Thursday, 23 January 2025

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने आणली आधुनिक स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणाली

~ एसएसआय मंत्र रोबोटिक सर्जरी प्रणालीच्या रूपाने नवी मुंबईमध्ये आणले सर्जरीचे भविष्य ~
नवी मुंबई, २३ जानेवारी, २०२५:  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणाली, एसएसआय मंत्र प्रस्तुत करून आरोग्य सेवेमध्ये आणखी एक मानक स्थापित केले आहे. ही स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणाली प्रोस्टेट, मूत्राशय आणि किडनी, गर्भाशय, गर्भाशयाचे मुख (सर्विक्स), हृदय, पोट आणि ईएनटीच्या सर्वात गुंतागुंतीच्या सर्जरीसाठी प्रगत उपाय प्रदान करेल.
रुग्ण-केंद्रित देखभालीसाठी ओळखले जाणारे हे रुग्णालय जुलै २०१८ मध्ये सुरु करण्यात आले आणि तेव्हापासून आजतागायत आपल्या रुग्णांना लक्षणीय परिणाम मिळवून देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रस्तुत करण्यात सर्वात आघाडीवर आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई हे देशातील पहिले असे रुग्णालय आहे ज्याने प्रोस्टेट, किडनी आणि मूत्राशयाच्या कँसरच्या रुग्णांवर उपचारांसाठी २६०० पेक्षा जास्त रोबोटिक सर्जरी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या रुग्णालयाने रुग्ण आणि सर्जन्ससाठी कमीत कमी इन्वेसिव सर्जरीची नवी व्याख्या रचली आहे, प्रगत रोबोटिक सर्जिकल सिस्टीमसह पारंपरिक सर्जरीच्या सीमा रुंदावल्या आहेत, ज्यामुळे या क्षेत्रात समर्पित प्रशिक्षित तज्ञ तयार झाले आहेत. आता नवी मुंबईमध्ये एसएसआय मंत्र लॉन्च करून या रुग्णालयाने सुलभ व अचूक सर्जिकल पर्याय देणारे, रोबोटिक सर्जरीमध्ये आघाडीचे म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.  
एसएस इनोव्हेशनने विकसित केलेल्या एसएसआय मंत्र रोबोटिक सर्जरी सिस्टीमला सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने अनुमती दिलेली आहे आणि हे अत्याधुनिक तंत्र सर्जिकल प्रिसिजनला नवा अर्थ प्रदान करण्याचे वचन देते. एसएसआय मंत्र बहुउपयोगी आहे आणि टेलिसर्जरी व टेलिप्रॉक्टरिंग यासारख्या प्रगत सुविधांना एकत्र करत अनेक विशेषतांना सहायक ठरते. ४० पेक्षा जास्त रोबोटिक एंडो-सर्जिकल उपकरणांसह सर्जन युरॉलॉजी, गायनॅकोलॉजी, कार्डिओलॉजी आणि सामान्य सर्जरीमध्ये गुंतागुंतीच्या केसेस सोडवू शकतात. कमीत कमी इन्वेसिव प्रक्रियांना सक्षम करून, ही सिस्टिम रिकव्हरीला लागणारा वेळ कमी करते, उपचार वेगाने होऊ शकतात, वेदना व सर्जरीच्या खुणा कमी होतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो. याची मॉड्युलर मल्टी-आर्म सिस्टिम, 32-इंच 3D 4K मॉनिटर आणि एर्गोनॉमिक डिझाईन अचूकता, नियंत्रण आणि सुरक्षा सुनिश्चित करते.  
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई आपल्या सर्व विशेष विभागांसह संपूर्ण मेडिकल स्पेक्ट्रमला कव्हर करते. ही एक टॉप टर्शियरी केयर फॅसिलिटी आहे जी आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम प्रथांना अनुसरून वैद्यकीय देखभाल प्रदान करते. प्रगत मेडिकल तंत्राचे पालन करण्यात आघाडीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयाने नवी मुंबई आणि आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी क्षितिजे सातत्याने विस्तारली आहेत आणि रुग्णांना सर्वश्रेष्ठ आरोग्य सेवा प्रदान केली आहे. या रोबोटिक सर्जरी सिस्टीमचे लॉन्च रुग्णालयाच्या क्षमतांमध्ये महत्त्वपूर्ण वृद्धी दर्शवते, जे युरॉलॉजी, गायनॅकॉलॉजी, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, सामान्य सर्जरी इत्यादींमध्ये गुंतागुंतीच्या केसेससाठी अचूक सर्जरी करणे संभव बनवते. आपल्या मेड इन इंडिया तंत्रासह हे रुग्णालय सुनिश्चित करते की, रुग्णांना रोबोटिक सर्जरीमध्ये जागतिक प्रगतीचे लाभ स्थानिक स्तरावर सहजपणे उपलब्ध होत राहावेत.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, "कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना लक्षणीय परिणाम मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञान आणि दयाळू भावनेने देखभाल यांना एकत्र जोडण्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले आहे. आमच्या नवी मुंबईतील रुग्णालयामध्ये भारतातील पहिली स्वदेशी रोबोटिक सर्जरी प्रणाली सुरु करून,आम्ही आमच्या रुग्णांच्या फायद्यासाठी नवनवीन गोष्टींचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. ही प्रणाली, आमच्या अत्याधुनिक पायाभूत सोयीसुविधा आणि मल्टी-डिसिप्लिनरी वैशिष्ट्यांसह आम्ही आरोग्यसेवेमध्ये नवीन मानक स्थापित करून सर्जिकल प्रिसिजनमध्ये नवीन परिवर्तन घडवून आणू."
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) डॉ शशिकांत पवार यांनी या प्रणालीच्या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, "रोबोटिक मदतीने केली जाणारी सर्जरी आज आधुनिक वैद्यकशास्त्राचा अविभाज्य भाग बनली आहे. एसएसआय मंत्र सर्जन आणि रुग्ण दोघांसाठी एक गेम-चेंजर आहे. त्याची अचूकता आणि निपुणता सर्जनना त्यांच्या अशा प्रक्रिया करण्यात मदत करतात ज्या एकेकाळी खूप गुंतागुंतीच्या मानल्या जात होत्या आणि ते देखील अगदी सहजपणे आणि अचूकपणे. त्यामुळे रुग्णांना उत्तम परिणाम मिळतात, ते लवकर बरे होतात आणि रुग्णालयातून लवकरात लवकर घरी जाता येते. त्यामुळे ते खूप लवकर आपले सर्वसामान्य आयुष्य पुन्हा सुरु करू शकतात. कमीत कमी इन्वेसिव दृष्टिकोन जीवन गुणवत्तेमध्ये खूप सुधारणा घडवून आणतो."
गेल्या काही वर्षांमध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने 'रुग्णांना सर्वाधिक प्राधान्य' या सिद्धांतामुळे ख्याती मिळवली आहे. या रुग्णालयाने रुग्णांच्या अनेक वेगवेगळ्या आरोग्य देखभाल गरजा पूर्ण करण्यासाठी प्रगत तंत्र आणि अत्याधिक कुशल वैद्यकीय टीम यांना एकत्र आणले आहे. नावीन्य आणि पायाभूत सोयीसुविधांसह सर्वात पुढे राहण्याच्या वचनबद्धतेसह या रुग्णालयाने या भागामध्ये एक विश्वसनीय आरोग्य सेवा सहयोगी म्हणून ओळख निर्माण केली आहे.

No comments:

Post a Comment