एण्ड टीव्हीवरील मालिका 'अटल' अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणीच्या कथेला सादर करते. नुकतेच या मालिकेने पाच वर्षांची झेप घेतली. प्रख्यात मराठी मालिकांमध्ये सर्वोत्तम भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेले अभिनेता व लेखक रवी महाशब्दे अटल यांचे वडिल क्रिष्णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणार आहेत. मालिकेमधील त्यांच्या प्रवेशासह उत्सुकता निर्माण झाली आहे, जेथे क्रिष्णन बिहारी वाजपेयी यांची भूमिका पुढील कथानकामध्ये महत्त्वाची आहे. आपला आनंद व्यक्त करत मालिका 'अटल'मधील रवी महाशब्दे ऊर्फ क्रिष्णन बिहारी म्हणाले, ''मालिका 'अटल'च्या कलाकारांमध्ये सामील होत अटलजींचे वडिल क्रिष्णन बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारण्याची संधी मिळणे सन्माननीय आहे. अशा दिग्गज नेत्याच्या जीवनाला सादर करणाऱ्या प्रोजेक्टचा भाग असणे मोठा सन्मान व जबाबदारी आहे. क्रिष्णन बिहारी वाजपेयी यांच्या जीवनाला त्यांची सखोलता व प्रभावासह सादर करणे आव्हानात्मक आहे, पण मी हे आव्हान पार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. मालिका 'अटल'चे कथानक भावनिक व ऐतिहासिक महत्त्व सादर करते आणि मला या मालिकेचा भाग असण्याचा अत्यंत आनंद होत आहे.''
महाशब्दे पुढे म्हणाले, ''ही भूमिका साकारलेल्या आधीच्या अभिनेत्याने तरूण अटलच्या वडिलांना सादर करण्यामध्ये उत्तम कामगिरी बजावली. मला अटलजींच्या तत्त्वांना आकार दिलेल्या व्यक्तीची भूमिका साकारताना मोठा आदर वाटत आहे. मी या प्रबळ प्रवासामध्ये माझे योगदान देण्यास उत्सुक आहे, तसेच मी साकारणारी भूमिका क्रिष्णन बिहारी वाजपेयी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल अशी आशा करतो. या मालिकेमध्ये सामील होण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रतिभावान टीमसोबतचा सहयोग. या मालिकेमध्ये कृष्णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी आणि यंग अटलची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली यांच्यासोबत सेटवर माझे नाते दृढ झाले आहे. नेहा उत्तम सह-कलाकार आहेत, ज्या त्यांच्या भूमिकेमध्ये उत्साहीपणा व वास्तविकता आणतात, ज्यामुळे दृढ कौटुंबिक नाते सादर करण्यास मदत होते. उत्कट व उत्साही असलेल्या आयुधसोबत काम करताना खूप धमाल येते. भूमिकेप्रती त्याची समर्पितता प्रेरणादायी आहे आणि आमच्या ऑन-स्क्रिन केमिस्ट्रीमधून वडिल-मुलाचे नाते दिसून येते, जे मालिकेच्या कथानकासाठी महत्त्वाचे आहे.''
रवी महाशब्दे यांना क्रिेष्णन बिहारी वाजपेयीच्या भूमिकेत पाहण्यासाठी पहा मालिका 'अटल' दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!
No comments:
Post a Comment