Wednesday, 6 November 2019

लकी चित्रपटातील हा सिन शूट करताना अभय महाजन झाला कॉन्शिअस

सिनेमाचं शूटिंग करत असताना, गमतीजमती, आठवणी, गडबड गोंधळ या सगळ्या गोष्टी साहजिकपणे घडत असतात. प्रत्येक कलाकारासाठी चित्रपटाचं शूटिंग अगदी सुरळीतपणे पार पडलं, असं फार कमीवेळा घडतं. २०१८मध्ये प्रदर्शित झालेला 'लकी' हा चित्रपट सुद्धा याला अपवाद ठरलेला नाही. अभिनेता अभय महाजन विवस्त्र अवस्थेत चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळतो. हा प्रसंग चित्रित करत असतानाची आठवण सांगत असतांना, अभय म्हणतो;"ऑक्टोबर हिटच्या त्रासात, जवळपास ४० डिग्री तापमान असताना गोव्यात हा प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. हा सीन शूट करत असताना बराच काळ मी विवस्त्रपणे फिरत होतो. प्रसंगाची गरज म्हणून हे करणं भाग होतं. शूटिंगच्या आसपास असणारी सर्व मंडळी माझ्याकडेच बघत आहेत, असा भास मला होत होता. थोडंसं ओशाळल्यासारखं वाटत होतं. शिवाय सिनेमाच्या पोस्टरवर मी विवस्त्र अवस्थेत झळकणार असल्याने,'लोक काय म्हणतील?' या विचाराने सुद्धा मी हैराण झालो होतो. प्रेक्षकांची टीका सहन करण्याची तयारी मी ठेवली होती. पण, पोस्टर रिलीज झाल्यानंतर मात्र परिस्थिती वेगळी असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी विचार करत होतो त्याहून सुरळीतपणे सगळं पार पडलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मनातील भीती आणि संकोच निघून गेला"
अभय महाजनला आपली अब्रू पणाला लावून नेमका कुठला प्रसंग चित्रित करावा लागला आणि त्या प्रसंगाचे 'लकी' या चित्रपटातील महत्त्व काय? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहायला हवा.'झी टॉकीज' वाहिनी आपल्यासाठी या अफलातून चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर घेऊन येत आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट पाहण्याची आणि ज्यांना चित्रपट आवडला आहे त्यांना पुन्हा पाहण्याची संधी येत्या रविवारी, १० तारखेला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता मिळणार आहे. 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'वर रविवारी एका भन्नाट चित्रपटाचा आनंद मिळवून 'लकी' ठरायला विसरू नका!!!!

No comments:

Post a Comment