Wednesday, 25 August 2021

वैद्यकीय निदान त्वरीत करून घेण्यास लोकांना उद्युक्त करण्यासाठी ‘टाटा हेल्थ’ची #SochMatPoochLe ही देशव्यापी मोहीम सुरू

»       विश्वासार्हलवकर व योग्य निदान मिळवण्याचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी टीव्हीसी व डिजिटल फिल्म यांचा वापर

मुंबई25 ऑगस्ट2021 : एखाद्या दुखण्याची काही लक्षणे वा आरोग्यविषयक समस्या दिसू लागल्यास अनेकजण अतिविचार करू लागतात. वेगवेगळ्या शंकांमुळे त्यांच्या मनात एक द्वंद्व सुरू होते. ही सवय त्यांनी सोडून द्यावी आणि तज्ज्ञांना विचारून वैद्यकीय निदान वेळेवर शोधावेअसा सल्ला देणारी #SochMatPoochLe ही एक नवीन टीव्ही जाहिरातपट मालिका (टीव्हीसी) आणि डिजिटल चित्रपट टाटा हेल्थ या कंपनीने सादर केले आहेत.

यातील टीव्हीसी देशभरात हिंदी भाषेत सादर झाली असून डिजिटल चित्रपट कन्नडतेलुगू व तामिळ या अन्य तीन भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.

एखाद्याने स्वत:च निदान करण्याऐवजी आणि त्यातून स्वतःचे आरोग्य धोक्यात आणण्याऐवजीत्याला कोणतीही लक्षणे अनुभवास आल्यासत्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावायावर  ‘#SochMatpoochLe’ ही जाहिरात जोर देते. परिस्थिती गंभीर बनू नयेयासाठी लोकांनी वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा. छातीत दुखणेडोकेदुखीपोटदुखी किंवा पाठदुखी ही दुखणी असल्यासही लक्षणे सौम्य किंवा गंभीर स्वरुपाच्या आजाराची असू शकतातअसे थट्टेच्या स्वरुपातीलहलक्या-फुलक्या रितीचे संभाषण या चित्रपटात आहे. कोणताही विश्वासार्ह नसलेला सल्लाकसलीतरी घरगुती औषधेस्वतःच केलेली स्वतःची चिकीत्सा यांचा अवलंब केल्यासत्यांचे दुष्परिणाम होऊ शकतातअसे यात दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटात आरोग्याच्या लक्षणांमुळे उद्भवणारी भीती आणि गोंधळ यांचे चित्रण करण्यात आले आहे. या गोंधळामुळेच अनेकदा अचूक निदान करण्यास विलंब लागत असतो आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 'इतरांना असे होऊ शकतेपण मला नाही', असे मानण्याची प्रवृत्ती माणसामध्ये असतेयातूनच एखादी व्यक्ती चुका करू शकते आणि काही गंभीर इशाऱ्यांकडे तिचे दुर्लक्ष होऊन त्यातून आरोग्याची आणीबाणी निर्माण होऊ शकतेअसे या चित्रपटातून निदर्शनास आणण्यात आले आहे.

नवीन जाहिरात मोहिमेबद्दल बोलताना टाटा हेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंझूर अमीन म्हणाले, “कोविड-19 साथीने आपल्याला प्रतिबंधात्मक आणि सक्रिय वैद्यकीय सेवेचे महत्त्व दाखवून दिले आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा लोकांना सुलभतेने उपलब्ध व्हाव्यातअसा टाटा हेल्थमध्ये आमचा प्रयत्न असतो. अनारोग्याबाबतचे एखादे लक्षण दिसून आलेतर लोकांनी स्वतःच त्याची चिकीत्सा करीत बसण्यापेक्षा आणि आपले आरोग्य धोक्यात घालण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला घ्यावायाचे महत्त्व नमूद करण्यावर आमच्या नवीन जाहिरातींमध्ये भर देण्यात आला आहे. सर्वोत्तम स्वरुपाचे तंत्रज्ञान आणि वैद्यकीय विज्ञान यांचा उपयोग करून, टाटा हेल्थ हे अल्पावधीतच भारतातील सर्वात विश्वसनीय हेल्थ अॅप्सपैकी एक बनले आहे. लोकांपर्यंत व्यक्तिगत पातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचावीया हेतूने आम्ही डॉक्टरांच्या एका पथकासोबत सातत्याने काम करीत असतो. आम्हाला आशा आहे की ही जाहिरात मोहीम लोकांना वेळेवर वैद्यकीय मदत घेण्यास प्रोत्साहित करील.

हा चित्रपट मॅवरीक आणि मंक कम्युनिकेशन्सने बनवला आहेटीव्हीसीबाबत भाष्य करताना, ‘मॅवरीक आणि मंक कम्युनिकेशन्सचे मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी व संस्थापक भावेश दोशी म्हणाले, “लोकांना अतिविचार करण्यापासून रोखण्याचा या जाहिरात मोहिमेचा हेतू आहे. यामागील धोरण असेकी बहुतेक वेळा आपण आपल्या डोक्यात विचारांचा गुंता करून राहतो; विशेषतःजेव्हा आपण काही प्रकारची लक्षणे अनुभवतो. आपण चांगलेवाईटअतिवाईटअशा विविध शक्यतांचा विचार करू लागतो. यामुळे आपल्या डोक्यात एक वाद निर्माण होतोजो अंतहीन असू शकतो व त्यातून कोणतेही वास्तविक निदान होत नाही. ‘#SochMatPoochLe’ ही एक आगळीवेगळीहलकीफुलकी जाहिरात मोहीम आहेजी लोकांना त्यांच्या 'विचारकरण्याच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेतसेच त्यांना योग्य वैद्यकीय निदान करण्यासाठी अॅपवर सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित करते.

लिंक्स –

·         छातीत दुखणे - https://youtu.be/Lb1nAZC2lGY

·         पोटदुखी - https://youtu.be/TFz7txKQ9Bs

·         डोकेदुखी - https://youtu.be/roJ61534JvI

·         पाठदुखी - https://youtu.be/rahB7iM8P5c

About Tata Health

TATA Health is part of Tata Industries and is the Digital Health arm of the TATA group, setup with the vision of providing predictive, preventive, and personalised healthcare to consumers. Itoffers a full suite of health services including instant doctor consultation service supported by a network of curated Physicians and Specialists.  It is committed to provide enhanced access and quality primary healthcare. Leveraging the best in technology and medical science, Tata Health has become one of India's most trusted health apps today.

The company has built a robust, secure and intelligent platform that allows seamless connection to doctors across more than 15 specialities. It seeks to understand consumers deeply and help enhance their health and happiness. More than 6 Lakh users have benefitted from the services being offered.

TATA Health is headquartered in Bangalore, Karnataka is driven by a highly qualified and passionate team. It is growing rapidly and has significant plans to expand its scale and scope of services

TATA Digital Health services can be accessed via their website (PWA) and the app on the Google Play store for Android and iOS users. To know more please visit: https://www.tatahealth.com/

 

No comments:

Post a Comment