मुंबई २० ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. ज्याला काल सुरूवात झाली. ज्यामध्ये एका टीममधील सदस्य घरी परत जाणारी म्हातारी असतील आणि दुसर्या टीममधील सदस्य त्यांना थांबवणारे प्राणी असतील. प्राणी बनलेल्या सदस्यांनी भोपणे गार्डन एरियामध्ये लपवून ठेवायचे आहेत, तर म्हातारी बनलेल्या टीमने ते शोधाचे आहेत.या प्रकियेमध्ये बाद न झालेली व्यक्ति कॅप्टन पदाची उमेदवार ठरणार आहे. टीम A मध्ये जय, उत्कर्ष, गायत्री, स्नेहा, संतोष आणि विकास. टीम B मध्ये विशाल, आदिश, सोनाली, मीनल, आविष्कार आणि मीनल. टीम B मधील सदस्यांमध्ये मीरा ठरली कॅप्टन पदाची पहिली उमेदवार. बघूया आजच्या भागामध्ये काय होते.
आजींनी आज सदस्यांना सांगितले मी सांगितल्याप्रमाणे जो जिंकेल त्याला खाऊ आणि जो हरेल त्याला शिक्षा देणार. त्यामुळे कॅप्टन पदाच्या उमेदवारसाठी आजींनी दिले बेसनाचे लाडू. हे कार्य चातुर्य आणि चपळाईने पूर्ण करायचे होते, ते सदस्यांना जमले नाही त्यामुळे जे उमेदवार झाले नाहीत त्यांची चपळाई वाढावी म्हणून त्यांनी २५ उठाबशा काढायाला आजींनी सांगितले.
बघूया आज टीम A मधून कोणता सदस्य बनतो कॅप्टन पदाचा दूसरा उमेदवार. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment