प्रत्येकजण अनेक ताण-तणावासह जीवनातील दैनंदिन संघर्षांचा सामना करत असताना एण्ड टीव्ही नवीन हलकी-फुलकी विनोदी मालिका 'और भई क्या चल रहा है?'सह त्यांच्यासाठी हास्याचा डोस घेऊन येत आहे.
ही प्रासंगिक विनोदी मालिका दोन कुटुंबं मिश्रा कुटुंब – शांती मिश्रा (फरहाना फातिमा) व रमेश प्रसाद मिश्रा (अमरिश बॉबी) आणि मिर्झा कुटुंब – सकिना मिर्झा (आकांक्षा शर्मा) व जफर अली मिर्झा (पवन सिंग) यांच्या माध्यमातून लखनौच्या दीर्घकाळापासूनच्या गंगा-जमुनी तहजीबला सादर करते. ही दोन्ही कुटुंबं एका जुन्या नवाबी हवेलीमध्ये राहतात.
मालिकेची कथा प्रत्येकाची हवेली स्वत:च्या मालकीची बनवण्याच्या आणि दुस-यासोबत शेअर न करण्याच्या असलेल्या इच्छेच्या अवतीभोवती फिरते. ज्यामधून रोजच्या समस्या व घटनांच्या अवतीभोवती फिरणारे भांडण व मनोरंजनपूर्ण कलह पाहायला मिळतात. कथा पुढे सरकते तसे हवेलीला अधिक महत्त्व मिळते. मालिकेला भव्य करण्यासाठी, तसेच हवेलीमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी दिग्गज अभिनेत्री हिमानी शिवपुरी हवेलीला त्यांचा आवाज देणार आहेत, जेथे त्या नवाबी लखनौ शहर, मालिकेमध्ये असलेले गंगा-जमुनी तहजीबबाबत सांगणार आहेत आणि मिश्रा व मिर्झांची ओळख करून देणार आहेत.
हवेलीला आवाज देण्याबाबत सांगताना हिमानी शिवपुरी म्हणाल्या, ''मला मालिका 'और भई क्या चल रहा है?'च्या पहिल्या एपिसोडसाठी आवाज देण्याचा आनंद होत आहे. या मालिकेमध्ये अनोखा उत्साह सामावलेला आहे. प्रेक्षकांसाठी ही नवचैतन्य निर्माण करणारी मालिका आहे. निर्माते हवेलीला आवाज देणा-या व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी माझ्याकडे आले तेव्हा मला खूप आनंद झाला. मला ही संकल्पना आवडली आणि मी लगेचच होकार दिला. मालिका लखनौच्या अस्सलतेला सादर करते, ज्यामधून शहराच्या सौंदर्याला परिपूर्ण न्याय देण्यात आला आहे. मी मालिकेला प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनताना पाहण्यास उत्सुक आहे.''
हवेलीसंदर्भातील विलक्षणता पहा 'और भई क्या चल रहा है?'मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर
No comments:
Post a Comment