Thursday 18 July 2024

बिर्ला ओपस आयोजित संभाषणात्मक मुंबई एक्स्पो

बिर्ला ओपस तर्फे मुंबईत संभाषणात्मक एक्स्पोचे यशस्वी आयोजनमिळाले मुल्यवान आणि माहितीपूर्ण ज्ञान

१७.०७.२०२४ , मुंबई : यावर्षीच्या फेब्रुवारी  मध्ये आदित्य बिर्ला ग्रुप ने रंगांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रवेश करत बिर्ला ओपस ची सुरुवात केली.  अगदी पहिल्या दिवसापासून बिर्ला ओपसला भारतातील आघाडीच्या पेंट ब्रॅन्ड्स पैकी एक बनायचे असून याकरता त्यांनी १४५ विविध उत्पादनांसह १२०० एसकेयूज आणली आहेयामध्ये वॉटर बेस्ड पेंट्सएनामल्सवूड फिनिशेस आणि वॉलपेपर्स हे २३०० हून अधिक टिंटेबल रंगाच्या पर्यायांचा समावेश आहे.  भारतील ग्राहकांपर्यंत बिर्ला ओपसची पोहोच वाढवण्यासह व्यापारी वर्गात उत्पादनांची श्रेणी पोहोचवण्यासाठी कंपनी तर्फे संपूर्ण देशभरात १२० हून अधिक एक्स्पोज चे आयोजन करण्यात आले होते.

बिर्ला ओपस तर्फे ब्रॅन्ड एक्स्पोचे आयोजन हे दिनांक १६ आणि १७ जुलै रोजी ताज लँड्स एन्ड येथे करण्यात आले होते.  या दोन दिवस चालणार्‍या उपक्रमाचा उद्देश म्हणजे त्यांचे व्यावसायिक भागीदार विशेषकरुन डिलर्सपेंटर्सकाँट्रॅक्टर्सआर्किटेक्ट्स आणि अंतर्गत सजावटकार यांना बिर्ला ओपसच्या उत्पादनांची श्रेणी आणि अनोखे विक्री घटक यांच्या विषयी माहिती देण्यात आली

या दोन दिवसात बिर्ला ओपस च्या मुंबई एक्स्पो मध्ये व्यापारी वर्गातील तसेच माध्यमातील प्रतिनिधींना ब्रॅन्डच्या उत्पादनांसह त्यांचे अनुभव सांगण्याची संधी मिळाली  आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला.  खरे पाहता या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बिर्ला ओपसचे  सीईओ रक्षित हरगावे यांनी सुध्दा भेट देऊन एक्स्पो मधील उत्पादनांचा एक्सक्लुझिव्ह वॉकथ्रू मिळवला.  एकूणच हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि सर्व महत्त्वपूर्ण घटकांनी यांत उत्साहाने भाग घेतला.

आपली कलात्मकता आणि नाविन्य प्रदर्शित करत असतांना कंपनी तर्फे काही शेड्सची नावे ही भारतातील रंगनाविन्य आणि संस्कृतीसह जागतिक ट्रेन्ड्स नुसार ठेवली आहेत.  नमूद करण्याची गोष्ट अशी की कॅटलॉग मधील काही शेड्सची नावे ही मुंबईशी संबंधित गोष्टींवरूनही ठेवली आहेत.  मुंबईचा इतिहाससंस्कृती आणि बाजारपेठांकडून प्रोत्साहन

घेऊन त्यांनी अनोख्या शेड्स प्रथमच सुरु केल्या आहेत.  अगदी सौम्य अशा ‘मुंबई ॲट मिडनाईट’, ब्रेकफास्ट इन साऊथ बॉम्बेबॉम्बे मान्सून्स पासून उबदार टोन ने युक्त ऑक्टोबर इन बॉम्बेमुंबई मॅनग्रोव्ह्जबॉम्बे वेल्व्हेट आणि अन्य रंगाचा समावेश असून या शेड्स शहराची संस्कृती जपतात.  त्याच बरोबर व्यापारी वर्गासह माध्यमांना अधिक प्रमाणात आकर्षित केले त्या गोष्टी म्हणजे बिर्ला ओपस ने व्यापारी आणि माध्यमांना मुंबई एक्स्पो मध्ये नवीन उत्साहाच्या लाटा निर्माण केल्या आहेत.

No comments:

Post a Comment