Wednesday, 3 May 2023

*माय स्‍टार्टअप सीझन ४.०* || माय स्‍टार्टअप उपक्रम महिला उद्योजिका बनण्‍यास व आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनण्‍यास प्रेरित


·      १० महिला उद्योजकांसाठी १ कोटी रूपये सीड फंड 

·     २ दशलक्षहून अधिक इच्‍छुकांकडून प्रतिसाद मिळालाजो आतापर्यंतचा सर्वोच्‍च   

 

एप्रिल २०२३: ब्रिटानिया मारी गोल्‍ड माय स्‍टार्टअप उपक्रमाने त्‍यांच्‍या चौथ्‍या सीझनच्‍या अव्‍वल दहा विजेत्‍यांची घोषणा केली आहे आणि त्‍यांचा व्‍यवसाय उद्यम सुरू करण्‍यास मदत करण्‍यासाठी प्रत्‍येकाला १० लाख रूपये बक्षीसासह सन्‍मानित केले आहे. 

ब्रिटानिया मारी गोल्‍डचा माय स्‍टार्टअप उपक्रम हे व्‍यासपीठ आहेजे महिलांना उद्योजिका बनण्‍यास आणि बदल्‍यात रोजगार निर्मात्‍या व आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनण्‍यास प्रेरित करते. यशस्‍वीरित्‍या ४ सीझन्‍स राबवत या प्रमुख उपक्रमाला या सीझनमध्‍ये २ दशलक्षहून अधिक इच्‍छुकांचा प्रतिसाद मिळाला आहे. ब्रिटानिया मारी गोल्‍ड टीम ८०,००० हून अधिक सहभागींना व्‍यवसाय कौशल्‍य प्रशिक्षण उपक्रमासह प्रशिक्षित करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली आहे.  

यंदा शॉर्टलिस्‍ट करण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धकांनी ज्‍यूरी सदस्‍यांच्‍या प्रख्‍यात पॅनेलसमोर त्‍यांच्‍या संकल्‍पना सादर केल्‍या. या पॅनेलमध्‍ये रश्‍मी डागासैरी चहलपिया बहादूरलता चंद्रमौली आणि रूचिका भुवाल्‍का यांसारख्या महिला उद्योजकांचा समावेश होता. ज्‍यूरीमध्‍ये ब्रिटानियाच्‍या लीडरशीप टीममधील सदस्‍यांसह प्रख्‍यात व्‍यवसाय व मीडिया व्‍यक्तिमत्त्वांचा देखील समावेश होता.

ब्रिटानिया मारी गोल्‍डच्‍या माय स्‍टार्टअप उपक्रमाने यशस्‍वी चार सीझन्‍स राबवले आहेतज्‍यामधून उदयोन्‍मुख महिला उद्योजकांना निधीसाह्य व स्किलिंग सपोर्ट मिळण्‍यासाठी इकोसिस्‍टम प्रदान करत आहे. ४ वर्षांदरम्‍यान उपक्रमाने आर्थिक साक्षरतासूक्ष्म उद्योजकीय कौशल्ये आणि व्यावसायिक वातावरणात आवश्यक संभाषण कौशल्ये यावर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासाठी नॅशनल स्किल्‍स डेव्‍हपमेंट कौन्सिल (एनएसडीसी) व गुगल यांसारख्‍या कंपन्‍यांसोबत सहयोग केला आहे. 

सीझन ४ ची खासियत म्‍हणजे सर्व सहभागींना गुगलचा विमेनविल प्रोग्राम उपलब्‍ध करून देण्‍यात आला. हा एक व्‍यवसाय साक्षरता प्रोग्राम आहेजो व्‍यवसायामधील रूची वाढवणेउद्योगाचे व्‍यवस्‍थापन आणि विकासासाठी व्‍यवसायाचा प्रचार करणे यांसदर्भातील ‘हाऊ टू’ अभ्‍यासक्रम देतो. शिक्षण प्रवास पूर्ण केलेल्‍या सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्‍यात आले. 

ब्रिटानिया मारी गोल्‍ड माय स्‍टार्टअप कॉन्‍टेस्‍ट ४.० च्‍या फिनालेबाबत सांगताना ब्रिटानिया इंडस्‍ट्रीज लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अमित दोशी म्‍हणाले, ‘‘काळासह ब्रिटानिया मारी गोल्‍डने देशभरातील महिलांसोबत दृढ संबंध स्‍थापित केले आहेत. वर्ल्ड बँक स्‍टडीनुसार प्रत्‍येकी शंभरमधून फक्‍त सात उद्योजक महिला आहेत. मिनिस्‍ट्री ऑफ स्‍टॅटिस्टिक्‍स अॅण्‍ड प्रोग्राम इम्‍प्‍लीमेन्‍शनच्‍या ६व्‍या आर्थिक जनगणनेनुसार भारतात एकूण उद्योजकांमध्‍ये फक्‍त १३.७६ टक्‍के महिला आहेत. माय स्‍टार्टअप उपक्रमासह आमची भारतातील उद्योजकता परिसंस्‍थेत महिलांचे प्रतिनिधित्‍व स्थिर गतीने व शाश्‍वतपणे वाढवण्‍याचे मिशन आहे. हा उपक्रम आर्थिक सहाय्यताकौशल्‍य व बाजारस्‍थळ उपलब्‍धता या ३ प्रमुख आवश्‍यकतांवर लक्ष केंद्रित करतो. सीझन ४ मध्‍ये आम्‍हाला भारतभरातील २ दशलक्षहून अधिक इच्‍छुकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळालाजी आतापर्यंतची सर्वोच्‍च आकडेवारी आहे. या सीझनमधील आमचे विजेते देशातील काही दुर्गम नगर व गावांमधील आहेत आणि त्‍यांनी त्‍यांच्‍या व्‍यवसाय संकल्‍पनांना प्रकाशझोतात आणण्‍यासाठी अविश्‍वसनीय धैर्य व उत्‍कटता दाखवली आहे. ब्रिटानिया सल्लागाराची भूमिका बजावेल आणि विजेत्यांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करताना मदतीचा हात पुढे करेल.’’  

या फिनालेबाबत बोलताना गुगल इंडियाच्‍या गुगल कस्‍टमर सोल्‍यूशन्‍सच्‍या संचालक शालिनी पुचालपल्‍ली म्‍हणाल्‍या, ‘‘तंत्रज्ञान व्‍यवसायाला विकसित होण्‍यास मदत करू शकतेपण व्‍यवसायांचे नेतृत्‍व करण्‍यासोबत काम करणाऱ्या व्‍यक्‍तींमध्‍ये योग्‍य कौशल्‍ये असणे गरजेचे आहे. हे विशेषत: बोर्डमधील महिला उद्योजकांच्‍या बाबतीत प्रकर्षाने दिसून येतेमग लहान व्‍यवसायक्रिएटर्सविकासक किंवा स्‍टार्ट-अप्‍स असोतसेच आमची उत्‍पादने व व्‍यासपीठांच्‍या माध्‍यमातून आणि विमेनविल सारख्‍या कौशल्‍य उपक्रमांसह त्‍यांच्‍या प्रवासामध्‍ये या समुदायाला पाठिंबा देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधून प्रेरणा असो. आम्‍हाला दुसऱ्या सलग यशस्‍वी सीझनसाठी ब्रिटानियाच्‍या माय स्‍टार्टअप कॉन्‍टेस्‍टच्‍या माध्‍यमातून होमप्रीन्‍युअर्सच्‍या या नवीन समुदायाला हा विशेष डिझाइन केलेला अभ्‍यासक्रम देण्‍याचा आनंद होत आहे.’’

विजेत्‍यांची यादी 

अनु. क्र

नाव 

वय 

राज्‍य 

संकल्‍पना 

 

वसम मौनिका 

२७ वर्ष 

तेलंगणा 

मुलांवर केंद्रित हातमाग सूती वस्त्र उत्पादन व्यवसाय वाढवायचा आहे आणि अतिरिक्त सुरक्षिततेसाठी क्‍यूआर कोड-आधारित आयडेण्टिटी टॅगची भर करायची आहे. 

 

अनिषा शेट्टी 

३७ वर्ष 

महाराष्‍ट्र 

तिचा उद्यम – मुलांवर केंद्रित थ्रिफ्ट स्‍टोअरला अधिक प्रगत करायचे आहे 

कांचन भदानी 

६१ वर्ष 

झारखंड 

क्रोशे क्राफ्ट तंत्राद्वारे आदिवासी समुदायांना प्रशिक्षित करणे आणि बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणात खेळणी बनवणे

अंजली श्रीवास्‍तव 

२२ वर्ष 

उत्तर प्रदेश 

शेतकऱ्यांना स्मार्ट लागवडीसाठी उपग्रह आधारित एआय सोल्‍यूशन 

 

सौंदर्या आर 

२६ वर्ष 

तामिळनाडू 

किचनमधील मातीच्‍या भांड्यांचा व्‍यवसाय 

सोनाली देशमुख 

३५ वर्ष 

महाराष्‍ट्र 

डिहायड्रेटिंग हंगामी ताजे खाद्य उत्पादन आणि बी२बी मॉडेल अंतर्गत विक्री

ए. वनिता 

४३ वर्ष 

तामिळनाडू 

स्‍वत:ची आरटीई व आरटीसी आरोग्‍यदायी व पौष्टिक संपन्‍न फूड स्टार्टअप ब्रॅण्‍ड बेलीब्रेन प्रगत करणे. 

स्‍वाती नामदेव काटकर 

३७ वर्ष 

महाराष्‍ट्र 

ग्रामीण भागात श्रवण आणि शाब्दिक चिकित्सा केंद्र उभारणे 

कविता राघवेंद्रन 

३७ वर्ष 

तामिळनाडू 

विशेष मुलांसाठी प्रीस्कूल उघडून सर्वसमावेशक शिक्षण देणे

१०

सुहासिनी सुरेश 

४० वर्ष 

कर्नाटक 

तिचे क्रांतिकारी क्‍लीनिंग उत्‍पादन – झॉर्ब-इटसह जलयुक्‍त साफसफाई करण्‍याची सुलभ सुविधा देणे

No comments:

Post a Comment