आपण सगळे या सोहळ्यात सामील होऊ ३० ऑगस्ट संध्या ७.०० पासून कलर्स मराठीवर.
संगीतासोबतच काही पारंपरिक कलेचे प्रकार देखील बघायला मिळणार आहेत... गणेशोत्सव तसं बघायला गेले तर सगळीकडेच मोठ्या जल्लोषात साजरा होतो... पण विशेष करून कोकणात देखील मोठ्या प्रमाणावर साजरा होतो... कोकणातील विविध कलांमधील महत्वाची कला म्हणजे जाकडी नृत्य...दुर्वास पायकोळी याचे सादरीकरण या कार्यक्रमध्ये करणार आहेत... गणपती विविध रूपात आपल्याला भेटतो... बाप्पाचे अस्तित्व आजच्या काळात देखील अनमोल आहे... महाराष्ट्राची लोककला शेकडो वर्षांपासून टिकून आहे आणि त्याची सुरुवात गणरायाचे आवाहन करूनच होते... ती म्हणजे गण गाऊन... लोककलेच्या क्षेत्रातील अग्रगण्य कलावंत गणेश चंदनशिवे यांनी पठ्ठे बापूरावंच्या लेखणीतून उतरलेला सर्वांगसुंदर गण या कार्यक्रमात सादर करणार आहेत...
बाप्पा मोरया रे या कार्यक्रमाद्वारे पुन्हाएकदा संपूर्ण कलर्स मराठी परिवार एकत्र येणार आहे... आपलं नात पुन्हा एकदा नव्याने बहरणार... आपल्यातील नात्याची वीण अधिक घट्ट होणार आहे आणि सगळे मिळून विघ्नहर्त्याला साकडं घालू ... तेंव्हा नक्की बघा ‘बाप्पा मोरया रे’ ३० ऑगस्ट संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर...
No comments:
Post a Comment