Friday, 7 June 2019

CCI Badminton, young Taarini wins

तारीनीला दुहेरी जेतेपद 
  मुंबई, 7 जून 

तारिनी सुरीने ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन आयोजित ग्रेटर मुंबई जिल्हा बॅडमिंटनअजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या 17 वर्षाखालील व 15 वर्षाखालील गटाचे जेतेपद मिळवले. क्रिकेट क्‍लबऑफ इंडिया येथे सामने पार पडले.  फोर्टच्या जे. बी,पेटीट स्कूलमधील सातव्या इयत्तेत शिकणा-या 12वर्षीय तारीनीने चेंबूरच्या सेंट ग्रेगॉरियस हायस्कूलच्या 11 वर्षीय नैशा कौर भातोयेला दोन्ही गटातीलअंतिम सामन्यात दुहेरी जेतेपद मिळवले.
    मुलींच्या 17 वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात तारिनीने नैशाविरुद्ध 21-14, 12-21, 21-10असा विजय मिळवला.  एक तासाच्या विश्रांतीनंतर 15 वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात तारीनीसमोर पुन्हा नैशाचे आव्हान होते. या सामन्यात तारीनीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला गेम 15-21 असा गमाविल्यानंतर तारिनीने 21-19, 22-20 असा सलग गेम जिंकत जेतेपदावर आपले नावकोरले. शेवटच्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पहायला मिळाली पण, तारीनीने बाजी मारली. यादोघी पुन्हा एकदा 13 वर्षाखालील गटात एकमेकांसमोर खेळणार आहेत.
    मुलांच्या 17 वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात दुस-या मानांकित आर्यवर्धन जाधवने अव्वलमानांकित डॅरियस पारदीवालाला 21-12, 21-8 असे पराभूत केले. मुलींच्या 10 वर्षाखालील गटातीललढतील अनन्या येळवेने अनन्या काटदरेला 21-12, 21-17 असे तर, मुलांच्या गटात के.दुर्गेशने सिधबोथराला 21-7, 21-6 असे पराभूत करत बाजी मारली.
  महिला एकेरीच्या उपांत्यफेरीच्या लढतीत दोन आघाडीच्या खेळाडूंना पराभूत व्हावे लागले. अव्वलमानांकित करीना मदनला बिनमानांकित अक्षया वारंगकडून 21-15, 10-21, 19-21 असे नमविले. तर,बिनमानांकित रिया आरोळकरने दुस-या मानांकित सामिआ शाहला 21-14, 21-19 असा पराभूत केले.
- मुलीं 10 वर्षाखालील एकेरी ( अंतिम सामना) : अनन्या येळवे वि.वि. अनन्या काटदरे 21-12, 21-17    
- मुले 10 वर्षाखालील एकेरी ( अंतिम सामना) : के.दुर्गेश

No comments:

Post a Comment