Tuesday, 14 December 2021

झी मराठी | ती परत आलीये | लवकरच होणार 'ती'चा पर्दाफाश


ती परत आलीये असं म्हणत आख्ख्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवणारी हि मालिका सुरुवाती पासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलीप्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहता या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलंमालिकेचं रहस्यमय कथानक आणि खिळवून ठेवणारे प्रसंग हे उल्लेखनीय असून प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभिनय हा एकापेक्षा एक होता असं म्हंटल तर खोटं ठरणार नाहीया मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची मन जिंकलीच पण त्याचसोबत मालिकेच्या कथानकाला पुरेपूर न्याय देखील दिलाप्रेक्षकांच्या या आवडत्या मालिकेने नुकतंच १०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे आणि त्याच सोबत मालिका शेवटच्या अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.

मालिकेच्या सुरुवातीपासूनच ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण आहेया प्रश्नाने प्रेक्षकांना भंडावून सोडलेआता लवकरच मालिकेत 'ती'चा पर्दाफाश होणार असून या सगळ्यामागे नक्की कोण आहे हे प्रेक्षकांना कळेलएकामागे एक चालू असलेल्या हत्येच्या मालिकेमागे नक्की ती आहे तो याच रहस्य उलगडणार असून संपूर्ण महाराष्ट्राला 'तीकोण आहेयाच उत्तर मिळणार आहेत्यामुळे हे रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढली आहेतेव्हा पाहायला विसरू नका ती परत आलीये मालिकेचा क्लायमॅक्स सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

No comments:

Post a Comment