Wednesday, 19 January 2022

स्टोरीटेलवर 'जग बदलणारे ग्रंथोत्सव'!


'स्टोरीटेलच्या रसिकांसाठी  दीपा देशमुख लिखित पाच ग्रंथांचा जगावेगळा खजिना!

 

'स्टोरीटेल मराठीसातत्याने साहित्यप्रेमी श्रोत्यांसाठी मौलेवान दुर्मिळ साहित्य संपदा स्टोरीटेल ओरिजनल ऑडिओबुक्सच्या माध्यमातून रिलीज करीत असते. उल्लेखनीय बाब म्हणजे या आठवड्यात प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख लिखित 'जग बदलणारे ग्रंथहा पाच ग्रंथांचा जगावेगळा खजिना यानिमित्ताने 'स्टोरीटेल मराठीआपल्या श्रोत्यांच्या हवाली करीत आहे. कुतूहलज्ञानाची आस असणाऱ्या प्रत्येकानं आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी दीपा देशमुख लिखित 'जग बदलणारे ग्रंथऐकायलाच हवेत. हे ग्रंथ अमोघ चंदनसचिन सुरेशअस्मिता दाभोळे यांच्या आवाजात असून सोबतच 'जग बदलणाऱ्या या ग्रंथांचं महत्व विशद करणारं लेखिकेचं मनोगत ऐकायला मिळणंपर्वणी ठरली आहे.

माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. चाकाचा शोध लागला आणि त्याच्या जगण्याला गती मिळाली. विज्ञान आणि शोधांनी माणसाला डोळस बनवलं. कलेनं त्याचं आयुष्य सुंदर केलं. औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्या आयुष्यानं वेगळी वाट पकडली. तंत्रज्ञानानं त्याच्या आयुष्यात खूप मोठी जागा व्यापली आणि त्याचं आयुष्य सुखकर केलं. माणसाच्या वाटचालीत स्त्रीनं संघर्ष करून आपलं अस्तित्व सिद्ध केलं. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात माणसाची मग एक एक गोष्ट नीट समजून घेण्याची धडपड सुरू झाली आणि या सगळ्या गोष्टींचा दस्तावेज 'ग्रंथरुपात जतन करण्याची प्रक्रिया त्यानं सुरू ठेवली. त्यामुळेच जगभरात आज धर्मकलाविज्ञानतंत्रज्ञानमानसशास्त्र अनुवंशशास्त्रसमाजशास्त्रअर्थशास्त्रराज्यशास्त्रचरित्र अशा अनेक शाखांमधलं लिखाण ग्रंथांच्या रुपानं निर्माण झालं. यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला. यातले निवडक ५ ग्रंथ घेऊन त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न 'जग बदलणारे ग्रंथ'मध्ये प्रख्यात लेखिका दीपा देशमुख यांनी स्टोरीटेल मराठीवर केला आहे. जग बदलणारे ग्रंथांमध्ये महर्षी व्यासांची 'भगवत गीता', गौतम बुद्धांचे 'त्रिपिटक', येशू ख्रिस्तांचे 'बायबल', वात्सायनांचे कामसूत्र आणि कौटिल्य यांचे अर्थशास्त्र हे पाच मुख्य ग्रंथ आहेत.

स्टोरीटेलच्या या अत्यंत वेगळ्या जग बदलणाऱ्या ग्रंथ सिरीज बद्दल प्रख्यात लेखिका दीपा देशमुख म्हणाल्या "कधी माणसाचं रूप घेतात तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्तसजग आणि सुजाण बनवतात. चांगली पुस्तके एकाच वाचनात संपत नाहीत असे स्टीफन किंग म्हणतो. म.जोतिबा फुले यांनी ग्रंथाचे महत्व विशद केलंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक आणि भाकरी यांपैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन असं सांगितलं. खरं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करणारेआपला रागलोभमत्सर न करणारेतरीही भरभरून देणारे ग्रंथ आपले जिवलग मित्र आहेतअसं मला वाटतं. म्हणूनच आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृध्द करण्यासाठी या ग्रंथांशी दोस्ती करायलाच हवी. जरूर ऐका 'जग बदलणारेग्रंथ!"जग बदलणारे ग्रंथ

भगवद्गीता - महर्षी व्यास

'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे. (म्हणजेजगात असा कोणताही विषय नसेलज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही) असा समज सर्वत्र आहे. कारणभगवदगीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्रव्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे. अनेक धर्मातल्या तत्वज्ञांनीविचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेने प्रभावित केले आहे

त्रिपिटक - गौतम बुद्ध

त्रिपिटक या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रितीने कसं जगावं या विषयी सांगितलं आहे. दुःखसमुदयनिरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्यं बुध्दाने सांगितली आहेत. त्रिपिटक ग्रंथ अभ्यासलातर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो. आळस आपल्याला आपल्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा. कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नकाकारण स्वतःचा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे,' असं बुध्दाने म्हटलं आहे.

बायबल - येशू ख्रिस्त

बायबल हा परमेश्वाराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो. हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणाराधर्माची मूलतत्वं काय आहेत आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा आहे. परमेश्वराचं अस्तित्वत्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे. जगभरात या ग्रंथाची सर्वाधिक विक्री झालेली आहे. लिओनार्दो दा व्हिंचीचं द लास्ट सपरआणि मायकल अँजेलोचं क्रिएशन ऑफ ॲडमही चित्रं बायबलवरच आधारित होती.

कामसूत्र – वात्स्यायन

असं म्हणतात की आजपासून २४०० वर्षांपूर्वी भारतात एका अजरामर अशा ग्रंथाची निर्मिती झाली. जो ग्रंथ पृथ्वीच्या अंतापर्यंत मानवजातीला आवश्यक असणार होता. या ग्रंथाचे नाव कामसूत्र! हा ग्रंथ प्रत्येक भाषेत पुढे अनुवादीत केला गेला. जगभरात सर्वाधिक विक्रीचा ग्रंथ म्हणूनही हा ओळखला जातो. सुरूवातीची काही वर्षे तर अनेक देशांमध्ये या ग्रंथावर बंदी घातली गेली होती. मात्र पुढे ब्रिटीश सैनिक असलेला सर रिचर्ड बर्टन याने मूळ संस्कृत असलेल्या या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले तेव्हा त्याने म्हटले की कामसूत्र या भारतीय ग्रंथाने प्रेम कसे करावे याची शिकवण देऊन जगावर उपकारच केले आहेत.

अर्थशास्त्र – कौटिल्य

'माणूस हा जन्माने नाहीतर कर्माने श्रेष्ठ असतोअसे सांगतानाच चाणक्याने शिक्षण हे माणसासाठी किती महत्वाचे आहे हे पदोपदी सांगितले. चाणक्याने लिहिलेल्या ग्रंथात शिस्तअधिका-यांची कर्तव्येकायदाउद्योगराष्ट्राची आचारसंहिताकार्यालयीन हिशोब आणि कामकाजव्यापारजकात आणि उत्पादन शुल्कमालमत्ताठेवीकर्जवसूलीपरराष्ट्रधोरण आणि अर्थशास्त्राविषयी चर्चा केली आहेकामगारांचे हक्कसंरक्षणमजूरी आणि कामाचे स्वरूप याविषयी त्यानं विस्ताराने लिहून ठेवलं आहेत्यानं संबंधित अधिका-यांच्या हलगर्जी पणासाठी त्यांना कठोर दंड करावा असही म्हटलं आहेहा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनिती यांच्यावर लिहिलेला मानवी इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो.

'स्टोरीटेलवर 'जग बदलणाऱ्या या ग्रंथांचं महत्वऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून 'साहित्यश्रवणानंदघेता येईल.

'जग बदलणाऱ्या या ग्रंथांचं महत्व स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/series/71351-Jag-Badalnare-Granth?pageNumber=1

No comments:

Post a Comment