'झी युवा' वाहिनीवर सुरू असलेली 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा, अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालेली आहे. १३ ललनांचा सहभाग असलेली ही स्पर्धा आता अधिक चुरशीची होऊ लागलेली आहे. परीक्षक मयूर वैद्य आणि सोनाली कुलकर्णी यांचा आता कस लागत आहे. स्पर्धकांच्या उत्तमोत्तम परफॉर्मन्समुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे. अद्वैत दादरकर याचे खुमासदार सूत्रसंचालन आणि स्पर्धकांमधील वाढलेली चुरस, यामुळे हा कार्यक्रम यशाची नवनवी शिखरे गाठत आहे. 'झी युवा' वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवीन गोष्टी घेऊन येत असते. 'युवा डान्सिंग क्वीन'मधून होणारे प्रेक्षकांचे मनोरंजन सुद्धा याला अपवाद ठरलेले नाही.
गंगा आणि अद्वैत यांची जुगलबंदी 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर सुरू असते. सर्व स्पर्धक दर्जेदार नृत्य सादर करत असल्यामुळे स्पर्धेतील चुरस वाढलेली आहे. स्पर्धकांचे नृत्य आणि गंगा व अद्वैतची एकेमेकांमधील स्पर्धा, असे दुहेरी मनोरंजन अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. या स्पर्धेतील, गेला आठवडा सर्वांसाठी विशेष ठरलेला आहे. सर्व स्पर्धकांनी, एका लहान मुलाच्या बरोबरीने आपली नृत्यकला सादर केली. डान्सिंग क्वीनच्या मंचावर, गोड आणि लाघवी मुले अवतरलेली असताना, एका खास पाहुण्याने सुद्धा हजेरी लावलेली होती. 'झी मराठी'वरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील लाडू, म्हणजेच सगळ्यांचा लाडका राजवीर, थेट कोल्हापूरहुन इथे आला होता. आपली लाडकी काकू धनश्री काडगावकर हिला भेटण्यासाठी, त्याने 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर हजेरी लावली होती. लाडूला पाहून धनश्री खूपच खुश झाली. एवढेच नाही, तर सोनालीने सुद्धा लाडूचे भरपूर लाड केले. त्याचे गोबरे गाल तिने ओढले, त्यावेळी राजवीरदेखील खुश झाला. 'स्लो मोशन में' आणि 'बाकी सब फर्स्ट क्लास हैं' या गाण्यांवर लाडूसोबत सोनालीने नृत्य सुद्धा केले. लाडूने या मंचावर इतर मुलांसोबत सुद्धा खूप धमाल केलेली पाहायला मिळाली.
असेच मजेशीर किस्से आणि धमाल अनुभवण्यासाठी, पाहायला विसरू नका, 'युवा डान्सिंग क्वीन', बुधवार ते शुक्रवार, रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!!
No comments:
Post a Comment