नवी मुंबई, 04 एप्रिल 2024: नवी मुंबई आघाडीचे मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने पलावामध्ये नवे मेडिकल सेंटर सुरु केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता पलावामधील तसेच जवळपासच्या भागातील नागरिकांना हॉस्पिटलच्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येईल, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्यविषयक गरजा याठिकाणी पूर्ण होतील.
या आधुनिक मेडिकल सेंटरमध्ये फॅमिली फिजिशियन्स आणि सुपर-स्पेशलिस्ट्स उपलब्ध होऊ शकतील, त्यामुळे आरोग्यसेवेशी संबंधित सर्व गरजा तातडीने पूर्ण होऊ शकतील, पुरेपूर लक्ष पुरवले जाईल व सर्वोत्तम वैद्यकीय कौशल्यांचा लाभ याठिकाणी घेता येईल. नियमित तपासण्या आणि निवारक देखभालीपासून गंभीर स्थिती व वैद्यकीय आणीबाणीचे व्यवस्थापन करण्यापर्यंत प्रत्येक रुग्णाला याठिकाणी सर्वसमावेशक वैयक्तिक देखभाल पुरवली जाईल.
नवीन सेंटर सुरु झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईचे संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले, "पलावा आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांसाठी आमच्या सेवा उपलब्ध करवून देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे मेडिकल सेंटर सर्वोत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध करवून देण्याची आमची बांधिलकी दर्शवते. अनुभवी डॉक्टरांची आमची टीम आणि अत्याधुनिक सोयीसुविधांची उपलब्धता यामुळे नागरिकांना सर्वोत्तम संभव देखभाल त्यांच्या घराच्या अगदी जवळ उपलब्ध होऊ शकेल."
या मेडिकल सेंटरमध्ये अनेक वेगवेगळ्या सेवा उपलब्ध आहेत. सर्व वयोगातील व्यक्तींसाठी सर्वसमावेशक देखभाल याठिकाणी पुरवली जाईल, प्रतिबंधात्मक उपाययोजना व सर्वांगीण कल्याणावर भर दिला जाईल. याठिकाणी कार्डिओलॉजी, न्यूरॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि इतर स्पेशालिटीजचे तज्ञ प्रत्यक्ष किंवा टेलिकन्सल्टेशनमार्फत भेटू शकतील. अतिशय अचूक निदान तातडीने केले जावे यासाठी सुविधाजनक ऑन-साईट लॅबोरेटरी सेवा पुरवल्या जातील.
ज्यामध्ये तातडीने उपचारांची गरज भासते अशा गंभीर आणीबाणीच्या प्रसंगी, मेडिकल सेंटरमधील वैद्यकीय टीम तत्परतेने सक्षम देखभाल पुरवेल. प्रत्येक रुग्णाला आवश्यक असलेली देखभाल जराही उशीर न होता मिळावी यासाठी हॉस्पिटलने विशेष रुग्णवाहिका सेवा देखील तैनात केल्या आहेत.
No comments:
Post a Comment