Saturday 17 August 2024

दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी व्यापार बंदचा निर्णय कायम

दिनांक : १७/०८/२०२४
पुणे, दि. १७ महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्या तर्फे रविवार दि. ०४ ऑगस्ट २०२४ रोजी दि पूना मर्चेंटस् चेंबर, पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले होते. सदर परिषदेत महाराष्ट्राच्या सर्व ६ महसूल विभागातून राज्यस्तीय व्यापारी मेळावे कृती समितीच्या माध्यमातून आयोजित करण्याचे ठरले होते. त्यानुसार काल दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती व सांगली चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे सांगली येथे राज्यस्तीय व्यापारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अॅन्ड अॅग्रीकल्चर (मुंबई) चे अध्यक्ष ललीत गांधी, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) चे अध्यक्ष जितेंद्र शहा व संचालक प्रितेश शहा, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रिज अॅन्ड ट्रेड (मुंबई), दि ग्रेन,  राईस अॅन्ड ऑईल सीडस् मर्चेंटस् असोसिएशन (मुंबई) कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया व दि पूना मर्चेंटस् चेंबर (पुणे) चे अध्यक्ष रायकुमार नहार, सचिव ईश्वर नहार संचालक संदिप शहा तसेच सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई व त्यांचे सर्व पदाधिकारी व कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पलूस, इस्लामपूर, जत, शिराळा व मिरज येथील संघटनेचे पदाधिकारी व तेथील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेस रद्द करण्यात यावा, वजन मापे कायद्यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये, जी.एस.टी. कायद्यामधील अडचणी दूर कराव्यात इत्यादी व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद ठेवण्याचा निर्णय कायम असून कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा येथील बाजार पेठा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तसेच सदर दिवशी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
तसेच रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर येथे व्यापारी मेळावा आयोजित केला असून सोलापूर, धाराशीव, लातूर, करमाळा, अकलूज, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट येथील व्यापारी संघटना व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.  
 जितेंद्र शाह 
( अध्यक्ष - फ़ाम)

No comments:

Post a Comment