दक्षिण भारतीय चित्रपटांत आपल्या सौंदर्याबद्दल ओळखली जाणारी कल्याणी प्रियदर्शन यार्डले टॅल्क रेंजचा नवीन चेहरा बनली आहे. तिचे स्वाभाविक सौंदर्य यार्डलेच्या शाश्वत सुसंस्कृततेस पूरक ठरणारे आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या TVC मध्ये यार्डले टॅल्क तिचा आत्मविश्वास वाढवून दिनचर्या कशी उन्नत करते हे दाखवून कल्याणी पुढे जाण्याच्या प्रगतीच्या कल्पनेचे उदाहरण सादर करते. तिची मोहकता, शक्ती आणि आत्मविश्वास यामधून यार्डलेची मूल्ये झळकतात आणि महिलांना आत्म-जागरूकता करून देऊन स्व-अभिव्यक्तीसाठी प्रेरित करतात.
या TVC मध्ये सुरुवातीला कल्याणी आपल्या मैत्रिणीशी एका सौंदर्य स्पर्धेविषयी चॅटिंग करताना दिसते. चॅट करत असताना ती यार्डले टॅल्क लावते ज्यामध्ये नैसर्गिक तेज आणि दीर्घ काळ टिकणारा सुगंध प्रदान करणाऱ्या 97% नैसर्गिक इनग्रेडीएंट्सना हायलाइट करण्यात आले आहे. सौंदर्य स्पर्धेच्या ठिकाणी ती आत्मविश्वासाने पावले टाकते आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. एक ज्युनिअर मॅनेजर तिला चुकून स्पर्धकच समजते, पण कल्याणी हसत हसत खुलासा करते की, ती फक्त तिकडे प्रेक्षक म्हणून आली आहे. तिचे सौंदर्य आणि आत्मविश्वास पाहून ती प्रभावित झालेली दिसते. या दृश्यातून हेच दाखवले आहे की, कशा रीतीने यार्डले महिलांना पुढचे पाऊल टाकण्यास आणि आत्मविश्वासाने वावरण्यास मदत करते.
नवीन अम्बॅसडर आणि सशक्त संदेश लाभलेली यार्डलेची परफ्यूम्ड ब्युटी टॅल्क आता एका आकर्षक आधुनिक पॅकेजिंग मध्ये आली आहे, ज्यातून या ब्रॅंडची जागतिक ओळख आणि स्थायी वारसा व्यक्त होतो. 97% नैसर्गिक इनग्रेडीएंट्सपासून बनलेली ही पावडर दीर्घ काळ टिकणारा फुलांचा सुगंध प्रदान करून त्वचेस तेज देते आणि दैनंदिन दिनाचर्येला लक्झरीची जोड देते. ही पावडर व्हीगन, क्रौर्य-मुक्त आणि पॅराबेन्स व सल्फेट्स मुक्त आहे, त्यामुळे दैनंदिन वापरासाठी सौम्य आहे. यार्डलेचा विशिष्ट सुगंध त्यात आहे. ही पावडर नैसर्गिक सौंदर्य वाढवते आणि स्टाइल आणि आत्मविश्वास देते व यूझरला पुढचे पाऊल टाकण्यास, जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास प्रोत्साहन देते.
या नवीन यार्डले लंडन ब्युटी टॅल्क रेंजमध्ये इंग्लिश लव्हेंडर, इंग्लिश रोझ, मॉर्निंग ड्यू, रॉयल रेड रोझिस आणि इम्पिरीयल जॅस्मिन सहित 8 प्रकारचे सुगंध आहेत. वेगवेगळ्या गरजांनुसार हे वेगवेगळे सुगंध निवडता येतील. ही पावडर सहजपणे घाम शोषून घेते आणि दिवसभर त्वचा चमकदार आणि सुगंधाने दरवळत ठेवते.
ही रेंज पुन्हा लॉन्च करण्याबाबत टिप्पणी करताना यार्डले इंडिया आणि थायलंडचे सीनियर उपाध्यक्ष आणि बिझनेस प्रमुख श्री. मनीष व्यास म्हणाले, “नवीन पॅकेजिंग आणि सुधारित परफॉर्मन्ससह यार्डलेचे जागतिक स्तरावर पुन्हा लॉन्चिंग होत आहे. भारतात, आम्ही टॅल्कम पावडर, साबण आणि हँडवॉश द्वारे सुरुवात केली आहे आणि पाठोपाठ डीओ आणि परफ्यूम देखील रीलॉन्च करणार आहोत. आमच्या 254 वर्षांच्या दीर्घ परंपरेचा सन्मान जपत आजच्या स्त्रीला आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकण्यास प्रवृत्त करणारी जागतिक दर्जाची उत्पादने देण्याबाबतची आमची वचनबद्धता कायम आहे. 97% नैसर्गिक इनग्रेडीएंट्स, प्रीमियम पॅकेजिंग आणि व्यापक श्रेणी यांच्या बळावर आम्हाला खात्री वाटते की, उपभोक्ते नवीन यार्डले ऑफरिंगचे प्रेमाने स्वागत करतील.”
यार्डले लंडन त्यांच्या नवीन ब्युटी टॅल्क श्रेणीची शालीनता अनुभवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहे. निसर्ग-प्रेरित घटक आणि टिकून राहणारा फुलांचा सुगंध यामधून या रेंजची पुनर्कल्पना करण्यात आली आहे. यार्डलेच्या कालातीत लक्झरीने आपले दैनंदिन ब्युटी रुटीन उन्नत करा. ही उत्पादने आता मोठ्या दुकानांमध्ये तसेच यार्डले लंडनच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment