Wednesday, 2 November 2022

शनिवारी राज्यपालांच्या हस्ते एनजीएफच्या "७व्या ध्येयपूर्ती पुरस्कार २०२२' चे वितरण! कर्तृत्ववान दिव्यांगांच्या कार्याचा होणार गौरव!


'नूतन गुळगुळे फाउंडेशन'तर्फे देण्यात येणाऱ्या 'ध्येयपूर्ती पुरस्कारसोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष. हा सोहळा शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:०० वाजता रवींद्र नाट्य मंदिरप्रभादेवी येथे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात अपूर्व आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या  दिव्यांगांचा सन्मान केला जाणार आहे. संपूर्ण भारतातून या पुरस्कारांसाठी जवळपास ३५० प्रवेश अर्ज आले होतेत्यातून १५ पुरस्कार दिले जाणार असून त्यांची घोषणा व पुरस्कारांचे वितरण एकाचवेळी जाहीर केले जाणार आहे. या सोहळ्यास 'नानावटी मॅक्स हॉस्पिटल'चे ज्येष्ठ कर्करोग सर्जन डॉ. संजय दुधाट, 'एसबीआय जनरल इन्शुरन्स'चे उप-व्यवस्थापकीय संचालक मा. श्री आनंद पेजावर तसेच 'कोचीन शिपियार्ड लिमिटेडभारत सरकार'च्या संचालक म. सौ आम्रपाली साळवेनूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. नूतन विनायक गुळगुळे यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

'नूतन गुळगुळे फाऊंडेशन'च्या 'स्वामी समर्थ सेवा सदनया  नवीन आणि स्तुत्य उपक्रमासाठी 'कोचीन शिपियार्ड लिमिटेडआणि 'एसबीआय जनरल इन्शुरन्सयांच्या सौजन्याने सामाजिक दायित्व निधीतून 'सुरेल जल्लोषया संगीत मैफिलीचे आयोजनही करण्यात आले असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

'७ व्या ध्येयपूर्ती पुरस्कार २०२२सोहळ्याचे मुख्य प्रायोजक एसबीआय जनरल इन्शुरन्सआणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स आहेत. तर सहप्रायोजक जाई काजळ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन आहेत. पितांबरी आणि दि कॉसमॉस बँक यांच्या सौजन्याने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे माध्यम प्रायोजक डीडी सह्याद्री आहेत. तर हॉटेल प्रायोजक हॉटेल जयश्री आहेत. यांच्या सहकार्यातून अफाट कर्तृत्व गाजविणाऱ्या दिव्यांगांचा सन्मान केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment