शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने देश व राज्यावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय संस्थानच्या तदर्थ समितीने घेतला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
श्री.डोंगरे म्हणाले, जगभरात व देशाभरात थैमान घालणा-या कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यास तोंड देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय संस्थानच्या तदर्थ समितीने घेतला आहे.
संस्थानचे श्री साईप्रसादालयाच्या वतीने श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृध्दाआश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्तावरील पोलिस कर्मचा-यांना, शिर्डी बस स्थानकावरील निराधार व गरजुंना आणि संस्थानच्या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्वच्छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना निशुल्क भोजन पुरविण्यात येत आहे.
खेडोपाडी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचा-यांना अल्पोहारासाठी आज पासून ३ हजार बुंदीची व ३ हजार चिवडयाची पाकीटे जिल्हा पोलिस मुख्यालयाला देण्यात येत आहेत.
संस्थानच्या वतीने यापुर्वी ही राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीत वेळोवेळी मदत केलेली आहे. यामध्ये केरळ मधील पुरामुळे आपदग्रस्त झालेल्या पुरग्रस्तांसाठी ५ कोटी, राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ कोटी तसेच पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीकरीता २.५१ कोटी रुपये निधी देण्यात आलेला असल्याचेही श्री.डोंगरे यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्थीत होते.
शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी की ओरसे संस्थान की तदर्थ समितीने देश तथा राज्य को प्रभावित करनेवाले कोरोना व्हायरस के मुकाबले के लिये मुख्यमंत्री सहाय्यता कोश मे रु. 51 करोड की राशी प्रदान करने का निर्णय लिया है| यह सूचना संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरुण डोंगरे द्वारा जारी की गयी है|
श्री. डोंगरे ने कहा कि पूरा विश्व तथा देशभर में कहर ढानेवाले कोरोना व्हायरस का जमकर मुकाबला करने हेतू केंद्र व राज्य शासन पूरी तरहसे तैय्यार है| इसी पृष्ठभूमिपर श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी की ओरसे संस्थान की तदर्थ समितीने इस प्रकोप के मुकाबले के लिये रु. 51 करोड की राशी मुख्यमंत्री सहाय्यता कोश मे प्रदान करने का निर्णय लिया है|
संस्थानद्वारा संचालित श्री साईप्रसादालय की ओरसे श्री साईबाबा हॉस्पिटल तथा श्री साईनाथ रुग्णालय के रुग्ण तथा रिश्तेदार, शिर्डी परिसरमें स्थित अनाथ आश्रम, वृध्दाश्रम, मूकबधीर विद्यालय, बंदोबस्त के लिये तैनात पुलिस कर्मी, शिर्डी बस स्थानक के निराधार व्यक्ती तथा गरीब तथा संस्थान एवम शासकिय कार्यालयोमें संरक्षण, स्वच्छता तथा अन्यत्र कार्यरत कर्मी इनके लिये निशुल्क भोजन प्रबंध किये गये है|
ग्राम स्तरपर बंदोबस्त कार्यरत पुलिस कर्मी लोगोके अल्पाहार के लिये आजसे 3,000 बुंदी तथा 3,000 चिवडा पाकीट जिल्हा पोलिस मुख्यालयमें भेजे जा रहे है|
संस्थान द्वारा इससे पूर्व भी राष्ट्रीय तथा नैसर्गिक आपदा के समय में मदत की गयी है| श्री डोंगरे ने कहा कि केरळ के पूरग्रस्त लोगोके लिये रु. 5 करोड, राज्य के पूरग्रस्त लोगोके लिये रु. 12 करोड तथा पुलवामा में शहीद हुये जवानोके परीजनोके लिये रु. 2.51 करोड निधी संस्थान द्वारा प्रदान किया गया है|
इस दौरान संस्थानके उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे तथा मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित थे|
Shirdi:
On behalf of Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, the Sansthan Ad-hoc committee has taken a decision to donate Rs. 51 Crore to the Chief Minister Relief Fund to assist in the fight with the danger of Corona Virus, which is taking a toll on the country and the State. This information was provided by Sansthan Chief Executive Officer Mr. Arun Dongre.
Mr. Dongre said that the Central and the State Governments are fully ready to fight dangerous Corona virus spreading across the worlds and the country. On this backdrop, the Sansthan Ad-hoc committee of Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, has taken a decision to donate Rs. 51 Crore to the Chief Minister Relief Fund to assist in the fight with the danger of Corona Virus.
On behalf of Sansthan Shri Sai Prasadalaya, free food is being supplied to the patients and relatives at Shri Saibaba Hospital and Shri Sainath Hospital, Orphanages in Shirdi area, old age homes, Deaf and Dumb School, Police personnel on Bandobast duties, destitute and needy people at Shridi Bus Depot and staff working at the Sansthan and Government offices for security, cleanliness and other works.
For breakfast for Police personnel on bandobast duties in village areas, 3,000 Boondi and 3,000 chiwda packets are being supplied to the District Police Headquarters.
Mr. Dongre said that assistance from Sansthan has also been provided earlier during national and natural calamities. Among this Rs. 5 Crore was provided for flood affected persons from Kerala, Rs. 12 Crores for flood affected persons from Maharashtra and Rs. 2.51 Crores for assisting the families of Pulwama Martyrs.
On this occasion Deputy Chief Executive Officer of the Sansthan Mr. Ravindra Thakre and Chief Accounts Officer Babasaheb Ghorpade were also present.
No comments:
Post a Comment