लॉकडाउन च्या काळात प्रेक्षकां चे भरभरून मनोरंजन करण्यासाठी झी टॉकीज वर सुरु असलेल्या टॉकी ज प्रीमियर लीग ला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. मागील काही रविवारी प्रेक्षकां नी विविध कथानक असलेल्या चित् रपटांची मेजवानी घेतली. या रवि वारी म्हणजेच ३ मे रोजी बच्चे कं पनी साठी झी टॉकीज एक खास मे जवानी घेऊन येत आहे "टॉकीज प्री मियर लीग" मध्ये.
भारताने तब्बल २८ वर्षांनंतर जे व्हा मुंबई मध्येच क्रिकेट वर् ल्ड कप जिंकला होता तेव्हाची, "खारी" आणि "बिस्कीट" या भावंडां ची हि एक गोष्ट आहे.
अवघ्या सहा वर्षांची खारी म् हणजेच "वेदश्री खाडिलकर" आणि नऊ वर्षां चा बिस्कीट म्हणजेच "आदर्श कदम" यांना घेऊन संजय जाधव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. संजय नार्वेकर,सुशांत शेलार, नं दिता पाटकर, संजीवनी जाधव या अ नुभवी कलाकारांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. या चित् रपटाला अमितराज आणि सूरज-धीरज या जोडी ने संगीतबद्ध केलं आहे. तर कुणाल गांजावाला यांनी या चि त्रपटाचं टायटल साँग गायलं आहे. एकूणच चित्रपटातील सुरेल गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करती ल यात शंकाच नाही.
खारी हे जग आपल्या डोळ्यांनी बघू शकत नसली तरी त्या डोळ्यातली तिची स्वप्नं मात्र खूप मोठी अस तात. खारीच्या प्रत्येक स्वप्ना ला खरं करून दाखवणं हेच जणू बि स्कीट च्या जगण्याचं ध्येय आहे . हसत खेळत सगळं सुरळीत सुरु अस ताना खारी बिस्कीटसमोर एक अजब ह ट्ट करते. भारतात, मुंबई मध्ये सुरु असणाऱ्या वर्ल्डकपचा थरा र खारीला अनुभवायचा असतो. त्या मुळे ती वर्ल्डकप मॅच स्टेडिअम मध्ये जाऊन बघण्याचा हट्ट बिस् किट कडे करते. आणि मग सुरु हो तो भाबड्या स्वप्नांचा गोड ति तकाच हृदयस्पर्शी पाठलाग. आपल् या बहिणीला स्टेडिअम मध्ये जाऊन मॅच दाखवायचीच असा चंग बिस्किट बांधतो.
लाडाची , प्रेमाची बिस्कीट ची क्यु ट राजकुमारी "खारी" प्रेक्षकां च्या भेटीला येत आहे. आता या खा रीला बिस्किट स्टेडिअम मध्ये ने ऊन मॅच दाखवतो का ? या छोट्या शा राजकुमारी ची सर्व स्वप्न पू र्ण करण्यासाठी बिस्कीट काय काय करामती करतो.? त्याला कोणकोणत् या अडचणींचा सामना करावा लागतो? कोणकोण त्याला या सगळ्यात मदत करतं ? यासाठी नक्की पहा "खारी बिस्कीट" येत्या रविवारी म् हणजेच ३ मे रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.
No comments:
Post a Comment