Saturday 26 October 2019

सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा – कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ २७ ऑक्टोबर दु. १२ वा. कलर्स मराठीवर

मुंबई २६ ऑक्टोबर, २०१९ : "कुटुंब" म्हटलं की सुख दुःखात साथ ही आलीच. कुटुंबामध्ये जिव्हाळा, प्रेम, माया, रूसवे – फुगवे हे पण आलेच. प्रेक्षकांवर अनेक वर्षांपासून विविध रंगाची उधळण करत असलेले मनोरंजन विश्वातील एक कुटुंब ज्याने रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये बहूरंगी मनोरंजक कार्यक्रमामधून अल्पावधीतच आपली विशेष ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले, ते कुटुंब म्हणजे “कलर्स मराठी”... या कुटुंबाला साथ लाभली ती आपणासारख्या मायबाप प्रेक्षकांची ज्यांनी कार्यक्रमांवर भरभरून प्रेम केले आणि अजूनही करत आहात. महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांचे वाहिनीशी एक अतूट नाते जोडले आहे. मालिकांतील व्यक्तिरेखांशी रसिकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. किंबहूना या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरातील अत्यंत महत्त्वाच्या भाग बनल्या आहेत. आता हेच ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी कलर्स मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे आपल्या माणसांचा “आनंद सोहळा”. कोणते कुटुंब ठरले सगळ्यात लोकप्रिय, कोणती जोडी ठरली लोकप्रिय ? कोणत्या कलाकारांनी पटकवला लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री होण्याचा मान ? तुमच्या साठी, तुमच्या सोबत, तुम्हाला आनंद देण्यासाठी कलर्स मराठी घेऊन आले आहे सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा -  कलर्स मराठी अवॉर्ड २०१९. आपण देखील या सोहळ्यात सामील होऊया २७ ऑक्टोबर रोजी दु. १२ वा. आपल्या कलर्स मराठीवर.  
मनोरंजनाच्या नव्या पर्वामध्ये मराठी रसिकांसमोर मनोरंजनाचा एक नवा मापदंड उभा करण्यात कलर्स मराठी वाहिनाचा मोलाचा वाटा आहे. पहिल्यावहिल्या कलर्स मराठी अवॉर्डमध्ये लोकप्रिय मालिका या विभागाच्या स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली पण बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेने लोकप्रिय मालिकेचा मान पटकावला आणि लोकप्रिय नायक आणि नायिकेचा मान मिळाला सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेतील सिद्धार्थ आणि अनुश्रीला... तर जीव झाला येडापिसा मालिकेमधील लष्करे कुटुंब ठरलं लोकप्रिय कुटुंब...लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा (विभागून) देण्यात आले घाडगे & सून मधील वसुधा आणि जीव झाला येडापिसा मालिकेतील मंगल. तर लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील पंच यांना मिळाला.
लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम ठरला सूर नवा ध्यास नवा. लोकप्रिय सूत्रसंचालक महेश मांजरेकर आणि लोकप्रिय व्यक्तिरेखा (विभागून ) बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील बाळूमाम आणि स्वामिनी मालिकेतील गोपिकाबाई यांना मिळाला... इतकेच नसून कलर्स मराठी अवॉर्ड मध्ये मालिकांच्या लेखकांना स्पेशल अवॉर्ड प्रदान करून कौतुकाची थाप दिली संतोष अयाचित, मधुगंधा कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, विकास पाटील, जितेंद्र गुप्ता, अश्विनी शेंडे, विरेन प्रधान, अरुणा जोगळेकर, आशीष पाथरे, विशाल बांदल...
कलर्स मराठी अवॉर्ड मध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे... आजवर मालिकांमध्ये प्रेक्षक ज्या कलाकारांना बघत आले आहेत त्याहून वेगळ्या अंदाज मध्ये ते या अवॉर्ड मध्ये दिसणार आहेत... दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भव्यदिव्य नृत्यासह भंडारा उधळून सोहळ्यामध्ये होणार आहे बाळूमामाच्या नावाचा जागर... ज्यांना आपण नकारात्मक भूमिकेमध्ये बघत आलो त्यांचादेखील एक वेगळा अंदाज डान्सच्या माध्यमातून दिसणार आहे तर अक्षय  – अमृताचा रोमांटिक डान्स प्रेक्षकांची माने जिंकणार तर शिवा – सिध्दी, अनू  सिध्दार्थची कधी न पाहिलेली केमेस्ट्रि देखील बघायला मिळणार आहे... सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातील अवघ्या महाराष्ट्राचा लाडका मॉनिटरची जादू अवॉर्ड मध्ये देखील बघायला मिळणार आहे.
आपण देखील सोहळ्यात सामील होऊया सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा -  कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ २७ ऑक्टोबर रोजी दु. १२ वा. आपल्या कलर्स मराठीवर.  

कलर्स मराठी अवॉर्ड  २०१९
सोहळा कुटुंबाचाआपल्या माणसांचा !!
No

विजेते

1
लोकप्रिय मालिका
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
2
लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम
सूर नवा ध्यास नवा
3
लोकप्रिय कुटुंब
लष्करे कुटुंब: जीव झाला येडापिसा
4
लोकप्रिय नायिका
अनु : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
5
लोकप्रिय नायक
सिद्धार्थ: सुखाच्या सरींनी हे मन बावरे
6
लोकप्रिय जोडी
अनु - सिद्धार्थ: सुखाच्या सरींनी हे मन बावरे
7
लोकप्रिय आई
सुंदरा (बाळूमामाची आई) : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
8
लोकप्रिय वडील
दत्तात्रय (अनुचे वडील) : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
9
लोकप्रिय सासू 
माई : घाडगे अँड सून
10
लोकप्रिय सासरे
यशवंत लष्करे : जीव झाला येडापिसा 
11
लोकप्रिय सून
अमृता : घाडगे अँड सून
12
लोकप्रिय भावंडं
 शिवा - सोनी: जीव झाला येडापिसा 
13
लोकप्रिय सूत्रसंचालक
महेश मांजरेकर : बिग बॉस मराठी  
14
लोकप्रिय शीर्षकगीत
सुखाच्या सरींनी हे मन बावरे
15
लोकप्रिय व्यक्तिरेखा (विभागून )
बाळूमामा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
गोपिकाबाई :स्वामिनी
16
लोकप्रिय सहाय्यक स्त्री व्यक्तिरेखा
सोनी : जीव झाला येडापिसा
17
लोकप्रिय सहाय्यक पुरुष व्यक्तिरेखा (विभागून )
तात्या : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
जलवा : जीव झाला येडापिसा 
18
लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा (विभागून )
मंगल : जीव झाला येडापिसा
वसुधा : घाडगे अँड सून
19
लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा
पंच :बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
20
लोकप्रिय बाल व्यक्तिरेखा (विभागून )
लहान बाळू : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
रमा : स्वामिनी 

Special Awards
21
Special Award for Judges
Mahesh Kale & Avdhoot Gupte
22
Vacelin Healthy Glowing Skin Award
Spruha Joshi


23
P N Gadgil & Sons Fresh Face of the year
Female- Siddhi (Jeev Zala Yedapisa)


24
P. N. Gadgil & Sons Fresh Face of the year
Male- Shiva (Jeev Zala Yedapisa)




25
Spl Award for  Writers
Santosh Ayachit, Jeetendra Gupta, Ashwini Shende, Madhugandha Kulkarni, Chinmay Mandlekar, Vikas Patil,Viren Pradhan, Aruna Joglekar (G&S, Swamini), Ashish Pathare, Vaibhav Joshi, Vishal Bandal

No comments:

Post a Comment