सर्व क्षेत्रांना सामावून घेणारे आतिथ्य केंद्र बनवणे
· एकॉर आणि इंटरग्लोब देशातील आपली स्वतःच्या मालकीची संपत्ती, विकास आणि व्यवस्थापन व्यवसायांना एकत्र आणून एक स्वायत्त, एकीकृत मंच बनवतील.
· हे नवीन युनिट भारतात एकॉरच्या सर्व ब्रॅंड्सना पुढे नेण्यासाठीचे एक विशेष माध्यम बनेल. यामध्ये एनिसमोरचे लक्झरी आणि लाइफस्टाइल ब्रॅंड एकॉरच्या झपाट्याने वाढणाऱ्या आतिथ्य पोर्टफोलियोमध्ये सामील आहेत.
· एकॉर संचालन आणि ब्रॅंड व्यवस्थापनाचे नेतृत्व करणे चालू ठेवेल आणि आपले ब्रॅंड्स आणि सेवांपर्यंत संपूर्ण पोहोच प्रदान करेल.
ट्रीबो सोबत विशेष भागीदारी
· ट्रीबो हा भारताच्या आघाडीच्या ब्रॅंडेड बजेट हॉटेलांच्या प्लॅटफॉर्मपैकी एक असून तो आपल्या अद्वितीय टेक्नॉलॉजी-प्रेरित दृष्टिकोनाच्या व कुशल वितरण प्रणालीच्या माध्यमातून 120 शहरांत 800 हॉटेल्सचे व्यवस्थापन करतो. एकॉर आणि इंटरग्लोब संयुक्तपणे गुंतवणूक करून ट्रीबो मधील सर्वात मोठे भागधारक बनतील. मास्टर लायसन्स कराराच्या माध्यमातून भारतात आयबिस आणि मर्क्योर ब्रॅंड्स विकसित करण्यासाठी ट्रीबो पुढाकार घेईल.
· या भागीदारीअंतर्गत, ट्रीबोने दहा नवीन मर्क्योरसाठी स्वाक्षरी करण्यासाठी विविध मालमत्ता मालकांशी एक करार केला आहे, जो भारतात ब्रॅंडच्या विस्तारातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
· एकॉरचे ब्रॅंड भारतातील विशाल अनब्रॅंडेड हॉटेल मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी ट्रीबो च्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा फायदा घेतील. एकॉर आणि ट्रीबो यांचा संयुक्त पोर्टफोलियो भारतातील तिसरी सर्वात मोठी आतिथ्य कंपनी बनवेल, ज्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त खोल्या असतील.
भारतीय हॉस्पिटॅलिटी आणि भारतातील एकॉर ब्रॅंड्ससाठी एक गेमचेंजर
भारतात आतिथ्य उद्योगात बदल करण्याच्या सामाईक व्हिजन आणि महत्त्वाकांक्षेसह इंटरग्लोब आणि एकॉर यांच्यातील ही युती 2030 पर्यंत एकॉर ब्रॅंडच्या अंतर्गत 300 हॉटेल्सच्या ध्येयासह भारतात एकॉरच्या उपस्थितीला गती देण्यास सिद्ध आहे. एकॉरची जागतिक आतिथ्य क्षेत्रातील निपुणता, इंटरग्लोबचे बाजाराचे सखोल ज्ञान आणि उद्यमशील दृष्टिकोन आणि ट्रीबोच्या इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी-प्रेरित यशस्वी हॉस्पिटॅलिटी संचालनाचा लाभ घेऊन ही भागीदारी भारतात आतिथ्य क्षेत्राची नव्याने व्याख्या करण्यास सज्ज आहे.
एकॉरचे अध्यक्ष आणि CEO सेबास्टियन बेझिन म्हणाले, “ही ऐतिहासिक भागीदारी भारतात एकॉर आणि त्याच्या ब्रॅंड्ससाठी एक बदलाचा क्षण आहे. इंटरग्लोब या आमच्या जुन्या, यशस्वी आणि विश्वासार्ह भागीदाराशी संलग्न होऊन आणि भारतात आतिथ्य, टेक्नॉलॉजी आणि उद्योजकता यांमधील उत्कृष्टता एकत्र आणून आम्ही जगातील सर्वात रोमांचक प्रवास बाजारांपैकी एका बाजारात अभूतपूर्व विकास क्षमता अनलॉक करत आहोत.”
इंटरग्लोब एंटरप्राइझेसचे ग्रुप मॅनिजिंग डायरेक्टर राहुल भाटिया म्हणाले, “इंटरग्लोबमध्ये आम्ही नेहमी आमच्या भागीदारांशी आणि आम्ही ज्यांना सेवा देतो त्या अतिथींसोबत सार्थक आणि स्थिर नाती निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर विश्वास ठेवला आहे. आज, या धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून एकॉर सोबतचे आमचे दोन दशकांचे नाते आणखी दृढ करताना आम्हाला आनंद होत आहे. इंटरग्लोबची मार्केटची सखोल समज, एकॉरच्या जागतिक दर्जाच्या सेवा, भारताचा गतिशील विकास आणि बदलते प्रवास क्षेत्र या पार्श्वभूमीवर आमचे लक्ष्य आमच्या अतिथींना असामान्य मूल्य प्रदान करून, या उद्योगात उत्कृष्टतेचे नवीन मापदंड स्थापित करून आदरातिथ्याच्या अनुभवाची नव्याने व्याख्या करण्याचे आहे.”
No comments:
Post a Comment