Thursday, 19 October 2023

'सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास!

(मुंबई:) आपण वाट्टेल तिथे फेकलेला हजारो टन कचराटाकलेलं कुजलेलं अन्नप्लास्टिकबाटल्यारत्यावर मारलेल्या पिचकाऱ्यास्वयंपाकघरप्रसाधनगृहातील सांडपाणीफुटलेली-तुंबलेली गटारेकुठल्याही साधनसामुग्रीशिवाय मॅनहोलखालील ड्रेनेज लाइन स्वच्छ करणाऱ्या देवदूतांपैकीच एक असणारा 'मोऱ्याउर्फ सीताराम जेधे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा त्याचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी 'मोऱ्याचित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीस येत आहे.

'मोऱ्या'च्या कथेने युरोपमधील लंडनमिल्टन केन्समेंचेस्टरइटली इत्यादी शहरांसह अमेरिकेतील न्यूयॉर्करॅलेऑक्सफर्ड (यूएसए) तसेच ऑस्ट्रेलियासिंगापूर अश्या देशांतील रसिकांना आकर्षित केले असून 'मोऱ्याउर्फ सीताराम जेधेला भेटण्यासाठी ते विशेष उत्सुक आहेत. येत्या ५ नोव्हेंबरला मोऱ्या उर्फ सीताराम जेधेची भूमिका करणारा लेखकदिग्दर्शक व अभिनेता जितेंद्र बर्डे लंडनला रवाना होणार आहे. वरील देशांतील प्रतिनिधींसाठी या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग लंडनजवळच्या मिल्टन केन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. या शो नंतर डिसेंबर २०२३ मध्ये जगभरातील अनेक शहरामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

'मोऱ्या'चा टीझर ‘कान महोत्सवात दाखवण्यात आला होता. एलएचआयएफएफ बार्सिलोना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवखजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवझारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवअयोध्या फिल्म फेस्टिव्हललेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलबॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या चित्रपट महोत्सवांत या सिनेमाला ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळाला आहे. तसंच यापैकी काही महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेतासर्वोत्कृष्ट बालकलाकारसर्वोत्कृष्ट कथा असे पुरस्कारही या सिनेमानं पटकावले आहेत. जितेंद्र बर्डेची ही पहिलीच कलाकृती आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णीराजेश अहिवलेसहनिर्माते प्रेरणा धजेकरपूनम नागपूरकरमंदार मांडकेराहुल रोकडेसचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.

'टॉर्टुगा मोशन पिक्चर्सनिर्मित 'मोऱ्या'मध्ये उमेश जगतापसंजय भदाणेधनश्री पाटीलराहुल रोकडेसुरज अहिवळेरुद्रम बर्डेकुणाल पुणेकरशिवाजी गायकवाडदीपक जाधवविजय चौधरीअविनाश पोळरुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात उमेश जगतापसंजय भदाणेधनश्री पाटीलरुद्रम बर्डेकुणाल पुणेकर आणि शीर्षक भूमिकेत जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रातही प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment