Thursday 30 March 2023

स्टोरीटेल मराठीचे "एप्रिल पुल"!

लोकप्रिय मराठी विनोदी लेखकशिक्षकवक्तेपटकथालेखकनाटककारनकलाकारकवीसंगीतकारगायकपेटीवादकअभिनेते म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आपले भाई उर्फ पु.ल. देशपांडे. जगभरातील त्यांच्या असंख्य साहित्यप्रेमींसाठी 'स्टोरिटेल मराठीएक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. एप्रिल महिना हा स्टोरिटेल मराठीवर "एप्रिल पु" असणार आहे. पुलंच्या पुस्तकांची 'ऑडिओ बुक्ससंपूर्ण एप्रिल महिनाभर विश्वभरातील रसिकांना ऐकता येणार असल्याने खऱ्या अर्थाने रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दर आठवड्याला पुलंचे एक लोकप्रिय पुस्तक नामवंतांच्या सुस्पष्ट आवाजात 'ऑडिओ बुक्सफॉरमॅटमध्ये 'स्टोरिटेल मराठीवरऐकता येईल. हा महिना एप्रिल फुल! करण्याचा नाही!! तर स्टोरीटेलवर 'एप्रिल पुऐकण्याचा आहे! या महिन्यात स्टोरीटेलवर दर चार दिवसांनी पुलंचे नवे ऑडिओबुक प्रकशित होणार आहे. १ एप्रिल रोजी 'गुण गाईन आवडीमधील काही लेख प्रकाशित होतील तर ४ एप्रिलला 'मैत्रहे ऑडिओबुक प्रकशित होणार आहे!!

एप्रिल महिन्यातील "एप्रिल पु"मध्ये दर आठवड्याला पुलंचं कोणतं पुस्तक 'ऑडिओ बुकफॉरमॅटमध्ये रसिकांना ऐकायला मिळणारआणि ते कोणत्या महनीय व्यक्तीच्या मधुर आवाजात असणारयाविषयीचं कुतूहल स्टोरीटेलने राखलं असून ही माहिती दर आठवड्याला स्टोरीटेलवरंच उघड केली जाणार आहे. स्टोरीटेल सातत्याने आपल्या साहित्यप्रेमी रसिकश्रोत्यांसाठी नवनवीन योजना आणून त्यांच्या आवडी निवडींना प्राधान्य देत असते. १ एप्रिल रोजी  'गुण गाईन आवडीमधील 'माझे एक दत्तक आजोबा', 'डॉ लोहिया : एक रसिक तापस', 'मंगल दिन आज', तर  ४ एप्रिलला 'मैत्रमधील 'नानासाहेब गोरे : प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेले', 'शाहू महाराज : एक धिप्पाड माणूस', 'हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार', 'जीवन त्यांना कळले हो', 'जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आयायांचा समावेश आहे. ही सर्व 'ऑडिओ बुक्सलोकप्रिय अभिनेता सौरभ गोगटे(Saurabh Gogate) यांच्या आवाजात आहेत.

'स्टोरीटेलया जगविख्यात समूहाने भारतीय प्रादेशिक साहित्याला ऑडिओ बुक्सद्वारेजागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली आहे. आपले मराठी साहित्य दीर्घकाळ टिकावे आणि नव्या पिढीसाठी हा वारसा जपला जावा याकरिता सर्वोत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे साहित्य 'ऑडिओ बुक्स'च्या माध्यमातून जतन करण्याचे बहुमोल कार्य 'स्टोरिटेलगेल्या पाच वर्षांपासून करीत आहे. आपल्या भाषेतील दर्जेदार आणि दुर्मिळ साहित्य अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा विडा स्टोरिटेलने उचलला आहे.

'स्टोरीटेलवर "एप्रिल पु"मधील पुलंचं लोकप्रिय साहित्य 'ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- भरून मराठी भाषेतील हजारो ऑडिओबुक्स ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून 'साहित्यश्रवणानंदघेता येईल.

*'पुलंची लोकप्रिय ऑडिओबुक्सऐकण्यासाठील लिंक*

https://www.storytel.com/in/en/books/gun-gaeen-awadi-2256406

https://www.storytel.com/in/en/books/maitra-2256407

No comments:

Post a Comment