आलटून पालटून प्रेक्षकांना खळखळून हसवेल - अशोक सराफ
अशोक सराफ या जेष्ठ अभिनेत्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक-प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. कित्येक वर्ष प्रेक्षकांना विविध चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमातून मनोरंजित करणारे अशोक मामा आता एका 'हॉरर कॉमेडी' चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज होणार आहेत. येत्या रविवारी 'टॉकीज प्रीमियर लीग' मध्ये आलटून पालटून हा टॉकीज ओरिजनल चित्रपट प्रेक्षक दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता पाहू शकतील. अशोक सराफ यांच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल साधलेला हा खास संवाद
१. या चित्रपटाबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल?
या चित्रपटाची कथा फारच मजेदार आहे. आम्हा २ भावांची कथा यात दाखवण्यात आलेली आहे. धाकट्या भावाचं लग्न जमवण्यासाठी खूप प्रयत्न करून देखील स्वतःच्या मालकीचं घर नसल्यामुळे त्याचं लग्न काही जमत नाही आणि असलेलं भाड्याचं घरही या दोघांना सोडावं लागतं. नंतर त्यांना खूप प्रयत्न करून एक पडका वाडा मिळतो आणि त्या वाड्यामध्ये ते दोघे राहायला जातात. पण त्या वाड्या मध्ये राहायला गेल्यावर त्यांना जे काही अनुभव येतात आणि त्यातून जी काही धमाल होत जाते, वेगवेगळे प्रसंग घडत जातात त्याचं चित्रण म्हणजेच "आलटून पालटून".
२. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल ..?
मी या चित्रपटात धनंजयची भूमिका साकारतोय. मी मोठा भाऊ आणि माझ्या धाकट्या भावाची भूमिका साकारली आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विनोदी अभनेता भाऊ कदम. तो रिक्षा चालवत असतो आणि माझं कपड्याच दुकान असतं.
३) हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे आणि त्यात अनेक कलाकारांची फौज देखील आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप नवरे यांनी केला आहे. संदीप हा अतीशय उत्तम दिग्दर्शक आहे. कॉमेडी काय आणि कशी असायला हवी याची उत्तम जाणीव त्याला आहे. माझ्या सोबत चित्रपटात असलेले बाकीचे कलाकार भाऊ कदम, सुनील तावडे, किशोरी आंबिये, संदीप पाठक, स्मिता शेवाळे, विनय येडेकर यांनी आपल्या भूमिका उत्तम साकारलेल्या आहेत. या सर्व कलाकारांना कॉमेडी उत्तम जाण तर आहेच पण सर्वांनी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण केलेली आहे.
४) लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद आहेत, अशातच झी टॉकीज 'टॉकीज ओरिजिनल'च्या माध्यमाने घर बसल्या प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपटांची मेजवानी सादर करत आहे , या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल?
आज देशामध्ये फार बिकटत परिस्तिथी आहे कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे . कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीये. सर्वच फार कंटाळलेले आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वजण कसोशीने प्रयत्न करत आहोत. म्हणूनचं तुमच्या त्रासलेल्या, कंटाळलेल्या जीवावर फुंकर घालण्यासाठी झी टॉकीज तुम्हाला वेग वेगळ्या चित्रपटांची मेजवानी दर रविवारी देत आहे. मी पण न चुकता दर रविवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता या चित्रपटांचा आस्वाद घेत आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या रविवारी हॉरर कॉमेडी असलेला आलटून पालटून पहिल्यांदाच तुमच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट तुम्हाला नक्कीच खळखळून हसवेल याची मला खात्री आहे.
तर पाहायला विसरू नका आलटून पालटून येत्या रविवारी म्हणजेच २६ एप्रिल २०२० रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.
No comments:
Post a Comment