मुंबई २१ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात वाद विवादा बरोबरच सदस्य बरीच धमाल मस्ती देखील करताना दिसतात. आज तृप्ती ताईंना प्रश्न पडला आहे “एक दुसरे के लीये बेकरार हम...” किस लीये बेकरार ? आज घरामध्ये हेच मॉर्निंग सॉन्ग वाजवलं असणार... आणि मग कुठेतरी या चर्चेचा संदर्भ विशाल कडून काल झालेल्या नियमभंगाकडे गेला. उत्कर्ष त्यावर म्हणाला “मारामारी करायला, मारझोड करायला. जय म्हणाला “जेलचं तोडला त्याने. तृप्ती ताई म्हणाल्या “इथे काही ठेवलं तरी तो तोडेल तो...” दादूस म्हणाले “जेल तोडण खूप मोठा गुन्हा आहे माहिती आहे का... हे असं करताना त्याचाच पाय अडकला असता तर ?”. तृप्तीताई लगेच म्हणाल्या “तोडफोड करणं मोठच आहे ... कशाला तोडफोड करायची? एकदम चुकीचं आहे, कुणीच नाही करायचं.”
बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये अजून काय काय घडलं जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 24 !
बिग बॉस मराठीच्या घरातले हे आहेत फेमस #
मुंबई २१ ऑक्टोबर, २०२१ : सध्या कोणत्याही बाबतीतले # (हॅशटॅग्स) खूपच फेमस होतात. कुठलीही गोष्ट किंवा त्या गोष्टीबद्दल जर व्यक्त व्हायचं असेल तर आपण # वापरतो. तसंच काहीसं आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बघायला मिळणार आहे. घरामध्ये सोनाली, मीनल सदस्यांना देत आहे काही हटके हॅशटॅग्स. सोनालीने विकासला विचारलं “तुला माहिती आहे”? त्यावर मीनल म्हणाली #आपलानेता? हीचं #तोडतोडी आणि उत्कर्षचं काय ठेऊया ? का हसत आहे इतके मीनल, विकास आणि सोनाली... असे काय काय # दिले यांनी घरातील सदस्यांना बघूया आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये.
thanks for sharing the news related to bigg boss really this is very latest news in mumbai
ReplyDelete