Friday, 5 May 2023

एण्‍ड टीव्‍हीच्‍या मालिकांमधील लाडक्‍या ‘आई’

 

भारतीय टेलिव्हिजनच्‍या इतिहासामध्‍ये विविध मालिकांमधून काही उल्‍लेखनीय महिला पात्रं सादर करण्‍यात आले आहेतज्‍यापैकी एक म्‍हणजे प्रेमकाळजीदया व त्‍यागाचे प्रतीक असलेली आई. लहान पडद्यावरील या मातांनी प्रेक्षकांच्‍या मनावर दीर्घकालीन छाप निर्माण केली आहे. एण्‍ड टीव्‍ही कलाकार यंदा मातृदिनानिमित्त पडद्यावर प्रेमळ आईच्‍या विविध पैलूंना साकारण्‍याबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत नेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी माँ’), कामना पाठक (राजेश, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि सोमा राठोड (अम्‍मा जी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका दूसरी माँमधील नेहा जोशी ऊर्फ यशोदा म्‍हणाल्‍या, ‘‘मालिका दूसरी माँ’ मातृत्‍वाच्‍या अतूट भावनेला साजरे करते. मालिकेमधील प्रमुख पात्र यशोदा जीवनातील आव्‍हानांना झुगारून आपल्‍या मुलांना अविरत पाठिंबा देते. मुलांवरील तिचे प्रेम रक्‍ताच्‍या नात्‍याच्‍या पलीकडील आहे आणि ती तिचा मुलगा कृष्‍णाच्‍या संरक्षणासाठी सर्व विषम स्थितींविरूद्ध लढते. यशोदा नीडरपालनपोषण करणाऱ्या मातृत्‍वाचे प्रतीक आहे आणि तिची तीन मुले: कृष्‍णा (आयुध भानुशाली)आस्‍था (अद्विका शर्मा) व नूपुर (आन्‍या गोलवान) यांची सुरक्षितता व स्‍वास्‍थ्‍यासाठी कोणत्‍याही टोकाला जाऊ शकते. यशोदा तिच्‍या तिन्‍ही मुलांना समान वागणूक देते आणि महत्त्वाचे म्‍हणजे त्‍यांना चांगले संस्‍कार देते आणि एकत्रित कुटुंब राखण्‍याचा प्रयत्‍न करते. ती स्‍वावलंबीप्रबळ इच्‍छाशक्‍ती असलेली महिला आहेजिच्‍यासाठी तिची मुले विश्‍व आहेज्‍यामुळे ती आदर्श आई आहे.’’

मालिका हप्‍पू की उलटन पलटनमधील कामना पाठक ऊर्फ राजेश सिंग म्‍हणाल्‍या, ‘‘माझ्या मालिकेमध्‍ये मी नऊ मुलांच्‍या आईची भूमिका साकारत आहे. प्रत्‍येक मुलाचे व्‍यक्तिमत्त्व विशिष्‍ट आहे. ऋतिक (आर्यन प्रजापती)चमची (झारा वारसी)काटे सिंग (गझल सूद)रणबीर (सेम्‍या आझार) व मलायका (सोनल पनवार) या सर्वांप्रती माझे प्रेम समान आहे. कधी-कधी प्‍यार व मार’ अशी दोन्‍ही रूप दाखवावे लागतात (हसते). माझी भूमिका राजेशला तिच्‍या सर्व मुलांना कशाप्रकारे आनंदी ठेवायचे हे माहित आहे आणि त्‍यांच्‍या इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी ती काहीही करू शकते. ती कुटुंबाचा आधार आहेतिच्‍या मुलांना शक्‍ती व पाठिंबा देते. राजेश कुटुंबाच्या पोलिस अधिकारी सारखी आहेजी सर्वकाही तिच्‍या नियंत्रणात असण्‍याची खात्री घेते. तिच्‍याशिवाय कुटुंबात गोंधळ निर्माण होईल. ती तिचे मातृत्‍व कर्तव्‍य पार पाडण्‍यापासून कधीच थकत नाहीज्‍यामुळे ती परिपूर्ण सुपरमॉम आहे. ती शिस्‍तबद्ध असण्‍यासोबत तिच्‍या कुटुंबाने पालन करावे असे नियम आखत असली तरी तिचा स्‍वत:च्‍या मुलांना आनंदित ठेवण्‍याचा मुख्‍य उद्देश आहे.’’ मालिका भाबीजी घर पर हैमधील सोमा राठोड ऊर्फ अम्‍मा जी म्‍हणाल्‍या, ‘‘अम्‍मा जी उत्‍साहीआनंदी व वैविध्‍यपूर्ण व्‍यक्‍ती आहेजी सर्वांचातसेच तिचा मुलगा मनमोहन तिवारीचा (रोहिताश्‍व गौड) आदर करते. ती तिची सून अंगूरीला (शुभांगी अत्रे) अविरत पाठिंबा देतेनेहमी तिला उत्तम सल्‍ला देते आणि गरजेच्‍या वेळी तिच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. तिचा अंगूरीप्रती आपुलकी व सहाय्यक स्‍वभाव तिला अपवादात्‍मक माता व सासू बनवते. रोचक बाब म्‍हणजे अम्‍माजी तिच्‍या मुलापेक्षा सूनेवर जास्‍त प्रेम करणारी भारतीय टेलिव्हिजनवरील शक्‍यतो पहिलीच सासू माँ आहे. तिच्‍या पारंपारिक पेहरावाव्‍यतिरिक्‍त अम्‍मा जी अग्रणी विचार करणारी समस्‍या निवरक आहेज्‍यामुळे ती अपवादात्‍मक आई व सासू आहे.’’    

पहा दूसरी माँ’ रात्री ८ वाजता, ‘हप्‍पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

No comments:

Post a Comment