Showing posts with label 'प्रेम. Show all posts
Showing posts with label 'प्रेम. Show all posts

Tuesday, 22 October 2019

'प्रेम, पॉयजन, पंगा' मालिकेतून आदिनाथचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण!!!

सर्वांची लाडकी 'झी युवा' ही मराठी वाहिनी, आज तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. निरनिराळ्या दर्जेदार व अनोख्या मालिका झी युवा नेहमी घेऊन येते. अशीच आणखी एक आगळीवेगळी मालिका ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'प्रेम, पॉयजन, पंगा' असे या मालिकेचे नाव आहे. प्रोमो बघूनच, प्रेक्षकांची मालिकेविषयीची उत्सुकता वाढलेली आहे. 
'इच्छाधारी नागीण' हा विषय मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच हाताळण्यात येत आहे. 'कोठारे व्हिजन' या मालिकेची निर्मिती करत आहे. 'झी युवा' वाहिनीवर ही मालिका पाहायची संधी मिळणार असल्याने, महेशजींच्या ऐवजी, यावेळी आदिनाथ कोठारे निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे. अभिनेता म्हणून आपला निराळा ठसा उमटवणारा आदिनाथ, या मालिकेच्या माध्यमातून निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. निर्मिती क्षेत्रातील पदार्पणातच नवी संकल्पना आदिनाथ कोठारे हाताळणार आहे. वेगळ्या धाटणीची मालिका पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'इच्छाधारी नागीण' म्हणजे नकारात्मक भूमिका, हे समीकरण बदलून, एक हवीहवीशी प्रेमळ नागीण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मुख्य भूमिकेतील कलाकार म्हणून, दोन नवे चेहरे सुद्धा या मालिकेत पाहायला मिळतील. प्रेमाच्या या पॉयजनची नशा निर्माण करायला व खूप हासावण्याचा पंगा घ्यायला ही मालिका झी युवा वाहिनीवर आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना नक्की पसंत पडेल. 
निर्माता म्हणून पदार्पण करणारे आदिनाथ कोठारे, या अनुभवाविषयी बोलताना म्हणतात;
'इच्छाधारी नागीण या विषयावर एखादी मालिका सुरु करायची एवढाच विचार डोक्यात होता. पण, या संकल्पनेविषयी आणखी चर्चा सुरु झाली, आणि त्यानंतर या विषयाने एक वळण घेतलं. त्यामुळे हलकीफुलकी पण तरीही 'मॅड' अशी एक भन्नाट विनोदी मालिका तयार झाली. म्हणूनच तिला 'प्रेम, पॉयजन, पंगा' असं निराळं नाव देण्यात आलं. 'इच्छाधारी नागीण' हा विषय वेगळ्या प्रकाराने मांडण्यात येतो आहे. एक उत्तम 'सिटकॉम' पाहण्याची संधी आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.'