मनोरंजन सृष्टी म्हटलं, की विनोदवीर ओघाने आलेच. या विनोदवीरांचा, त्यांच्या कामाबद्दल होणारा सन्मान म्हणजे, 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस'! या सोहळ्यातूनप्रेक्षकांचे नेहमीच भरपूर मनोरंजन होते. 'कॉमेडी अवॉर्ड्स'मध्ये विनोदी स्किट्सचा भरणा असतो. याशिवाय नृत्यकलेतून सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. नृत्यांगनांच्यादिलखेचक अदांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातात. 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०१९' हा कार्यक्रमदेखील याला अपवाद नाही आहे. दीप्ती सती, हेमल इंगळे, मालविकागायकवाड या नवोदित अभिनेत्री अभिनेता भूषण पाटील सोबत आपल्या नृत्याचा जलवा दाखवणार आहेत. तसंच सगळ्यांची लाडकी आर्ची, अर्थात रिंकू राजगुरू सदरकरणारा नृत्याविष्कार हे प्रेक्षकांसाठी मुख्य आकर्षण ठरणार आहे. रिंकू पहिल्यांदाच या सोहळ्यात सोलो नृत्य सादर करणार आहे. तिच्या सादरीकरणातील एक निराळासाज प्रेक्षक अनुभवतील. रिंकू या पुरस्कार सोहळ्यात एक ग्लॅमरस डान्स परफॉर्म करताना प्रेक्षकांना दिसेल. आपल्या नाजूक अदाकारीने ती प्रेक्षकांची मन जिंकेल यातशंकाच नाही. अभिनयाप्रमाणेच तिचा नृत्याचा हा पैलू सुद्धा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या भव्यदिव्य सोहळ्यात रिकूंच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा वाढेल हेमात्र नक्की. तेव्हा रिंकुची दिलखेचक अदा असलेला हा नृत्याविष्कार पाहायला विसरू नका रविवार २८ जुलै संध्याकाळी ६.३० वाजता झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस मध्येफक्त आपल्या झी टॉकीज वाहिनीवर !!!
Showing posts with label 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स'. Show all posts
Showing posts with label 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स'. Show all posts
Saturday, 27 July 2019
Friday, 19 July 2019
धरमपाजींनी वाढवली 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स'ची रंगत!!!!
'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स'मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधील विनोदवीरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्यातील आणखी एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे'जीवनगौरव' पुरस्कार! दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा पुरस्कार वितरित करण्यात आला. शुभा खोटे आणि विजू खोटे हे यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी ठरले. यंदाचे जीवनगौरव पुरस्कार वितरणनेहमीपेक्षा निराळे आणि हटके होते. 'बॉलीवूड स्टार' धर्मेंद्रजी यांच्या हस्ते हे विशेष पारितोषिक देण्यात आले.
धर्मेंद्रजी यांची उपस्थिती या सोहळ्याला अगदी साजेशी अशी ठरली. खास वेळ काढून, लोणावळ्याहून मुंबईत येत त्यांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचेस्वागत करण्यात आले. मुंबई शहराने आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे, या रंगमंचावर देखील आवर्जून सांगायला धर्मेंद्रजी विसरले नाहीत. 'शोले' सिनेमात एकत्र काम केलेली ही जोडी, काहीकाळासाठी जुन्या आठवणीत रमली होती. या चित्रपटातील 'मैंने आपका नमक खाया हैं' हा सुप्रसिद्ध संवाद, यानिमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकायला मिळाला. शुभा खोटे व विजू खोटे यांना'जीवनगौरव' देऊन सन्मानित करत असतांना धरमजींना सुद्धा अभिमान वाटला. धर्मेंद्रजींची या सोहळ्यातील उपस्थिती आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, हा प्रत्येकासाठी आपुलकीचा भाग होता. एकूणच छान जमून आलेला 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०१९' हा सोहळा, प्रेक्षकांसाठी दुग्धशर्करा योग ठरेल. त्यामुळे पाहायला विसरू नका 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०१९' रविवार २८ जुलैसंध्याकाळी ६.३० वाजता फक्त आपल्या लाडक्या झी टॉकीजवर.
Subscribe to:
Posts (Atom)