Showing posts with label आत्याबाई उडवणार सिध्दी. Show all posts
Showing posts with label आत्याबाई उडवणार सिध्दी. Show all posts

Tuesday, 30 April 2019

आत्याबाई उडवणार सिध्दी- शिवाच्या लग्नाचा बार ! शिवा – सिद्धीचा विवाह सोहळा “जीव झाला येडापिसा” मालिकेमध्ये ६ मे रोजी रात्री ८.००


मुंबई १ मे२०१९ : लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध... ज्या व्यक्तीचा आपण दु:स्वास करतो त्याच्याबरोबर जेंव्हा आयुष्याची गाठ बांधली जाईल तेंव्हा काय होईल जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये देखील असचं काहीसं घडणार आहे... मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहचली आहेज्यामुळे शिवा आणि सिद्धीच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळणार आहे. आत्याबाई त्यांचं राजकीय स्थान वाचविण्यासाठी सिद्धी आणि शिवाचं लग्न शाही पद्धतीने लावून देणार अशी घोषणा गावामध्ये करतात. परंतु, शिवा आणि सिद्धीची ओळखचं गैरसमजातून होते आणि हे गैरसमज दिवसेंदिवस वाढत जातात... शिवाबाबतीत असे अनेक प्रसंग घडतात ज्यामुळे सिद्धी शिवाचा तिरस्कार करू लागते. यामुळेच सिद्धीचा या लग्नास नकार असतो पण परिस्थितीनरूप सिद्धी शिवाशी लग्न करण्यास मंजुरी देते... आता आत्याबाईंनी घातलेला लग्नाचा घाट निर्विघ्नपणे पार पडेल ?  शिवा – सिद्धीचं लग्न हा आत्याबाईचा सगळ्यात मोठा डाव आहे हे शिवाला कळेल हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा शिवा – सिद्धीचा शाही विवाह सोहळा “जीव झाला येडापिसा” मालिकेमध्ये ६ मे रोजी रात्री ८.०० आपल्या कलर्स मराठीवर.
जीव झाला येडापिसा मालिकेच्या कथेची मांडणीचित्रीकरणमालिकेतील पात्ररिअल लोकेशन्स यामुळे जीव झाला येडापिसा ही मालिका प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलीशी आणि वास्तवादी वाटते आहे. चिन्मयी सुमित साकारत असलेले आत्याबाईचे पात्रशिवाच्या वडिलांची भूमिका साकारणारे मोहन जोशीआणि मालिकेतील इतर पात्र ते साकारत असलेल्या भूमिका अप्रतिमरित्या पार पाडत आहेत. गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि सिद्धीचे पात्र साकारणारी विदुला चौघुले यांनी आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धीच्या लग्नामुळे पुढे काय घडेल ?  कुठलं नवं वळण मालिकेला मिळेल हे बघणे रंजक असणार आहे.
तेंव्हा नक्की बघा शिवा – सिद्धीचा शाही विवाह सोहळा “जीव झाला येडापिसा” मालिकेमध्ये ६ मे रोजी रात्री ८.०० आपल्या कलर्स मराठीवर