Wednesday, 27 September 2023

‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेला युरोप भेटीचे निमंत्रण!

युरोपियन देशांतील लोकांना भारतातील नैसर्गिक संपत्तीमसाल्यातील व्यंजनांसोबत येथील संस्कृती परंपरेने मोहिनी घातली आणि त्या चिजांच्या अमाप लुटीसोबत १९० वर्षांचे पारतंत्र्यरुपी जीवन हिंदुस्तानींवर लादत राज्य केले. आता याच युरोपियांना पुन्हा एका कारणासाठी हिंदुस्तानातील महाराष्ट्राची भुरळ पडली आहे..!.. मात्र ती भारतावर राज्य करण्याची नाही तर आपल्या एका तरुणाला भेटण्याची!...  त्या उमद्या मराठमोळ्या तरुणाचे नाव मोऱ्या’ उर्फ ‘सीताराम जेधे’ असे असून तो मराठवाडा - खानदेश - पश्चिम महाराष्ट्रविदर्भाच्या मध्यावर जोडणाऱ्या 'पिंपळनेर'चा रहिवाशी असल्याचे समजते. खास युरोपीय देशांनी आमंत्रण धाडल्याने मोऱ्या आणि त्याचा परिवार भलताच खुश झाला आहे. येत्या १ नोव्हेंबर २०२३ रोजी मोऱ्या’ योरोपीन देशांचा दौरा करणार असल्याचे समजते आहे. त्याच्यासोबत जेधे परिवारातील कोण कोण सदस्य जाणार हे स्पष्ट झाले नसले तरी त्याच्यासोबतच कुटुंबीयांचीहि व्हिजासाठी लगबग सुरु आहे.

हा 'मोऱ्या' नेमका कोण आहे? तो काय करतो? तो कुठे?कश्यासाठी? कोणाकडे? जातोय याबद्दल विशेष गुप्तता जेधे परिवाराने बाळगल्याने सर्वांनाची उत्सुकता  शिगेला पोहचली आहे. मात्र याची 'मोऱ्याआणि त्याच्या कुटुंबियांना जाणीव असल्याने या उत्कंठावर्धक प्रवासाची ताजी बातमी देण्यासाठी सामाजिक व्यासपीठाचा’ वापर करण्याचे मोऱ्याच्या कुटुंबीयांनी निश्चित केले आहे. आम्ही 'मोऱ्या'चा युरोप दौरा कश्यासाठी आहे? त्याचा नेमका उद्देश काय आहे? तो तिथे जावून नेमके कोणते कार्य करणार आहे? त्याला कोणत्या देशांनी आमंत्रित केले आहे? अशी दौऱ्याची इत्यंभूत माहिती प्रसारित करू...असे या दौऱ्यात सहभागी असलेल्या एका खाजगी संस्थेच्या प्रवक्त्याने नाव न छापण्याच्या बोलीवर खाजगीत सांगीतले आहे...

No comments:

Post a Comment