Showing posts with label 'फत्तेशिकस्त'. Show all posts
Showing posts with label 'फत्तेशिकस्त'. Show all posts

Monday, 25 November 2019

'फत्तेशिकस्त'च्या टीमची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला भेट

मराठी सिनेसृष्टीत सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेला 'फत्तेशिकस्त' हा मराठी सिनेमा सिनेमागृहांमध्ये यशस्वी घोडदौड करत आहे. सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरत असलेल्या या चित्रपटाची टीम प्रदर्शनानंतरही तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचून प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. याचाच एक भाग म्हणून 'फत्तेशिकस्त'च्या टीमने सान्वी प्रोडक्शन हाऊसच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'गलती से मिस्टेकया नाटकाच्या शतक महोत्सवी प्रयोगाला हजेरी लावली.
 या सोबतच या प्रसंगी भरवण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र आणि नाण्यांच्या प्रदर्शनालाही 'फत्तेशिकस्त'च्या टीमने भेट दिली. 'फत्तेशिकस्त' च्या टीमसाठी या खास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दिग्पाल लांजेकरचिन्मय मांडलेकर, विक्रम गायकवाड, अंकीत मोहन आणि रुची सावर्ण यांनी शस्त्रे आणि नाण्यांविषयीची माहिती जाणून घेतली. 'गलती से मिस्टेकया नाटकाच्या प्रयोगापूर्वी 'फत्तेशिकस्त'चे प्रमोशन करत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सर्वांना चित्रपट पाहण्याचे आवाहन करत ही कलाकृती सादर करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्याबद्दलची भावना रसिकांसमोर व्यक्त केली. या टीममध्ये 'फत्तेशिकस्त'चे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकरछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे चिन्मय मांडलेकरविक्रम गायकवाड अंकीत मोहन आणि रुची सावर्ण सहभागी होते.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीदुर्गराजरायगड आणि सान्वी एन्टरटेन्मेंट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Tuesday, 5 November 2019

'फत्तेशिकस्त'ला शिवकालीन संगीताचा साज

सुमधूर संगीत ही भारतीय सिनेमांची खासियत मानली जाते. मराठी सिनेसृष्टीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच ब्लँक अँड व्हाईटच्या जमान्यापासून आजच्या डिजीटल युगापर्यंतची फार मोठी संगीतमय परंपरा मराठीला लाभली आहे. कथेला अनुसरून गीत-संगीताची किनार जोडली जाणं हा त्यातील महत्त्वाचा पैलू मानला जातो. त्यामुळेच 'फत्तेशिकस्त' हा आगामी महत्त्वाकांक्षी सिनेमाही शिवकालीन संगीताचा साज लेऊन सजल्याचं सिनेरसिकांसोबतच संगीतप्रेमींनाही अनुभवायला मिळणार आहे. लेखन-दिग्दर्शनासोबतच 'फत्तेशिकस्त'मध्ये आपल्या अभिनयाची झलकही दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकरनं 'फत्तेशिकस्त'च्या माध्यमातून रसिकांसाठी जणू संगीताचा नजराणाच पेश केला असून संगीतकार देवदत्त मनिषा बाजी यांच्या दृष्टीतून तो प्रभावीपणे सादर झाला आहे.
'रणी फडकती लाखो झेंडे’... हे एक भव्य दिव्य गाणं 'फत्तेशिकस्त'मधील गाणं प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेल्या या गाण्यात २०० नर्तकमावळातील १००० कार्यकर्ते२०० ढोलवादक आणि २०० ध्वजधारकांचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला आहे. कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी या गाण्याचं अप्रतिम नृत्य दिग्दर्शन केलं आहे. 'रणी फडकती...'ची आणखी एक खासियत म्हणजे हे गाणं सिनेमातील सर्व कलाकारांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. 'फत्तेशिकस्त'मधील तुंबडी रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात शाहिरी सादर करणारे अज्ञान दास यांचे १७ वे  वंशज असलेल्या हरिदास शिंदे यांनी ही तुंबडी गायली आहे. त्यामुळे 'फत्तेशिकस्त'मधील या तुंबडीला कळत-नकळत शिवकालीन वारसा लाभला आहे. कूट प्रश्नांच्या या तुंबडीच्या माध्यमातून त्या काळी महाराजांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलं जायचं. 
माऊलींच्या पूजेचा मान ज्यांच्याकडे आहे त्या अवधूत गांधी यांच्या स्वरातील ‘हेचि येळ देवा नका’... हे गीतही लक्षवेधी ठरणारं आहे. या कारुण्यपूर्ण अभंगाद्वारे ऑनस्क्रीन छत्रपती शिवाजी महाराज साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरची एंट्री होणार आहे. महाराष्ट्रीय लोकपरंपरेचा अविभाज्य भाग असलेला जोगवाही 'फत्तेशिकस्त'मध्ये आहे. ‘तू जोगवा वाढ माई’... या जोगव्याचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सर्व वीरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. शिवकालीन इतिहासात मराठीइतकंच हिंदी आणि उर्दू शब्दांचा उच्चारही सर्रास केला जायचा. तोच धागा पकडत 'फत्तेशिकस्त'मध्ये हिंदी-उर्दूचा समावेश असलेल्या कव्वालीचा समावेश आहे. या सिनेमाला आधुनिकतेची किनार जोडत लोकपरंपरेचा वारसा लाभलेलं संगीत देण्यात आलं आहे. यासाठी लोकप्रिय धनगरी ढोलाचा वापर करण्यात आला आहे. या सिनेमात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजवि. स. खांडेकरदिग्पाल लांजेकर यांनी रचलेल्या गीतरचनांचा वापर करण्यात आला असूनसंगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी दिलं आहे.
‘स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राईक’ असं वर्णन केला जाणाऱ्या 'फत्तेशिकस्त'चं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरनं केलं आहे. ए. ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेला 'फत्तेशिकस्त१५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणाल कुलकर्णीचिन्मय मांडलेकरअजय पुरकरमृण्मयी देशपांडेअंकित मोहननिखिल राऊतहरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारीआस्ताद काळेतृप्ती तोरडमलरमेश परदेशीअक्षय वाघमारेविक्रम गायकवाडरुची सावर्णअश्विनी कुलकर्णीनक्षत्रा मेढेकरप्रसाद लिमयेअमोल हिंगेऋषी सक्सेनासिद्धार्थ झाडबुके या मराठमोळ्या कलाकारांनी या सिनेमात विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अनुप सोनी हा हिंदीतला प्रसिद्ध चेहरा 'फत्तेशिकस्त'मध्ये शाहिस्ता खान साकारत मराठीकडे वळला आहे. 
या कलाकारांना पौर्णिमा ओक यांनी वेशभूषा केली असूनरंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. डीओपी रेशमी सरकार यांनी 'फत्तेशिकस्त'साठी सिनेमॅटोग्राफी करण्याचं धाडस केलं असूनयातील साहसदृश्यांचं दिग्दर्शन बब्बू खन्ना यांनी केली आहेत. संकलन प्रमोद कहार यांचं असूनध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केलं आहे. अजय आरेकर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमासाठी इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांनी व्हीएएक्स केले आहेत. उत्कर्ष जाधव यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

Friday, 4 October 2019

स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार 'फत्तेशिकस्त'

'फर्जंदया ऐतिहासिक सिनेमात कोंडाजी फर्जंद यांनी गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा मांडल्यानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'फत्तेशिकस्तया आगामी मराठी सिनेमात स्वराज्यातील पहिला 'सर्जिकल स्ट्राइकपहायला मिळणार आहे. आजवरच्या बऱ्याच लढायांमध्ये स्त्रियांनीही पुरुषांइतकंच योगदान दिल्याची साक्ष इतिहास देतो. स्वराज्यातील लढायाही याला अपवाद नाहीत. शत्रूची बित्तंबातमी काढण्यापासूनहेरगिरी करण्यापर्यंत आणि त्यांची दिशाभूल करून प्रत्यक्ष लढाईत तलवारबाजी करण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर स्त्रीयांनी आपली शक्ती दाखवत शत्रूंना सळो की पळो करून सोडलं आहे. 'फत्तेशिकस्तसिनेमातही स्त्रीशक्तीचे विविध पैलू पहायला मिळणार आहेत. यापैकी काही स्त्रिया पडद्यावर वावरताना दिसणार आहेततर काहींनी पडद्यामागं राहून आपलं कौशल्य पणाला लावत 'फत्तेशिकस्त' पडद्यावर सादर करण्याच्या आव्हानात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
या आणि अशा बऱ्याच कारणांमुळं ए.ए फिल्म्सचं सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेला 'फत्तेशिकस्तएक प्रकारे स्त्रीशक्तीचा नारा देणारा सिनेमा असल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. चतुरस्र अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या सिनेमात पुन्हा एकदा राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर यापूर्वी राजमाता साकारल्यानंतर त्या पुन्हा यात जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतिहास घडविणाऱ्या या राजमातेचं लढवय्ये रूप या सिनेमात पहायला मिळेल. या सोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘फुलवंती’ या एका वेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पत्नी ‘सोयराबाईं’ च्या भूमिकेत अभिनेत्री रुची सावर्ण दिसणार आहे. अनेक मराठी आणि हिंदी मालिका गाजवणारी रुची सावर्ण 'फत्तेशिकस्त' मधून मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. मोगल साम्राज्याची ‘बडी बेगम’ची तडफदार व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने रंगवली आहे. मोगल साम्राज्यातील वफादार सरदार ‘रायबाघन’ च्या भूमिकेत अभिनेत्री तृप्ती तोरडमल तर शाहिस्तेखानाची सून ‘बहूबेगम’च्या भूमिकेत नक्षत्रा मेढेकर दिसणार आहे. या साऱ्यांनी साकारलेल्या या ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्मरणात राहणाऱ्या ठरणार आहेत.
पडद्यावर दिसणाऱ्या या अभिनेत्रींच्या जोडीला पडद्यामागं राहून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांसाठी काम करणाऱ्या ‘डीओपी’ रेशमी सरकार यांनी छायांकनाची जबाबदारी चोख बजावली आहे. शिवकालीन गड-किल्ल्यांच्या जोडीला स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राइकही प्रेक्षकांना त्यांच्या नजरेतून पहायला मिळणार आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा प्राण असणारी वेशभूषा पौर्णिमा ओक यांनीतर रंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. या दोघींनीही अतिशय कल्पकतेच्या बळावर स्वराज्यातील व्यक्तिरेखांना गेटअप आणि मेकअप केला आहे.
अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर 'फत्तेशिकस्त'चे निर्माते आहेत. संकलन प्रमोद कहार यांचं असूनकार्यकारी निर्मात्याची जबाबदारी उत्कर्ष जाधव यांनी सांभाळली आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी दिलं असूनगीतरचना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजवि. स. खांडेकरदिग्पाल लांजेकर यांची आहेत.
१५ नोव्हेंबरला 'फत्तेशिकस्तसर्वत्र प्रदर्शित होणार आहे.