मुंबई ३० सप्टेंबर,२०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हल्लबोल टास्कमुळे खूपच तणावाच वातावरण बघायला मिळत आहेत. सदस्यांचा शब्दांचा मारा ऐकायला येत आहे. पण, दादुस म्हणजेच संतोष चौधरी घरातील वातावरण हलकफुलक करण्याचं कामं सुरुवातीपासून करत आले आहेत. कधी हसू आणतात, तर कधी डोळ्यात पाणी आणतात. आज बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार आहे यमकची जुगलबंदी. त्याची सुरुवात आविष्कारपासून झाली. आविष्कारने मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकाडायला ठेवली, पण त्यात पाणीच ठेवायला विसरला म्हणे. त्यावरून दादूस यांची वाक्य सुरू झाली, “आविष्कारने केला अंड्याचा ब्लास्ट, हा त्याचा चान्स होता लास्ट” त्यावर मग तृप्ती देसाई देखील म्हणाल्या, “पण, मीनल आणि सोनाली करते आहे काम फास्ट”. दादुस लगेच म्हणाले, “यमक हीच तुमच्या लाईफची चमक”. त्यावर मग सोनालीने देखील केलं वाक्य “आता आमच्यासमोर कोणाची बोलायची नाही धमक”. तृप्ती ताईंना लगेच टास्कमधलं काहीतरी आठवलं असणार त्या म्हणाल्या “म्हणून तुम्ही काल टाकलं का नमक”? आणि असे अनेक यमक सदस्य जुळवत केले.
ही जुगलबंदी दादुस, तृप्ती देसाई, मीनल, सोनाली, आविष्कार या सदस्यांमध्ये रंगली. बघूया अजून पुढे काय काय होत ते आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment