Wednesday, 10 April 2024

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंच्या 'ऊन सावली' चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

मुंबई(सांस्कृतिक - मनोरंजन प्रतिनिधी) : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावलीया चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातोसांगणाऱ्या या चित्रपटाचा १२  एप्रिल २०२४  रोजी 'अल्ट्रा झकासमराठी ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर होणार आहे.

प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहेमात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. असं असतानाही त्यांचं लग्न होतं खरंमात्र लग्नानंतर काय गोंधळ सुरू होतो ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह तिचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हे चित्रपटाचे प्रमुख कलाकार आहेत. याचबरोबर राज शरणागतअंकित भोईरविकास हांडेश्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात धमाकेदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे.

एक आशावादी आणि एक निरर्थक विचार सरणीचे दोन पात्र या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. निरर्थक विचारातून एक आशेचं किरण तेवत ठेवलं तर आयुष्य सुंदर होतं. प्रेमाचा हा विलक्षण विचार मांडणारा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेलअशी आम्हाला आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.   

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

No comments:

Post a Comment