Wednesday, 30 June 2021

"वर्क फ्रॉम होम" करणाऱ्यांसाठी "गामा फाउंडेशन"चा अनोखा उपक्रम सोबत बालदोस्तांची सुरस गायन स्पर्धा संपन्न !

'गामा फाऊंडेशन' तर्फे एक अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.ॲडव्हायझर्स इन मेडिको मार्केटिंग व मॅनेजमेंटचे सीईओ आणि  झुवीयस लाईफसायन्सेस, मुंबईचे  टेक्निकल अफेअर्स डायरेक्टर, डॉ. उल्हास गानू यांच्या सोबत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जून अखेरीस 'योग सप्ताह' आयोजित केला होता. सध्याच्या कोरोना काळात लोकांना "वर्क फ्रॉम होम" करावं लागत आहे. दिवसभर आपण एका जागी बसून काम करतो. त्याचा ताण आपल्या शरीरावर पडतो. जर आपण काम करतानाच योगा करू शकलो तर ?
"वर्क फ्रॉम होम" करताना योगा कसा करावा. याचे रेकॉर्डेड व्हिडिओ योग सप्ताह मधे दाखवण्यात आले. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. २६ जूनला शेवटचा प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर, खास लोकाग्राहत्सव अजून एक व्हिडिओ काल प्रसारित करण्यात आला. हा विषयच मुळात वेगळा आहे. त्याकरिता 'गामा फाऊंडेशन'ने एक छोटासा प्रयत्न केला याचा आम्हाला आनंद आहे. लोकांनी काम करताना आपले आरोग्य जपण्यासाठी योग साधनेकडे वळावं हा हेतू सफल होत आहे. 
गामा फाऊंडेशन प्रस्तुत किड्स ऑनलाईन सिंगिंग स्टार' २०२१ गायन स्पर्धा संपन्न!
गामा फाऊंडेशन "सूरताल कराओके सिंगिंग स्टार"च्या स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. या दरम्यान लहान मुलांच्या गाण्याच्या स्पर्धा घेण्याची विनंती काही प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. गामा फाऊंडेशनने त्यांच्या इच्छेचा मान ठेवून २७ जूनला 'फेसबूक लाईव्ह' द्वारे किड्स ऑनलाईन गाण्याची स्पर्धचे आयोजन केले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ १५० च्या आसपास प्रवेशिका आल्या. हा शो देखील विनामूल्य ठेवण्यात आला होता. लहान लहानमुलांमध्ये तयारीचे गायक असल्याचे या स्पर्धेतून जाणवले. अशी स्पर्धा 'गामा फॉउंडेशन'ने आयोजित करून चिमुकल्यांच्या गायन कलेला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
'किड्स ऑनलाईन सिंगिंग स्टार'च्या अंतिम फेरी करता १२ मुलांची नाव शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. दोन वेगळंवेगळ्या वयोगटातून प्रत्येकी ६ मुलांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदिन अर्चना पटवर्धन यांनी केले आणि स्पर्धेचे परीक्षक ख्यातनाम पार्श्वगायक जयदीप बगवाडकर होते.
लहान मुलांना जयदीप जींनी स्पर्धा सुरु व्हायच्या अगोदर एक छान मेसेज दिला, "मुलांनी गाणं एन्जॉय करून गाण्याचा प्रयत्न करा, नुसतं स्पर्धेचा विचार करू नका., मुलांनी नुसतं स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळण्याकरिता गायन करू नये, आपलं स्वतःच ओरिजिनल गाणं गाण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी सुद्धा तसा प्रयत्न करावा." असे त्यांनी सांगितले.
आर.डी.बर्मन -पंचमदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "रिमझिम गिरे सावन" या गाण्यापासून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. जवळ जवळ दीड तास ही स्पर्धा रंगली होती. मुलांना त्यांच्या आवडीची गाणी गाता आली. १२ स्पर्धकांमधून अंतिम फेरीत ६ स्पर्धक निवडण्यात आले. जाहीर केल्याप्रमाणे स्पर्धकांना ३ पारितोषिके एका गटामध्ये असे एकूण ६ पारितोषिकांचा चेक, कार्यक्रमाचे चीफ गेस्ट, गिरगावातील कुलकर्णी ऑप्टिशियन्सचे श्री प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. अर्थात चेक आणि स्पर्धेचे सर्टिफिकेट त्यांच्या निवासी पत्त्यावर पोचते करण्यात आले आहे. ५ ते १२ गटातील पहिले, दुसरे आणि तिसरे,अ नुक्रमे अक्षरा कामत, अद्वैत नायर आणि स्वरा केळकर दुसऱ्या  १३ ते १७ गटातील पहिले, दुसरे आणि तिसरे, अनुक्रमे श्रावणी चव्हाण, पारस साळवी आणि गायत्री देव विजेते ठरले.
प्रसिद्धी सहाय्यक : गार्गी राम कोंडीलकर

1 comment: