Tuesday, 26 July 2022

'सीतेची गोष्ट'चे रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटरमध्ये शनिवार ३० जुलै २०२२ रोजी संध्या. ५:०० वा. अभिवाचन!

 नव्याने समजून घेतलेली 'सीतेची गोष्ट'चे अभिवाचन!  

रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटरमध्ये शनिवार ३० जुलै २०२२ रोजी संध्या. ५:०० वाजता.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील मिनी ऑडिङोरिअम मध्ये 'अॅडफिझप्रस्तुत 'सीतेची गोष्टया दीर्घ कथेचे अभिवाचन सादर केले जाणार आहे. डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी या दीर्घकथेचे वाचन करतील. सुप्रसिद्ध जेष्ठ लेखिका डॉ. अरुण ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून 'सीतेची गोष्टही दीर्घकथा उतरली आहे. रामाने सीतेचा त्याग का केला?, ती वाल्मिकीच्या आश्रमात कशी पोहचलीत्याक्षणी तिच्या मनात कोणते विचार होतेकाय भावना होत्याअश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'सीतेची गोष्टया दीर्घकथेचे अभिवाचन केले जाणार आहे. अभिवाचनानंतर श्रोत्यांशी संवादही साधला जाणार आहे. डॉ. वंदना बोकील या कथेचे अभिवाचन करणार असून त्या उत्तम वाचक आणि साक्षेपी आस्वादक आहेत. त्या लेखिका डॉ.अरुणा ढेरे यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत.

शनिवारी ३० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजतारवींद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटर येथे का कार्यक्रम संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य असूनकाही रांगा राखीव असणार आहेत. अधिकाधिक रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे निमंत्रक डॉ. माधुरी आणि विनायक गवांदे व प्रस्तुतकर्ते महेंद्र पवार यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment