Monday, 17 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १४ ! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कुजबुजण्यास सक्त मनाई आहे - योगेशचा विकासला सल्ला ! आम्ही त्यांच्याबरोबर नाही हे लक्षात ठेव - किरण माने !

मुंबई १४ ऑक्टोबर, २०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकास, किरण माने एका विषयावर चर्चा करत असताना योगेश विकासला सल्ला देताना दिसणार आहे "बिग बॉसछाया घरात कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे" विकास त्यावर योगेशला म्हणाला "हे सगळ्यात जास्त तुलाच शोभतं आहे. किरण माने यांना योगेशने विचारले काय म्हणणं आहे ? त्यावर ते म्हणाले, “तुला बोलो कि फिक्स आहे तो नाही पाहिजे. तुझ्या बरोबर जे आहेत त्यांचे तू सांभाळ, तो नाही पाहिजे. तू काय ते सांगायची वाट बघतो आहे आम्ही... तुझी घुसमट झाली आहे, बॉण्ड मध्ये अडकला आहे तू. गंमत करतो आहे मी, नाही करू शकतं का? चेष्टा पण करायची मुश्किल झाली आहे इथे.आम्ही वेगळे झालो तर त्यांना नॉमिनेट पण करू, आम्ही त्यांच्याबरोबर नाही हे लक्षात ठेव. विकास त्यावर म्हणाला, "तो इथे पण बोलतो आणि तिथे पण बोलतो, तुझं तोंड उघडतं नाही लवकर. या चर्चेनंतर आता हे कोणाला नॉमिनेट करणार हे बघूया आजच्या भागामध्ये. 

आता हे तिघे नक्की कोणाबद्दल बोलत आहेत? हे  जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. 

No comments:

Post a Comment