Friday, 28 July 2023

"इतरांप्रमाणे मला माझ्या आवाजाचाही न्यूनगंड होता...." प्रसिध्द यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर


जगात प्रत्येकाचा आवाज युनिक आणि छानच असतोहे मला जाणवलं जेव्हा कसलीही गाण्याची पार्श्वभूमी नसताना 'व्हाइस अॅाफ इंडीया'चा 'व्हाइसओव्हर'साठी दिला जाणार पुरस्कार मला ;पेटलेलं मोरपीसया ओडिओबुकसाठी मिळाला. कोणीही जन्मजात उत्तम आवाज घेऊन जन्माला येत नाहीजर तुम्हाला कथेची समज असेल तर कुठल्याही आवाजात तुम्ही उत्तम पद्धतीने कन्टेट पोचवू शकताअसं प्रसिध्द यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सांगते. यूट्यूबबरोबरच व्हाइसओव्हर या क्षेत्रामध्ये तिने स्वतःचा ठसा उमटवला असून स्टोरीटेल प्लॅटफॅार्मसाठी अनेक पुस्तकांना तिने आवाज दिला आहे तसेच स्वतःच्या पॅाडकास्ट शोची सुध्दा निर्मिती केली आहे. अनेक वेगवेगळ्या कादंब-यांना तिने आवाज दिला आणि त्या स्टोरीटेलवर लोकप्रिय झाल्या.

आपल्याकडे उगाचच असा गैरसमज आहे की ज्याला गाता येतं त्याचाच आवाज छान असतो. त्यामुळे इतरांप्रमाणे मला माझ्या आवाजाचाही न्यूनगंड होता. त्यात माझा आवाज थोडा बेसचा आहेस्त्रीयांचा आवाज मंजूळ आणि पातळच असला पाहिजे तरच तो चांगला आवाज असाही अट्टाहास आहे. पण नाटकाचा अनुभव असल्यामुळे कथेतलं एखादं पात्र कसं बोलेल याचा मी आधीपासून अभ्यास करायचे आणि माझं तसं निरीक्षणही चालू असायचं. त्याचा उपयोग मला ओडिओबुकला आवाज देताना झाला. माझ्या आवाजातून निर्माण झालेली ती पात्र लोकांनाही खूप जवळची वाटायला लागली. आणि त्यातूनच माझा आवाज खूप चांगला आहे अशा प्रतिक्रीया येऊ लागल्या. असं उर्मिला म्हणाली.

स्टोटीटेलवर 'पेटलेलं मोरपीस', 'करसाळ', 'चिखले फॅमिली', 'अंशीअशा अनेक कथांना उर्मिलाने आवाज दिला आहे. त्यात 'पेटलेलं मोरपीसया कादंबरीसाठी तिला प्रतिष्ठित 'व्हाइस ओफ इंडियाया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तिच्या आवाजातल्या या कादंब-या सर्वाधिक ऐकल्या सुध्दा गेल्या त्यामुळे अनेक कथांचे दुसरे आणि तिस-या सिझनची निर्मितीही करण्यात आली.

व्हाइसओव्हर या क्षेत्रात मराठी भाषेत अनेक संधी उपलब्ध होत आहेत. स्टोरीटेलसारखी अनेक ओडीओबुक आणि पोडकास्ट प्लॅटफॅार्म यांना मराठी भाषेत कन्टेट निर्माण करायचा आहे कारण लोकांना आपल्या भाषेतच कथा ऐकण्यात आनंद वाटतो. त्यात मराठी भाषेला पुलवपुंमुळे कथा ऐकण्याचा वारसा देखील आहे. त्यामुळे नव्याने होत असलेलं क्षेत्र जोरदार पसरतंयत्यासाठी भाषेचीकथेची आवड आणि जाण पाहिजे. त्याचप्रमाणे थिएटरवतृत्वनिवेदन अशा उपक्रमांमध्ये तुम्ही सतत भाग घ्यायला हवाअसे उपक्रम तुम्हाला व्हाइसओव्हर आरटीस्ट होण्यासाठी नक्कीच मदत करतातअसंही उर्मिला सांगते.

उर्मिलाचे बहारदार ऑडीओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंक

https://www.storytel.com/in/authors/urmila-nimbalkar-62643

No comments:

Post a Comment