वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या २१ दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला गेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरी राहून सोशल डिस्टंसिंग करत कोरोनाला आळा घालायची जबाबदारी चोख बजावायची आहे. यामध्ये झी मराठी प्रेक्षकांची साथ देणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी झी मराठी या वाहिनीने घेतली आहे. ही वाहिनी रसिक प्रेक्षकांसाठी सादर करणार एंटरटेनमेंट नॉन-स्टॉप. सोमवार ३० मार्च पासून दररोज प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर विविध कार्यक्रमांच्या मेजवानीचा आस्वाद घेता येईल. यामध्ये कीर्तन, प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका, मंनोरंजनाने भरपूर कार्यक्रम आणि चला हवा येऊ द्या विनोदवीरांची धमाल प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका हा मनोरंजनाचा धमाका फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.
No comments:
Post a Comment