Wednesday, 18 August 2021

अपोलोने 'मालफॉर्मेशन' स्थितीतील नवजात बाळाला दिले जीवनदान


'मालफॉर्मेशन' या मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अतिदुर्मिळ विकृतीवर यशस्वी शस्त्रक्रियेने बाळाला मिळाले जीवनदान

 

नवी मुंबई, १८ ऑगस्ट २०२१:- अपोलो चिल्ड्रेन्स हॉस्पिटलने, एका नवजात बाळावर जन्मानंतर अवघ्या ४८ तासांत व्हेन ऑफ गॅलेन मालफॉर्मेशन या मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अति दुर्मिळ विकृतीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जन्मलेल्या ३० लाख बाळांपैकी फक्त एकामध्येच आढळते अशी अति दुर्मिळ मालफॉर्मेशन स्थिती या बाळामध्ये असल्याचे गर्भारपणामध्ये लक्षात आले होते. एन्डोवस्क्युलर एम्बोलायझेशन हा उपचारांसाठी पहिला पर्याय आहे आणि बाळ जन्मल्यानंतर त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आलेली होती.  आईला अपोलो चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जन्मपूर्व एमआरआय केला गेला आणि सी-सेक्शनमार्फत प्रसूती केली गेली.

अपेक्षेप्रमाणे, ब्रेन वस्क्युलर व्हेन ऑफ गॅलन मालफॉर्मेशनमुळे बाळाचे हृदय निकामी झाले आणि त्यासोबत इतरही अवयव निकामी झाले.  जन्मानंतर ४८ तासांनी त्या बाळावर मेंदूतील मालफॉर्मेशनसाठी एन्डोवस्क्युलर एम्बोलायझेशन करण्यात आले. अपोलो हॉस्पिटल्समधील न्यूरो-एन्डोवस्क्युलर सर्जरीचे प्रमुख डॉ. श्रीनिवासन परमशिवम यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे सर्व उपचार पार पाडले. अपोलो हॉस्पिटल्समधील न्यूरो-एन्डोवस्क्युलर सर्जरीचे प्रमुख डॉ. श्रीनिवासन परमशिवम यांनी सांगितले, "व्हेन ऑफ गॅलेन मालफॉर्मेशन हे हाय फ्लो ऍबनॉर्मल कनेक्शन असते ज्यामुळे शिरांमध्ये अतिरिक्त दाब निर्माण होतो, परिणामी हृदय व फुफ्फुसांकडे वेगाने रक्तप्रवाह वाहू लागतो, हे सर्व रक्त शरीरात इतरत्र पोहोचवण्यासाठी हृदयाला जादा काम करणे भाग पडते.  यामुळे बाळांमध्ये कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आणि त्यासोबत विकृती होऊ शकते.  बाळ आईच्या पोटात असतानाच या स्थितीचे निदान केलेले होते, त्यामुळे जन्मानंतर लगेचच बाळावर उपचार करण्यासाठी आम्ही आधीच तयार होतो.  व्हेन ऑफ गॅलेन मालफॉर्मेशन्सवर यशस्वीपणे उपचार करणे हे किचकट थेराप्युटिक आव्हान असते आणि एन्डोवस्क्युलर एम्बोलायझेशनचे क्लिनिकल परिणाम चांगले असल्याचे आधी दिसून आल्याने ती प्रक्रिया करण्याचे ठरले."    

एन्डोवस्क्युलर एम्बोलायझेशनमध्ये ओपन सर्जरी न करता मेंदूतील विकृत रक्तवाहिन्यांवर उपचार केले जातात. या प्रक्रियेमध्ये रक्तप्रवाह रोखला जातो आणि प्रभावित भागाकडे (या केसमध्ये मालफॉर्मेशन) जाणारा प्रवाह ब्लॉक केला जातो. नाभीच्या धमनीतून कॅथेटर, एक लांब, पातळ नलिका टाकून हे केले जाते, जे पुढे मेंदूतील प्रभावित रक्तवाहिनीमध्ये जाते आणि वाहिनी ब्लॉक करण्यासाठी "सुपर ग्ल्यु" इंजेक्ट केला जातो.

डॉ. श्रीनिवासन परमशिवम यांनी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, "नाभीच्या धमनीमार्फत आणि कार्डियाक पेसींग वापरून एम्बोलायझेशन यशस्वीरीत्या करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातील रक्ताचा प्रवाह तात्पुरता थांबवण्याचे हे एक अभिनव तंत्र आहे, ज्यामुळे नियंत्रित एम्बोलायझेशनमध्ये मदत करण्यासाठी हायपोटेन्शन प्रेरित होते. हे तंत्र जगभरात फक्त काही वेळा ब्रेन एम्बोलायझेशनसोबत वापरले गेले आहे. ही प्रक्रिया अपोलो हॉस्पिटल, ग्रीम्स रोड, चेन्नई येथील कॅथ-लॅबमध्ये करण्यात आली. अतिशय तातडीने करण्यात आलेल्या या प्रक्रियेनंतर बाळ बरे झाले आहे आणि त्याची तब्येत चांगली आहे.”

No comments:

Post a Comment