~कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने महिलांसाठी आरोग्यसेवेमध्ये एक नवा मापदंड स्थापित केला आहे. ~
~ एंडोमेट्रिओसिस देखभालीमध्ये अग्रणी स्थान मिळवले आहे आणि एका अशा आजारावर उपचार उपलब्ध करवून दिले आहेत ज्याविषयी अनेक गैरसमज प्रचलित आहेत
मुंबई, जानेवारी 29, 2025: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने भारतामध्ये महिलांसाठीच्या आरोग्यसेवेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, त्यांच्या समर्पित एंडोमेट्रिओसिस क्लिनिकला युरोएंडोसर्ट प्रोग्रामद्वारे युरोपियन एंडोमेट्रिओसिस लीग (EEL) द्वारे अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे एंडोमेट्रिओसिस क्लिनिक हे हा सन्मान मिळवणारे भारतातील पहिले आणि एकमेव क्लिनिक बनले आहे. एंडोमेट्रिओसिस ही एक गुंतागुंतीची, दुर्बल करणारी स्थिती आहे, जगभरातील लाखो महिला यामुळे त्रस्त असतात. परंतु याचे निदान केले जाण्याचे प्रमाण कमी आहे आणि त्यावर उपचारही कमी केले जातात. हे प्रतिष्ठित प्रमाणपत्र एंडोमेट्रिओसिसने त्रस्त असलेल्या महिलांसाठी जागतिक दर्जाच्या, पुराव्यावर आधारित देखभाल उपलब्ध करवून देण्याची वचनबद्धता दर्शवते.
जगभरातील १०-१५% महिला एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त आहेत. भारतात त्यांना मिळणारी देखभाल ही केवळ शस्त्रक्रिया आणि लक्षणांवर उपचार करण्यापुरती मर्यादित आहे, परंतु रोगाच्या दीर्घकालीन स्वरूपावर उपचार केले जात नाहीत. रुग्णांना अनेकदा अपूर्ण उपचार मिळतात, समन्वित देखभालीचा अभाव आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील एंडोमेट्रिओसिस क्लिनिक ही उणीव भरून काढते, समग्र आणि प्रभावी काळजी सुनिश्चित करण्यासाठी एकाच छताखाली व्यापक, मल्टी-डिसिप्लिनरी दृष्टिकोनातून उपचार प्रदान करते.
हे प्रमाणपत्र पुष्टी करते की कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल जर्मन राष्ट्रीय "एंडोमेट्रिओसिसच्या निदान आणि उपचारांसाठी मार्गदर्शक तत्त्वां" मध्ये नमूद केलेल्या कठोर निकषांचे पालन करते. यावरून हे सिद्ध होते की कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल जागतिक सर्वोत्तम पद्धतींना अनुरूप काम करण्यासाठी वचनबद्ध आहे, स्त्रीरोगतज्ज्ञ, वेदना व्यवस्थापन तज्ञ, रेडिओलॉजिस्ट आणि कोलोरेक्टल सर्जन यांना एकात्मिक उपचार चौकटीत एकत्र आणून प्रगत देखभाल प्रदान करते. नियमित सीएमई (सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण) आणि टीममधील चर्चा यामुळे नवीनतम प्रोटोकॉलचे पालन केले जाते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या मिनिमली इनव्हेसिव्ह गायनॅकॉलॉजी, गायनॅकॉलॉजी लॅपरोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीच्या प्रमुख डॉ. अंशुमाला शुक्ला-कुलकर्णी म्हणाल्या, “भारतात एंडोमेट्रिओसिससाठीच्या देखभालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या आमच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हे प्रमाणपत्र आहे. एंडोमेट्रिओसिस ही एक गुंतागुंतीची
No comments:
Post a Comment