Tuesday, 6 February 2024

गायक जयदीप बगवाडकरचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 'ओ भाऊ ओ दादा ..', घराणेशाही आणि सत्तानाट्याचा खेळ रंगणार..!_बहुचर्चित ‘लोकशाही’ चित्रपट ९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!

 

'लोकशाहीहा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. घराणेशाहीतल्या या सत्तासंघर्षात नेमके काय आव्हान असणार आहे आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहेहे गुपित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत संजय अमर दिग्दर्शित 'लोकशाहीचित्रपटातील 'ओ भाऊ ओ दादा..',  हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला ५ फेब्रुवारीला आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजेसुप्रसिध्द गायक जयदीप बगवाडकर यांनी आजवर मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी संगीत क्षेत्रातील नामांकित दिग्गजगायिका श्रेया घोषालवैशाली सामंतबेला शेंडे तसेच गायक अवधूत गुप्ते यांच्यासोबत अनेक रिअॅलिटी शोज केले आहेत.

जयदीप बगवाडकर यांचे सूर लाभलेल्या या गाण्याचे बोल संजय अमर यांचे असून या गाण्यामधून अभिनेता अंकित मोहन चा डॅशिंग लूक दिसत आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशेसमीर धर्माधिकारीतेजश्री प्रधानभार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत लोकशाही सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. इतकंच नव्हे तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

'अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लिकंपनीचे एमडी आणि सीईओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी  सांगितले कीअल्ट्रा च्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक एव्हरग्रीन चित्रपटांची प्रस्तुती करत आलेलो आहोत. तसेच वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितीचा व प्रस्तुतीचा आमचा कल आहे. शिवाय या चित्रपटात राजकीय संघर्षावर आधारित 'ओ भाऊ ओ दादा..',  हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.'


बहुचर्चित लोकशाही’ चित्रपट ९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात विलक्षण अनुभव घेता येणार आहे.

राजकारणातील महिलांचं अस्तित्वघराणेशाहीसत्तासंघर्षनिवडणुकांची रणधुमाळीराजकीय कुरघोडीपक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल चित्रपटात पहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असून अंकित मोहनगिरीश ओकसमीर धर्माधिकारीभार्गवी चिरमुलेअमित रियानशंतनु मोगेप्रसन्न केतकरसुश्रुत मंकणीअजिता कुलकर्णीसोनल वाघमारे हे सुप्रसिद्ध कलाकार राजकारणाच्या भयाण खेळात धुरळा उडवणार आहेत.

लोकशाही ही एका घराणेशाहीतल्या एका मुलीच्या वैयक्तिक पेचप्रसंगाची कथा आहेजी तणावग्रस्त राजकीय नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नैतिक अनैतिक कृत्यांवर आधारित आहे. समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते. जी साखळी तिच्या वडिलांच्या हत्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहेमात्र हत्या आणि हत्यामागचा कट कोणाचा आहे हे चित्रपटात कळणार आहे.  

लोकशाही चित्रपट सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मित केले असून संजय अमर यांनी कथापटकथा आणि दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय-राजी या जोडीने केले असून चित्रपटातील गाणी जयदीप बागवडकर आणि राजलक्ष्मी संजय यांनी गायले आहेततसेच संजय अमर आणि अल्ट्रा मराठीचे बिझनेस हेड शाम मळेकर यांनी गीतांना शब्द दिले आहेत.

पैसा आणि सत्ता माणसाला वेडं बनवून टाकते. सत्तेसाठी भुकेले असणाऱ्या अशा लोकांचा संघर्ष आणि त्याचे परिणाम लोकशाही चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. उत्तमोत्तम कथा प्रेक्षकांना सादर करताना एक निर्माता म्हणून अभिमानास्पद भावना आहे. असे अनेक आशयघन चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत राहणार आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

No comments:

Post a Comment