Wednesday, 27 April 2022

कामगारांच्या हक्कासाठी लढा देणार रिक्षावाली अंतरा !


जीव माझा गुंतला कामगार दिन विशेष सप्ताह १ मे ते ५ मे आपल्या कलर्स मराठीवर.

 

मुंबई २७ एप्रिल, २०२२ : संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्‍यांच्या मते ती या निवडणुकीस उभी रहाण्यास पात्र आहे, आणि म्हणूनच सगळ्यांच्या इच्छेचा मान राखून या निवडणूकेमध्ये अंतरा उभी रहाण्यास तयार देखील झाली आहे. पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत अडकली आहे कारण तिला एका गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की, मल्हारचा याला पूर्णत: विरोधात आहे. परंतू आजवर रिक्षा कामगार आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी झटत आलेल्या अंतरासमोर आता हा एकमेव पर्याय आहे, ज्याद्वारे ती कामगारांच्या हक्कासाठी लढू शकेल. कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचली असून रिक्षाचालकांच्या मदतीसाठी अंतरा मैदानात उतरणार आहे. तेव्हा या निवडणुकीत अंतरा जिंकून येईल का ? मल्हार आणि सुहासिनीची तिल साथ मिळणार का अंतरावर मल्हार विश्वास ठेवणार का ? हे जाणून घेण्यासाठी बघा जीव माझा गुंतला मालिकेचा कामगार दिन विशेष सप्ताह १ मे ते ५ मेआपल्या कलर्स मराठीवर. महारविवार एका तासाचा विशेष भाग १ मे रोजी दुपारी २ आणि रात्री ९. वा. आणि २ मे ते ५ मे रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

याविषयी बोलताना मालिकेचे लेखक – निर्माते जितेंद्र गुप्ता  म्हणालेजीव माझा गुंतला मालिकेमध्ये आपली लाडकी अंतरा रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभी राहिली असून हा अतिशय वेगळा ट्रॅक मालिकेमध्ये आम्ही घेऊन आलो आहोतअंतरा रिक्षाचालकआणि  कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहेत्यांच्या हितासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. यानंतर अंतराचे आयुष्य बदलणार आहेएखाद्या माणसाच्या व्यवसायाच्या आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर वर्गीय भेदभाव ही आपल्या समाजातील सर्वात प्रचलित गोष्ट आहेआणि या गोष्टीचा विरोधात करण्यासाठीअंतराने सहकर्मचारी वर्गासाठी तिच्या लग्नाला पणाला लावून निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहेआता या  संघर्षामुळे आणि मल्हार आणि तिच्यामध्ये असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे दोघांचा पुढचा प्रवास कसा असेल हे बघणे प्रेक्षकांसाठी अधिकच मनोरंजक असणार आहे”.

अंतरा आजवर अनेक आव्हानांना सामोरी गेली, अनेक कसोटी तिने पार केल्या यामध्ये कधी तिला मल्हारची साथ मिळाली तर कधी सुहासिनी तिच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. गेल्या काही दिवसांपासून मल्हार आणि अंतरामध्ये आलेल्या दूरव्यामुळे ती दु:खी आहे. अंतराच्या मनातील भावना तिने मल्हारसमोर व्यक्त केल्या पण मल्हारच्या नकारामुळे दुखावलेल्या अंतराने खानविलकरांचं घर सोडलं. पण आता मात्र तिला पुन्हाएकदा धिराने उभे राहायचे आहे ते म्हणजे तिच्या लोकांसाठी, त्यांना त्यांचा हक्क परत मिळवून देण्यासाठी. रिक्षा संघटनेच्या अध्यक्ष पदासाठी अंतराचं योग्य आहे कारण आता तिचे शिक्षण देखील पूर्ण झाले आहे आणि लोकांना मदत करण्यासाठी ती नेहेमीच पुढे असते आणि विरुध्द पार्टीमधील उमेदवारला अंतराचं हरवू शकते असा इतर रिक्षा चालकांचा विश्वास आहे. आता प्रश्न असा आहे त्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या पाठीशी उभी रहाण्यासाठी अंतरा निवडणूक लढणार ? की मल्हारच्या मनाचा विचार करून ती ऐनवेळी माघार घेणार ?

हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा जीव माझा गुंतला मालिकेचा कामगार दिन विशेष सप्ताह १ मे ते ५ मेआपल्या कलर्स मराठीवर. महारविवार एका तासाचा विशेष भाग १ मे रोजी दुपारी २ आणि रात्री ९. वा. आणि २ मे ते ५ मे रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment