Showing posts with label घाडगे & सून. Show all posts
Showing posts with label घाडगे & सून. Show all posts

Wednesday, 18 September 2019

अमृता मागणार चित्राची माफी ? घाडगे & सून महारविवार विशेष भाग रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर

मुंबई १८ सप्टेंबर, २०१९ : अनेक विघ्न, अडचणीनंतर अखेर अमृता आणि अक्षयचा लग्न सोहळा पार पडला आणि अमृता घाडगे सदन मध्ये सून म्हणून आली आणि अक्षय – अमृतचा नवा प्रवास सुरू झाला... अमृता आणि अक्षयचा सुखाचा संसार सुरू झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. पण अमृतासोबतच घाडगे सदनमध्ये चित्रा देखील सून म्हणून आली…. चित्राचा घाडगे सदनमध्ये येण्या मागचा हेतु माई आणि अमृता वा घरातील कुठल्याच सदस्याला अजून माहिती नाहीये... चित्रा अनंतची बायको म्हणून घरामध्ये यावी हा अमृताचा निर्णय वसुधाला मात्र पटलेला नसून यामुळे वसुधा अमृतावर नाराज आहे. आणि तिची नाराजगी तिने परिवारासमोर व्यक्त देखील केली. आता चित्राच्या घरामध्ये येण्याने कुठले नवे संकट परिवरावर येणार ? हे हळूहळू कळेलच...  चित्राचा डोळा घाडगेंच्या संपत्तीवर आहे आणि ते मिळविण्यासाठी ती आता काय काय कारस्थान रचेल आणि माई - अमृता याला कशा सामोर्‍या जातील त्यावर कशी मात करतील ? हे बघणे रंजक असणार आहे... घरामध्ये आनंदाचे वातावरण असतानाच त्यामध्ये चित्रा मिठाचा खडा टाकणार आहे. 
अक्षय आणि अनंतच्या लग्नानंतर माई घरामध्ये पुजा ठेवणार आहेत... या पुजे दरम्यान असे काय घडले, वा चित्राने असे काय केले ज्यामुळे माईंनी अमृताला चित्राची माफी मागायला सांगितली ? नात्यामध्ये फुट पाडण्याच्या हेतूमध्ये चित्रा यशस्वी होईल ? की अमृताला चित्राचा हेतु कळेल... जाणून घेण्यासाठी बघा घाडगे & सूनचा महा रविवार विशेष भाग २२ सप्टेंबर रात्री ८.०० वा. आणि  सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Tuesday, 10 September 2019

अक्षय आणि अमृता अडकणार लग्नबंधनामध्ये ! घाडगे & सून सोम ते शनि संध्या. ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर


मुंबई १० सप्टेंबर, २०१९ : महाराष्ट्राचे तमाम प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघत होते तो क्षण आता आला आहे... अमृता आणि अक्षय लग्नबंधनामध्ये लवकरच अडकणार आहेत... अक्षयने कियाराला घटस्फोट दिला असून अक्षयने अमृताकडे एक शेवटची संधी मागितली आणि अमृताने ती संधी अक्षयला दिली... माईबरोबरच घरातील इतरांनीदेखील अक्षय आणि अमृतच्या लग्नास समंती दिली... आणि आता त्यांचा विवाह सोहळा धूमधडाक्यात पार पडणार आहे.  सगळ्या कठीण प्रसंगांमध्ये अक्षयच्या मागे अमृता खंबीरपणे उभी होती, त्याच्या प्रत्येक निर्णयात अमृताने अक्षयला पाठिंबा दिला, अक्षयला अमृताची मिळालेली ही साथ आता अशीच कायम रहाणार आहे. आता खर्‍या अर्थाने अक्षयला अमृताची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे... अमृता यावेळी कोणताही संकोच मनामध्ये न बाळगता घाडगेंची सून म्हणून माप ओलांडणार आहे... पण, हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडेल ? की मनोहर या सुखाच्या क्षणामध्ये मिठाचा खडा टाकेल, हे लवकरच कळेल... घाडगे सदनमध्ये अमृतासोबतच अजून एक गृहप्रवेश होणार आहे... आता हा गृह प्रवेश कोणाचा होणार आहे ? ती व्यक्ति कोण आहे ? तिच्या घाडगे सदना मध्ये येण्याने अक्षय आणि अमृताच्या आयुष्याला कुठले नवे वळण मिळेल ? हे नक्की बघा...
अनंतची बायको म्हणून घाडगे सदनमध्ये चित्राचा देखील गृहप्रवेश होणार आहे... चित्राची भूमिका सोनल पवार साकारणार आहे... बघूया पुढे घडणार घाडगे & सून मध्ये सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर...

Saturday, 31 August 2019

जीव झाला येडापिसा आणि घाडगे & सून मालिकेमध्ये गणरायाचे आगमन !

मुंबई ३० ऑगस्ट, २०१९ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाच्या आगमनाची चाहूल सगळीकडे लागली आहे. मंगलमय वातावरणात विघ्नहर्ताचे आगमन होत आहे...गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा आणि घाडगे & सून मालिकेमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात होणार आहे.  विघ्नहर्त्याच्या आगमनाने सिध्दी - शिवा आणि अमृता- अक्षय त्यांच्या आयुष्यातील विघ्न देखील बाप्पाने दूर करावीत हीच मनोकामना बाप्पा चरणी मागणार आहेत ...
जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये शिवा – सिध्दीच्या लग्नानंतर बाप्पाचे मोठ्या जल्लोषात लष्करेंच्या घरामध्ये आगमन होणार आहे... ढोल ताश्याच्या गजरामध्ये सोनी आणि शिवा यांनी बाप्पासी स्थापना करणार आहेत...  सिध्दी, काकू आणि सोनी यांनी खास मोदक बनवले आहेत... घरामध्ये स्पर्धा होणार आहे आता ही स्पर्धा कसली असणार? आरतीचा मान कोणाला मिळणार ? हे कळेलच. तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
घाडगे & सून मालिकेमध्ये घाडगे सदनमध्ये बाप्पाचे आगमन मोठ्या उल्हासात झाले आहे... बाप्पाची स्थापना, पूजा निर्विघ्नपणे पार पडते...पण  माई आणि अमृता जरा चिंतेत आहेत कारण अक्षयने जे खोटे सांगितले आहे ते वसुधाने माई आणि अमृतासमोर उघड केले आहे, की कियाराचे बाबा पैसे देणार नाहीत.  यातच भर म्हणजे अमृताचे वडील त्याचे बॉस आनंद यांना घेऊन येतात आणि सगळ्यांना सांगतात अमृताचे लग्न त्याच्यासोबत ठरवले आहे. विघ्नहर्त्याच्या येण्याने हे संकट देखील दूर होईलच... पुढे काय घडेल हे कळेलच... तेंव्हा नक्की बघा घाडगे & सून सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Monday, 3 June 2019

हर्षदा खानविलकरची घाडगे & सून मालिकेत होणार एन्ट्री साकारणार पोलिस ऑफिसरची भूमिका

मुंबई १ जून, २०१९ : घाडगे सदनात नव्या संकाटाची चाहूल... कारण सौदामिनी नावाच्या पात्राची एन्ट्री लवकरच  मालिकेत होणार आहे. ही भूमिका महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकर साकारणार आहे. तेंव्हा सौदामिनी कडकडेच्या मालिकेत येण्याने मालिका कुठल्या वेगळ्या वळणावर येईल हे बघणे रंजक असणार आहे. हर्षदा खानविलकर पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत मालिकेमध्ये दिसणार आहेत. सौदामिनी आणि घाडगे कुटुंबाचा काय संबंध आहे कियाराचा हा डाव तर नाही ना येत्या भागांमध्ये सौदामिनी घाडगेंना इंटरोगेट का करणार आहे सर्व घाडग्यांना सौदामिनी नजरकैदेत ठेवणारसौदामिनीला पुरुषांविषयी विशेष चीड आहेत्यामुळे कियाराच्या खोट्या बोलण्यामध्ये येऊन ती अक्षय आणि घाडग्यांना जबाबदार धरणार  का ? अमृता यामधून कशी मार्ग काढेल हे सगळ जाणून घेण्यसाठी बघा घाडगे & सून मालिका २ जून ते ९ जून या आठवड्यामध्ये रविवारीसुध्दा नेहमीच्या वेळेत रात्री ८.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
घाडगे & सून मालिकेमध्ये सध्या संपूर्ण घाडगे कुटुंब कियाराच्या कारस्थानांनी आणि डावपेचांनी त्रस्त झाले आहे ... या सगळ्यामध्ये अमृता आणि माई मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत... परंतु प्रत्येक वेळी कियाराची खेळी मात्र सगळ्यांना भारी पडत आहे... तिचा खोटेपणा, गरोदर आहे असं सांगण,घाडगे परिवाराला तिच्या वडिलांनी ब्लॅकमेल करणधमक्या देण. यात कियाराने अक्षयला आपण भारताच्या बाहेर जाऊ कायमचे घाडगे सदनाला सोडून असं सांगण आणि त्यामुळेच अक्षय द्विधा मनस्थिती असण अशा गोष्टी सध्या मालिकेत घडत आहेत. आणि आता अक्षय आणि कियारा घर सोडून दुबईला जाणार हे सत्य अमृता आणि घरच्यांना देखील समजले आहे... अमृता यासगळ्यामधून काय आणि कसा मार्ग काढेल हे बघणे रंजक असणार आहे. हे घडत असतानाच मालिकेमध्ये सौदामिनीच्या एन्ट्रीमुळे काय घडेल... हे नक्की बघा घाडगे & सून मालिकेमध्ये.