Wednesday, 29 January 2025

जीटीटीएस २०२५ अंतर्गत भारतीय आयटीएमइ संस्था घेऊन येत आहे वस्त्रोद्योग नाविन्य आणि सहयोगाकरिता एक जागतिक मंच


 
मुंबई, २९ जानेवारी २०२५: भारतीय जागतिक वस्त्रोद्योग यंत्रसामग्री प्रदर्शन संस्था (भारतीय आयटीएमइ संस्था) पुन्हा एकदा २१ ते २३ जानेवारी ला बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव (पूर्व) येथे वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्वात मोठा ग्लोबल टेक्सटाइल टेक्नोलॉजी आणि इंजीनियरिंग शो (जीटीटीईएस २०२५) च्या तिसऱ्या आवृत्ती च्या निमित्ताने वस्त्रोद्योग क्षेत्रात वादळ निर्माण करण्यासाठी. भारतीय आयटीएमई संस्थे मार्फत आयोजिलेला हा कार्यक्रम जगातील वस्त्रोद्योग व संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रासाठी एक विश्वासार्ह मंच उपलब्ध करून देत आहे ज्यायोगे या क्षेत्रातील सध्या पर्यंत झालेले आधुनिकीकरण, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि जागतिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील संधी यांच्या सहाय्याने पुन्हा या क्षेत्रास प्रकाशझोतात आणले जाऊ शकेल.  
श्री. केतन संघवी जी, जे भारतीय जागतिक वस्त्रोद्योग यंत्रसामग्री प्रदर्शन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, यांच्याशी बोलताना त्यांच्यानुसार, “जीटीटीईएस २०२५ हा एक अत्यंत परिवर्तनशील सोहळा आहे आणि जागतिक स्तरावर वस्त्रोद्योग आणि यंत्रसामग्री तंत्रज्ञाना मध्ये होणाऱ्या अमुलाग्र विकासाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश आहे. सूत आणी कापड या पलीकडे जावून यांच्याशी निगडीत विणकाम, शिवणकाम, प्रोसेसिंग, फिनिशिंग, कपडे आणि तांत्रिकी वस्त्र, पर्यावरण पूरक  प्रक्रिया तसेच शाश्वत विकास यावर देखील या सोहळ्यामध्ये भर दिला जात आहे.  या प्रदर्शनात अनेक नावाजलेले उत्पादक प्रदर्शक हे आपल्या अभिनव संकल्पना, उत्पादन उद्घाटन तसेच अमूल्य भेटींच्या संधींसाठी या प्रदर्शनात उत्साहाने सहभागी होत आहेत व आपण देखील याचे साक्षीदार असणार आहोत. हे प्रदर्शन भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रा मध्ये आपला ठसा उमटविण्याची एक अमूल्य संधी आहे ज्यायोगे भारताला २०४७ पर्यंत वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जगात सर्वोत्तम स्थान देण्याचा उद्देश यशस्वी करण्यासाठी आपण देखील हातभार लावू शकू. 
सन १९८० पासून भारतीय आयटीएमई संस्थेने अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत जसे कि भारत आयटीएमई, आयटीएमई आफ्रिका आणि मध्य पूर्व तसेच जीटीटीएस, ज्यांच्या अनुषंगाने जगातील कापड निमण आणि प्रक्रिया यांना बळ देण्याकडे लक्ष वेधले जावू शकेल तसेच भारतीय विणकाम आणि कापड निर्मिती उद्योगास मुक्त संचार मिळू शकेल आणि जागतिक प्रदर्शक, दर्शक आणि निवेशकांना आकर्षित केले जावू शकेल.  
जीटीटीईएस २०२५ भारतीय वस्त्रोद्योगाच्या प्रवासातील एक मुख्य भाग आहे कारण जीटीटीईएस या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने आठ प्रमुख श्रेणींमधील की १७५ पेक्षा जास्त प्रदर्शाकांच्या सहभागाच्या माध्यमातून भारतीय वस्त्रोद्योगास नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये विणकाम, शिवणकाम, शाश्वत विकास, डिजिटल प्रिंटींग तसेच शिवणकाम तंत्रज्ञानातील विकास यांना प्रमुखपणे संबोधले जात आहे आणि म्हणूनच, विणकाम शिवणकाम विषयात ४२ तसेच प्रोसेसिंग क्षेत्रातील ३८ हून अधिक प्रदर्शक या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. 
भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्र झपाट्याने पावले टाकत आहे आणि २०३० पर्यंत या क्षेत्रातील निवेश अमेरिकन $३५० बिलियन डॉलर पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे, आणि त्याच वेळेस भारतीय कापड आयात अमेरिकन $१०० बिलियन डॉलर पेक्षा ही जास्त होईल. याच ध्येयासाठी २०२५ मध्ये जीटीटीईएस तंत्रज्ञानामध्ये आधुनिकीकरणास चालना देण्याच्या माध्यमातून प्रमुख भूमिका निभावण्याचा प्रयत्न करीत आहे. हे आयोजन एक शो-स्टॉपर असेल ज्यामध्ये हरित तंत्रज्ञान शाश्वत विकास योग्य समाधान हे प्रमुख आकर्षण ठरतील, आणि ज्यामुळे जीटीटीईएस वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आधुनिकीकरणाचे एक प्रमुख कार्यस्थळ बनू शकेल. 
जर्मनी, स्वट्झरलॅ़ड आणि चीन सारखे वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक अग्रेसर देशातील प्रमुख कापड उत्पादक आणि यंत्रसामग्री पुरवठादार यांच्या सहभागामुळे जीटीटीईएस २०२५ जागतिक स्तरावर पोचले आहे यामध्ये दुमत नाही. या सोहळ्यात ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, चीन, जर्मनी, अमेरीका या सारखे २७ पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधित्व असेल आणि २,५०,००० हून अधिक व्यावसायिक उपस्थिती दर्शवतील. आणि याच अंतर्गत श्रीलंका, घाना, इथियोपिया च्या जागतिक प्रतिनिधि मंडळांबरोबर बी२बी बैठकींची योजना देखील तयार केली गेली आहे. 
"वस्त्र उद्योगाच्या भविष्यातील क्रांतिकारी नवकल्पना आणि मौल्यवान भागीदारी अनुभवण्याची संधी गमावू नका."
GTTES 2025 हा देशातील आघाडीच्या उद्योगातील खेळाडूंसाठी नवीन उत्पादनांच्या लाँचिंगसाठी एक महत्त्वाचा मंच आहे.
  • विणकाम विभागात - लक्ष्मी शटललेस लूम्स प्रा. लि., रायझर इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट प्रा. लि., सुमरिया ग्लोबल सेल्स एलएलपी, ओम कॉर्पोरेशन हे नवीन उत्पादने लाँच करणार आहेत.
  • डिजिटल प्रिंट विभागात - कलरजेट इंडिया लिमिटेड नवीन उत्पादन सादर करेल.
  • प्रोसेसिंग क्षेत्रात - कारू-नेटेक्स आणि नॅशनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंपनी नवीन उत्पादने जाहीर करतील.
  • स्पेअर पार्ट्स (स्पिनिंग) क्षेत्रात - समृद्धी इंजिनिअरिंग नवीन नवकल्पना आणणार आहे.
  • इंगर्सोल-रँड (इंडिया) लिमिटेड देखील त्यांच्या उत्पादन आणि सेवांसाठी GTTES चा उपयोग लॉन्चसाठी करेल. ही सर्व नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पना GTTES 2025 ला वस्त्र उद्योगातील व्यावसायिकांसाठी सर्वात महत्त्वाचे प्रदर्शन बनवतात, जे बाजारातील नव्या ट्रेंडसाठी उपयुक्त ठरेल.
याशिवाय, छत्तीसगड सरकारतर्फे विशेष गुंतवणूक प्रचार कार्यक्रम आयोजित केला जाईल, जो राज्यातील संधी अधोरेखित करेल. हे केवळ एक व्यापार प्रदर्शन नसेल, तर भारतीय वस्त्र उद्योगाला जागतिक बाजारपेठेकडे घेऊन जाण्यासाठी एक प्रेरणादायक व्यासपीठ असेल.
हे प्रदर्शन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत बॉम्बे एक्झीबिशन सेंटर मुंबई येथे आयोजित केले गेले आहे. जर आपण एक उत्पादक, वितरक, निवेशक किंवा या क्षेत्रातील व्यावसायिक असाल तर जीटीटीईएस २०२५ हीच ती जागा आहे जिथे तुमची उपस्थिती असणे गरजेचे आहे. ही संधी अजिबात चुकवू नका कारण हाच तो मंच आहे जिथे वस्त्रोद्योगाच्या भविष्यकालीन विस्तारास आकार देणाऱ्या अभूतपूर्व संकल्पना आणि बहुमूल्य सहकार्यता आपल्याला पाहता येणार आहेत. 
जीटीटीईएस विषयी:  हे एक अभूतपूर्व प्रदर्शन आहे आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील आवश्यकातांवर लक्ष वेधणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हे एक विशेच मंच आहे जिथे आपण वस्त्रोद्योगातील अनेक चकित करणारे देखावे, संवादात्मक प्रदर्शन आणि विचार करण्यास भाग पडणारी कला पाहण्याचा आनंद घेऊ शकतो.  कलात्मकता आणि संकल्पना यांना चालना देण्याची ही एक उत्तम संधी आहे.  
हे प्रदर्शन एक न विसरता येणारा अनुभव असतो जो वस्त्रोद्योगा संबंधी आणि तंत्रज्ञान तसेच यंत्रसामग्री व्यवसायास चालना देतो आणि वेगवेगळ्या देशांतून आलेल्या प्रतिनिधींबरोबर चर्चेतून व्यवसाय वृद्धी मध्ये भर घालतो. हे प्रदर्शन कंपन्या आपल्या उत्पादनांची माहिती देण्यासाठी, संभावित खरेदीदार व्यावसायिकांशी चर्चा करण्यासाठी आणि वस्त्रोद्योगातील आधुनिकीकरणा च्या संबंधी आपला माहिती संग्रह वृद्धिंगत करण्यासाठी एक बहुमूल्य स्थळ आहे. वस्त्रोद्योग हा एकूण भारतीय उद्योग जगतातील १३% व्यवसाय भागीदार आहे, जीडीपी मध्ये याचे २.३% योगदान आहे आणि भारतात १२% परकीय चलन हे याच उद्योगा मुळे येते. जागतिक कापड आणि वस्त्र क्षेत्रामध्ये भारतचा ४% पेक्षा अधिक वाटा आहे.  

No comments:

Post a Comment